मुक्तपीठ टीम
ज्यांचे पगार फार जास्त नाहीत. पण पगारातून भविष्य निर्वाह निधी वजा होत असेल तर, ही त्यांच्या कामाची बातमी आहे. कोरोनामुळे कामगार मंत्रालयाने कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजनेचे (ईडीएलआय) विमा संरक्षण वाढविले आहे. या व्यतिरिक्त, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ ईएसआयसीनेही काही चांगल पावलं उचलली आहेत. सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून कर्मचार्यांना अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामध्येच ईडीएलआयअंतर्गत दिलेली विमा रक्कम ६ लाख रुपयांवरून ७ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचाही समावेश आहे. कंपन्यांवर कोणताही अतिरिक्त भार न टाकता कर्मचार्यांना चांगली सामाजिक सुरक्षा दिली जात आहे.
ईडीएलआयचे फायदे
ईएसआयसी अंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास पती / पत्नी आणि विधवा आईला कर्मचार्यांच्या सरासरी दैनंदिन मजुरीच्या ९० टक्के इतकी म्हणजेच २५ वर्षे वयाच्या मुलांसाठी व आयुष्यभर पेंशन मिळते. कर्मचार्यांच्या मुलींच्या बाबतीत, त्यांना लग्न होईपर्यंत हा लाभ मिळतो.
ईडीएलआय योजना काय आहे?
• कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजना (ईडीएलआय), १९७६ अंतर्गत खातेधारकाच्या मृत्यूवर किमान विमा रक्कम आता अडीच लाख रुपये असून कमाल ७ लाख रुपये आहे.
• पूर्वी ही रक्कम २ लाख आणि ६ लाख रुपये होती. ३. जेव्हा खातेधारकाचा अकाली मृत्यू होतो तेव्हा ही रक्कम उपलब्ध असते.
• ईडीएलआय योजनेत, कर्मचार्यास पैसे द्यावे लागणार नाहीत, तर योगदान कंपनीकडून दिले जाते.
• ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कंपन्या १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्यांचा पीएफ वजा करतात.
• यात कंपनी कर्मचार्यांच्या मूलभूत पगाराच्या १२ टक्के आणि त्याच रकमेचे योगदान देते.
• यापैकी काही रक्कम ईडीएलआयच्या प्रीमियमकडे जाते.
यावर क्लेम किती मिळणार?
• कर्मचार्याच्या मागील १२ महिन्यांच्या मूलभूत सरासरीच्या ३५ पट आणि अखेरच्या १२ महिन्यांत पीएफची सरासरीची ५० टक्के रक्कम जोडून १,७५,००० रुपयांपर्यंत असेल.
क्लेम कसा मिळवावा?
• कर्मचार्याचा अकाली मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित असणारा व्यक्ती विमा संरक्षणासाठी क्लेम करु शकते.
• क्लेम करणाऱ्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास, घरातील कोणताही मोठा व्यक्ती क्लेम करु शकतो.
• यासाठी, कर्मचार्याचे मृत्यूचे प्रमाणपत्र, वारसांचे प्रमाणपत्र, नामनिर्देशित व्यक्तीचे प्रमाणपत्रे आणि बँक खात्याची माहिती आवश्यक असेल.