मुक्तपीठ टीम
काही तरी मस्त चमचमीत. स्वादिष्ट असलं की खवय्यांना राहवणारं कसं. मग ते अगदी पिझ्झा, बर्गर, चाउमेन यांसारखं जंक फूड आवडतच आवडतं. सहज आणि कमी वेळात तयार होणारे अन्न…फास्ट फूड म्हणजे जंक फूड. लोक फास्ट फूडचा भरपूर वापर करतात. जंक फूडमध्ये भरपूर कॅलरीज, मीठ, साखर आणि फॅट्स असतात. त्यामुळे वजनं वाढणं, इतर आरोग्य समस्या उद्भवणं असे एक ना हजार धोके सांगितले जातात. ते टाळण्याचे सल्ले मिळतात. पण आहार तज्ज्ञांनी सांगितलेले काही नियम पाळले आणि खबरदारी घेऊन आस्वाद घेतला तर जंकफूडही बिनधास्त खाता येईल.
फास्ट फूडमुळे होते वेळेची बचत
- फास्ट फूड बनवायला कमी वेळ लागतो.
- फास्ट फूडची दुकाने आज जवळपास सर्वत्र आढळतात.
- त्यामुळे ते सहज उपलब्ध आहे आणि लोकांचा वेळही वाचतो.
- फास्ट फूडमुळे स्वयंपाकी आणि खाणारा दोघांचाही वेळ वाचतो.
- त्यामुळेच अनेकदा कितीही मना केलेलं असलं तरीही लोक फास्टफूड खातातच खातात, नव्हे खाणे
जंक फूड या शब्दाची उत्पत्ती कशी झाली
- जंक फूड हा शब्द पहिल्यांदा १९७२ मध्ये वापरला गेला होता.
- जंक म्हणजे निरुपयोगी, निकामी असे.
- शब्दाचा उद्देश अशा अन्नातील हाय-कॅलरी आणि कमी-पोषक पदार्थांकडे लोकांचे लक्ष वेधणे हा होता.
- संतुलित आहाराची कमतरता नसेल तर, जंक फूड खाणे हानिकारक नाही.
असे वापरा जंक फूड
- काही लोक जंक फूड खाणे टाळतात कारण त्यांना वाटते की खूप जास्त कॅलरीज आणि खूप फॅट्समुळे त्यांच्या शरीराचे नुकसान होऊ शकते.
- उदाहरणार्थ, चीज, अंडयातील बलक, विशेष प्रकारच्या चटण्या, सोडा इ.
- याशिवाय फळे, सॅलड्स, भाज्या, संपूर्ण धान्य इत्यादींचे सेवनही वेगळे करावे जेणेकरून शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू नये.
- वजन कमी करण्यासाठी फास्ट फूड आहाराच्या सेवनासोबतच काही व्यायाम किंवा चालणे देखील नियमितपणे केले पाहिजे.
अशा प्रकारे घ्या काळजी…
- खाद्यपदार्थ निवडण्याच्या आणि तयार करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करून फास्ट फूड देखील निरोगी आणि पौष्टिक बनवता येते.
- फास्ट फूडमध्ये ग्रील्ड सँडविच खाता येईल परंतु, मेयोनेझशिवाय.
- सॉस जपून वापरा.
- तेल कमी वापरा.
- भाज्यांपासून तयार केलेल्या अधिक गोष्टी खा.
- सोडा आणि ड्रिंक्स टाळा.
- सर्वात महत्वाचं म्हणजे जे खाल ते तेवढेच खा, जेवढे आवश्यक आहे.
- जिभेसाठी खाऊ नका, चवीमुळे खातच राहावंसं वाटेल.
- काहीवेळा तहाणेमुळेही भुकेसारखं वाटतं, त्यामुळे आधी पाणी प्या. काहीवेळा त्यावरच भागलं तर ती भूक नव्हतीच, हे ओळखा.
हे टाळा, निरोगी राहा…
- गर्भधारणेदरम्यान चुकीच्या आहार सेवन केल्यामुळे जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शूगरचा धोका असू शकतो.
- गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करण्याच्या काळात, डोनट्स, मफिन्स, कुकीज, चिप्स आणि मिठाईसारखे जंक फूड जास्त खाल्ले तर त्यांच्या न जन्मलेल्या बाळांमध्ये कोलेस्टेरॉल आणि ब्लड फॅट्सचे प्रमाण जास्त वाढते. ते टाळा.
- जंक फूडचे अतिसेवन आणि लठ्ठपणामुळे महिलांमध्ये हार्मोन्सची कमतरता असते, ज्यामुळे त्या वंध्यत्वाच्या बळी ठरू शकतात.