मुक्तपीठ टीम
भारतात २०२० मध्ये सोन्याच्या खाणीचे उत्पादन फक्त दीड टन होते, परंतु दीर्घ कालावधीत ते दरवर्षी २० टनांपर्यंत वाढू शकते. वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलने असे म्हटले आहे. वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलने भारतीय सोन्याच्या बाजारावरील सखोल विश्लेषणाच्या मालिकेचा एक भाग म्हणून गोल्ड मायनिंग इन इंडिया म्हणजेच भारतात सुवर्ण खाण नावाचा अहवाल सादर केला आहे.
वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतात सोन्याच्या खाणकामाची मोठी यंत्रणा आहे, परंतु कमी गुंतवणुकीमुळे उद्योगाची वाढ खुंटली आहे. भारत सोन्याचा जगातील सर्वात मोठा ग्राहक असूनही, खाण बाजार छोट्या प्रमाणात चालतो आणि त्यात प्रवेश करणे सोपे नाही. २०२० मध्ये सोन्याच्या खाणीचे उत्पादन फक्त दीड टन होते.
इतर देशांतील उत्पादन आणि संसाधनांच्या पातळीच्या तुलनेत भारताच्या विद्यमान संसाधनांमधून दीर्घ कालावधीत दरवर्षी सुमारे २० टन उत्पादन अपेक्षित आहे. नियामक आव्हाने, कर धोरणे आणि पायाभूत सुविधा या अहवालात प्रमुख समस्या म्हणून सूचीबद्ध केल्या आहेत.
वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलचे प्रादेशिक सीईओ सोमसुंदरम पीआर म्हणाले की, “भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा वापर करणार्या देशांपैकी एक आहे, त्यासाठी खाण क्षमता विकसित करणे ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु हे घडण्यासाठी बदल आवश्यक आहे, समस्या लक्षणीयरीत्या कमी केल्या जाऊ शकतात आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. ते म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत खाणी आणि खनिजे कायद्यातील बदल आणि राष्ट्रीय खनिज धोरण आणि राष्ट्रीय खनिज उत्खनन धोरण लागू केल्याने चांगली चिन्हे दिसून आली आहेत. हाच कल असाच सुरू राहिल्यास येत्या काही वर्षांत भारताचे खाण उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.”