मुक्तपीठ टीम
देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता सरकारही सतर्क झाले आहे. त्यामुळेच पाश्चिमात्य देशांप्रमाणेच आपल्या देशातही कोरोना लसीच्या बुस्टर डोसचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने त्यासाठी बुस्टरऐवजी प्रीकॉशन डोस असा शब्द वापरला आहे. दहा जानेवारीपासून लसीचा तिसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस ६० वर्षांवरील आजारी वृद्ध व्यक्ती, आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या प्रतिबंधात्मक लसीसाठी लोकांना पु्न्हा एकदा कॉविन अॅपवर नोंदणी करण्याची गरज नसेल. आपल्या आधीच्या कोविन खात्यावरून आपण नोंदणी करू शकतो. ती नोंदणी नेमकी कशी करायची ते समजून घेवूया.
बुस्टर डोस कुणाला मिळणार
- कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यासाठी वयोगट आणि इतर निकष ठरवण्यात आले आहेत.
- ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ज्यांना कॉमोर्बिडीटीस म्हणजे एकापेक्षा जास्त सहविकार आहेत, त्यांचा दिला जाईल.
- सरकारने कॉमोर्बिडीटी अंतर्गत येणाऱ्या २२ रोगांची यादी जाहीर केली आहे.
- कॉमोर्बिडीटी असलेल्या सर्व लोकांना बुस्टर डोस घेण्यासाठी डॉक्टरांकडून कोणतेही प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
- मात्र अशा लोकांना बुस्टर डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे.
काय करावं लागणार?
- कोविन अॅपवर आधीपासूनच असलेली नोंदणी ही वृद्ध, आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कामगारांची नावे आणि डेटा यासाठी पुरेशी असेल.
- त्याच डेटावर, या वयोगटाने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
- आरोग्य सेतू अॅप आणि उमंग अॅपवरही बुस्टर लस स्लॉट बुकिंग करता येते.
- याशिवाय केंद्रांवरही बुकिंग करता येईल.
- या गटात सुमारे १४ कोटी लोकांना लसीकरण करायचे आहे.
‘हे’ सहविकार असणाऱ्यांना मिळणार बुस्टर डोस
- मधुमेह
- कर्करोग
- हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग
- मूत्रपिंडाचा आजार
- गंभीर श्वासोच्छवासाच्या आजाराने दोन वर्षे रुग्णालयात
- डायलिसिस
- स्टेमसेल ट्रान्सप्लांट
- सिरोसिस
- सिकल सेल डिसीज
- प्रोलॉन्गड यूज ऑफ स्टेरॉयडस
- इम्युनोसप्रेसेंट औषधे
- मस्कुलर डिस्ट्रॉफी
- बहिरा-अंधत्व यासारखे बहुविध अपंगत्व
पंतप्रधान मोदींनी केली होती १० जानेवारीपासून डोस देण्याची घोषणा
- २५ डिसेंबरच्या रात्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० जानेवारीपासून अशा साठ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील वृद्ध व्यक्तींना लसीचा तिसरा डोस देण्याची घोषणा केली होती जे कॉमोरबिडीटीच्या कक्षेत येतात.
- यासोबतच १० जानेवारीपासून पंतप्रधान मोदींनी आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची घोषणा केली होती.
- “भारताने यावर्षी १६ जानेवारीपासून आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली.
- तो एक सामूहिक प्रयत्न होता.
- याचा परिणाम म्हणून आज देशात १४१ कोटी डोस देण्यात आले आहेत.
- आपण १४१ कोटी लसींचे मोठे लक्ष्य पार केले आहे.
- लसीकरणाबाबत आपण सातत्याने काम केले आहे.
- आपण जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली.
- आज भारतातील ६१ टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
- त्याचप्रमाणे सुमारे ९० टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा एकच डोस देण्यात आला आहे.
- ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कॉ-मॉरबिडिटी असलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीच्या Precaution Dose चा पर्याय उपलब्ध होईल. हे लसीकरण देखील १० जानेवारीपासून उपलब्ध होईल.