मुक्तपीठ टीम
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्लीच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिखा चौहान यांनी नवा उपक्रम रचला आहे. त्यांनी एक एअरशिप विकसित केलं आहे. हा नवोपक्रम डॉ. शिखा यांनी आयआयटी दिल्लीच्या उद्योग दिनी प्रदर्शित केला. त्याला हाय परफॉर्मन्स लॅमिनेटेड फॅब्रिक फॉर स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप असे नाव दिले आहे. हे एक प्रकारचे विमान आहे, जे उपग्रहाप्रमाणे काम करण्यास सक्षम आहे. हे एअरशिप काय काय करेल ते जाणून घेवूया…
IITची कामगिरी: नव एअरशिप विकसित
- उपग्रहाच्या तुलनेत हे अत्यंत कमी किमतीचे तंत्रज्ञान आहे.
- ज्याचा वापर करून २० किमी उंचीवर अंतराळात जाऊन तरंगलांबीद्वारे सिग्नल पाठवता येतात.
- एअरशिपमध्ये कॅमेराही बसवण्यात आला आहे. पाळत ठेवणे, क्षेपणास्त्र चेतावणी आणि मार्गदर्शन, ब्रॉडबँड आणि दूरसंचार, हवामानाचा अंदाज यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये एअरशिपचा वापर केला जाऊ शकतो.
- एअरशिपमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने सीमावर्ती भागात शत्रूकडून कोणत्याही प्रकारच्या कारवाया सुरू असल्या तरी चित्रासह सिग्नल पाठवता येतील.
- हे तंत्रज्ञान उपग्रहाप्रमाणेच जमिनीवरील संगणक प्रणालीतून नियंत्रित करता येते.
२०२३ पर्यंत डीआरडीओकडे सोपवण्याची तयारी सुरू…
- या प्रकल्पावर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), इंडस्ट्री अॅकॅडेमिया (DIA), सेंटर ऑफ एक्सलन्स (COE), IIT दिल्ली आणि IIT दिल्लीच्या टेक्सटाईल आणि फायबर इंजिनिअरिंग विभागाने काम केले आहे.
- या प्रकल्पाच्या मुख्य अन्वेषक बी.एस. बटोला आहेत आणि सह-मुख्य अन्वेषक प्रा. मंगला जोशी आहेत.
- या प्रकल्पाचे काम एमएच रहमान, संचालक, डीआयए सीईई, रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क, आयआयटी दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली केले गेले आहे.
- या तंत्रज्ञानाचे पेटंट दाखल करण्यात आले आहे.
- २०२३ पर्यंत डीआरडीओकडे सोपवण्याची तयारी आहे.
- हा प्रकल्प DRDO ने प्रायोजित केला आहे.
- डॉ.शिखा चौहान २०१७ पासून या प्रकल्पावर काम करत आहेत.
- त्यांच्यासोबत प्रा.बी.एस.बाटोला आणि प्रा.मंगला जोशी हे देखील पाच वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहेत.
- प्रा बटोला आणि प्रा जोशी हे एरोस्टॅट तंत्रज्ञानावर १० वर्षांपासून काम करत आहेत.
डॉ.शिखा यांची संरक्षण क्षेत्रात काम करण्याची होती इच्छा…
- डॉ. शिखा चौहान यांनी सरकारी मॉडेल सायन्स कॉलेज, जबलपूर, मध्य प्रदेश येथून मिलिटरी सायन्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.
- त्यांनी त्याच महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पीजी आणि मटेरियल सायन्समध्ये पीएचडी पूर्ण केली.
- पीएचडी केल्यानंतर, IIT बॉम्बे मधून २०१७ ते २०१८ या वर्षात मटेरियल सायन्समध्ये पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळवली.
- २०१८ पासून डॉ. शिखा आयआयटी दिल्लीमध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणून कार्यरत झाली.
- तिला संरक्षण क्षेत्रात काहीतरी खास करायचे होते.
- आता ती खूश आहे की कारण तिने देशासाठी असे तंत्रज्ञान विकसित केले आहे जे उपग्रहापेक्षा खूपच कमी किमतीचे तंत्रज्ञान आहे.