स्वप्नाली आसोले
२०१६ मध्ये एक अतिशय उपयुक्त प्रोजेक्ट साकारण्यात आला. तो म्हणजे #तीटॉयलेट. ‘ती’ म्हणजे #स्त्री किंवा #महिला. एका बस चे रूपांतर #टॉयलेट मध्ये करण्यात आले. याला #washroom_on_wheels असही म्हणण्यात आले. ही बस गुलाबी रंगाची बनवण्यात आली. बस च्या आतमध्ये महिलांच्या वापरासाठी सर्व सोयीनी युक्त असे टॉयलेट बनवण्यात आले. आणि हो ते फक्त टॉयलेट नाही तर इथे महिलांना स्तनपानाची ही सुविधा आहे. तसेच इथून महिला #सॅनिटरीपॅड्स सुद्धा विकत घेऊ शकतात. ५रू देऊन महिला हे टॉयलेट वापरू शकतात. हे टॉयलेट चालवणाऱ्या ही महिलाच असतात. त्यामुळे सुरक्षिततेची चिंता नाही.
२०१६ मध्ये अशा प्रकारच्या १२ बसेस बनवण्याचे ठरले होते. ज्यांचा साधारण प्रत्येक दिवशी २०० महिला वापर करू शकतील. या टॉयलेट्समुळे अनेक महिलांची अतिशय चांगली आणि सुरक्षित सोय होऊ शकते. मग याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? आजपर्यंत यातली एकच बस माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे शिवाजीनगर पुणे इथली. मग बाकी बसेस नक्की कुठे आहेत?? आणि जर त्या चालू आहेत तर आम्हां महिलांना त्या कुठे दिसत का नाहित?
जर आपण जागेच्या कमतरतेमुळे प्रत्येक ठिकाणी टॉयलेट नाही ऊभे करू शकत तर मग या पर्यायाचा विचार करायला काय हरकत आहे? अनेक गरजेच्या ठिकाणी या अशा बसेस उभ्या राहिल्या तर अनेक महिलांची सोय तर होईलच, पण लघवी कोंडून ठेवल्यामुळे होणाऱ्या आजारांपासूनही अनेक महिला वाचू शकतात. तुम्हाला काय वाटते?? अशा स्वच्छता गृहांची संख्या वाढवायला काय हरकत आहे?? कमेंट करून सांगा किंवा कॉल करून बोला पण बोला.
नेहमी प्रमाणे आजही अजून एका स्वच्छता गृहाची माहिती देत आहे.
(अध्यक्ष- सू फाऊंडेशन, अध्यक्ष- चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस)