मुक्तपीठ टीम
खगोल वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय समूहाला अवकाशातील एका महाराक्षसी अशा दुहेरी कृष्णविवराचा शोध लागला असून भविष्यात अवकाशातील गुरुत्वीय लहरींचा (GWs) शोध घेण्यासाठी या कृष्णविवराचा उपयोग होऊ शकेल, अशी शक्यता मांडली जात आहे. हा शोध लावणाऱ्या खगोल शास्त्रज्ञांच्या चमूत भारतीयांचाही समावेश होता.
विश्वातील सर्वात प्रकाशमान आणि ऊर्जामय वस्तूंमध्ये महाराक्षसी कृष्णविवरांचा (SMBH म्हणजे सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल) समावेश होतो. पृथ्वीपासून अतिशय दूरवरच्या दीर्घिकांच्या केंद्रातून निघणाऱ्या वायूतून ही कृष्णविवरे तयार होतात. .
शास्त्रज्ञांना सापडलेले AO 0235+164 हे कृष्णविवर आजपर्यंत सापडलेल्या कृष्णविवरांपेक्षा वेगळे आहे. कारण प्रकाशकिरणांच्या माध्यमातून एकमेकींत हस्तक्षेप करणाऱ्या दीर्घिकांच्या भिंग प्रभावातून ते तयार झाले आहे. (दूरवरून येणारा प्रकाश, निरीक्षकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मध्ये असणाऱ्या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणामुळे वक्रीभूत होतो, ती संकल्पना)
अर्जेंटिना, स्पेन, इटली, अमेरिका या देशातील खगोलशास्त्रज्ञांच्या समूहाने, गुरुत्वीय भिंग प्रभावातून तयार झालेल्या AO 0235+164 ब्लाझर मधील या अतिप्रचंड कृष्णविवर प्रणालीचा शोध लावला असून या चमूमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या संशोधनासाठी त्यांनी, विश्वभरात, गेल्या चार दशकांतील (1982 – 2019) विस्तृत ऑप्टिकल फोटोमेट्रिक निरीक्षणांचा आधार घेतला.
या खगोल शास्त्रज्ञानी हा प्रकाश अवकाशात टाकल्यानंतर, साधारण आठ वर्षांच्या अंतरानंतर, अवकाशात आवर्ती दुहेरी टोके असलेल्या ज्वाला आढळल्या, आणि या दोन ज्वालांमधला काळ दोन वर्षांचा होता. आणि असे पाच आवर्ती पॅटर्न त्यांना आढळले. त्यावरून त्यांनी असे अनुमान केले आहे की, अशी ज्वाला दिसण्याची पुढची घटना, नोव्हेंबर 2022 आणि मे 2025 दरम्यान घडण्याची शक्यता आहे.
आता, पुढचा असा आवर्ती पॅटर्न निश्चितपणे बघण्यासाठी, संपूर्ण पृथ्वी ब्लेझर टेलिस्कोप (WEBT) महासंघातर्फे जागतिक ऑप्टिकल फोटोमेट्रिक निरीक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही निरीक्षण मोहीम, डॉ आलोक सी. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाईल.
शोध मोहिमेत भारतीय खगोल शास्त्रज्ञांचाही समावेश
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) स्वायत्त संस्था असलेल्या नैनिताल इथल्या आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस), मध्ये डॉ. आलोक सी. गुप्ता वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून, त्यांनी या अभ्यासात भाग घेतला होता. या अध्ययनाचा अहवाल, रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी (MNRAS) च्या नियतकालिकामध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे.
या भारतीय अध्ययन चमूचे नेतृत्व, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबईचे उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र विषयाचे विद्यार्थी अभ्रदीप रॉय यांनी केले. भारतीय चमूतील इतर सदस्यांमध्ये प्रा. व्ही. आर. चिटणीस, डॉ. अंशु चॅटर्जी आणि डॉ. अर्कदीप्त सरकार यांचा समावेश आहे.