मुक्तपीठ टीम
कोरोना संकटाचे आव्हान असतानाही भारतीय रेल्वेने २०२१च्या मे महिन्यात मालवाहतुक आणि उत्पन्न या दोन्ही बाबतीत चढता आलेख कायम राखला आहे.
भारतीय रेल्वेने युद्धपातळीवर काम करत मे महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक केली आहे. २०२१च्या मे महिन्यात मालवाहतुक 114.8 मेट्रिक टन आहे. ती २०१९च्या मे महिन्यातील 104.6 मेट्रिक टन माल वाहतुकीपेक्षा 9.7% अधिक आहे.
रेल्वेची 2021च्या मे महिन्यातील विक्रमी माल वाहतूक
• 54.52 दशलक्ष टन कोळसा
• 15.12 दशलक्ष टन लोहखनिज
• 5.61 दशलक्ष टन अन्नधान्य
• 3.68 दशलक्ष टन खते
• 3.18 दशलक्ष टन क्षारयुक्त तेल
• 5.36 दशलक्ष टन सिमेंट (क्लिंकर व्यतिरिक्त)
• 4.2 दशलक्ष टन क्लिंकर यांचा समावेश होता.
भारतीय रेल्वेने मे 2021 मध्ये , मालवाहतुकीतून 11604.94 कोटी रुपये उत्पन्न कमावले. या महिन्यात वाघीणीच्या कार्यवाही वेळेबाबत 26% सुधारणा दिसून आली. मे 2021मधे ती 4.81 दिवस नोंदवण्यात आली. मे 2019 मधे ती 6.46 दिवस होती. विशेष म्हणजे मालवाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर सवलत आणि सूटही दिली आहे.
मालवाहतुकीच्या वेगातही वाढ
• सध्याच्या मार्गावर मालवाहतुक करणाऱ्या गाड्यांचा वेगही वाढला हे नमूद करायला हवे. गेल्या 18 महिन्यात मालवाहतुकीचा वेग दुप्पट झाला आहे. या वेगवाढीमुळी संबंधित घटकांच्या खर्चात बचत होत आहे.
• काही विभागात ( चार विभागांपैकी) सरासरी ताशी 50 किलोमीटरहून अधिक वेग नोंदवण्यात आला. भौगोलिक कारणांमुळे काही भागात मालवाहतुक करणाऱ्यां रेल्वे गाड्यांनी चांगला वेग नोंदवला. मे 2019 मधे या गाड्यांनी ताशी
• 36.19 किलोमीटर वेग नोंदवला होता. त्या तुलनेत मे 2021 मधे 26 टक्के अधिक म्हणजे सरासरी ताशी 45. 6 किलोमीट वेग नोंदवला गेला.
पाहा व्हिडीओ: