मुक्तपीठ टीम
हिम वाळवंटामध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने लडाखच्या प्रत्येक खेड्यात बर्फाचा स्तूप बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत दरवर्षी २५ नवीन बर्फाचे स्तूप बांधण्याचे ध्येय ठेवले आहे. प्रत्येक बर्फाचा स्तूप २५ ते ३० लाख लीटर पाणी साठवू शकतो. या यशामुळे आदिवासी कार्य मंत्रालयाला या वर्षीचा प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार मिळाला. या प्रकल्पासाठी केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांना स्कॉच चॅलेंजर पुरस्कार मिळाला.
भारताचे उत्तरटोक असलेल्या या नव्या केंद्रशासित प्रदेशात २७,००० मीटर ते ४,००० मीटर इतक्या उंचावर गावे वसलेली आहेत. तेथील थंडीचे तापमान मायनस ३० डिग्री आहे. थंडी असूनही, वर्षामध्ये येथे सरासरी फक्त १०० मिमी पाऊस पडतो. परंतु आता ग्लोबल वार्मिंगच्या परिणामामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या अभावामुळे शेती होत नसल्याने, दुर्गम भागातील खेड्यांमधील लोक स्थलांतर करतात. म्हणूनच बर्फाचा स्तूप हा यावर योग्य उपाय आहे.
लडाखमधील बहुतेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत जेव्हा नद्यांमध्ये कमी पाणी असते. त्यावेळी नवीन पिकाची लागवड करणे कठीण जाते, पाणी नसल्यासमुळे पिकांचे नुकसान होते. तेथे जूनमध्ये, पर्वतांच्या शिखरावरील बर्फ आणि हिमनद्या वेगाने वितळत असल्यामुळे, अनेकदा पूरजन्य परिस्थिती उद्भवते.
लडाखी खेड्यांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याशिवाय दिवस घालवणे कठीण असते. केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “जी लोक त्या आदिवासी वस्त्यांमध्ये राहतात. यासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक होते. म्हणूनच स्तूपच्या आकारात बर्फ गोळा करण्याचा प्रकल्प खेड्याच्या मध्यभागी सुरू करण्यात आला. या स्तूपमध्ये बर्फ जमा करून २५ ते ३० लाख लिटर पाणी जमा करण्याची क्षमता आहे. या दोन महिन्यांत या पाण्याचा वापर हा पिण्याचे पाणी, दररोजची घरातील कामे आणि शेतीसाठी केला जाऊ शकतो.
मंत्रालयाने हिमालयीन इन्स्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्स, लडाख आणि काही स्थानिकांच्या मदतीने तेथे एक बर्फाचा स्तूप तयार करण्याची योजना केली. नोव्हेंबर २०१९ पासून त्यावर काम केले गेले आणि वर्ष २०१९-२० मध्ये २६ बर्फ स्तूप तयार केले गेले. यामुळे सहा लाख लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा झाला. यावर्षीही किमान २५ बर्फाचे स्तूप बांधले जाणार आहेत. मंत्रालयाच्या मते, गेल्या वर्षी जितके स्तूप बांधले गेले, ते या वर्षीही तयार केले जातील, पण यावर्षी आणखी २५ स्तूप असतील. म्हणजेच गावक-यांना १२० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा होईल.
पाहा व्हिडीओ: