Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home आरोग्य

प्रदुषणामुळे दहा दिवसात फुफ्फुस किती काळवंडते? तुम्हीच पाहा…

मुंबईनंतर खारघरमध्ये उभारलेली फुफ्फुसं झाली १० दिवसात बेजार!

January 29, 2021
in आरोग्य
0
Vatavaran Pollution Lungs study - (1)

मुक्तपीठ टीम

प्रदुषणाबद्दल कितीही बोललं तरी सामान्यांना त्याची गंभीरता कळत नाही. त्यामुळे एका स्वयंसेवी संस्थेनं एक वेगळं पाऊल उचललं. वातावरण फाऊंडेशनने प्रथम मुंबईच्या वांद्रे परिसरात आणि आता खारघर परिसरात कृत्रिम फुफ्फुसे उभारली. अवघ्या काही दिवसांमध्ये दोन्ही ठिकाणच्या फुफ्फुसांचे बदलले रंग महामुंबईतील प्रदुषणाचा महामुंबईकरांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम दाखवणारे आहेत.

 

Vatavaran Pollution Lungs study - (4)

15 जानेवारी रोजी खारघरच्या अत्यंत व्यस्त अशा चौकात उभारलेल्या पाढंऱ्या शुभ्र रंगाच्या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग अवघ्या 10 दिवसांत काळा पडला आहे. खारघर-तळोजा-पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायू प्रदुषणाबाबत सामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वातावरण फाउंडेशनने आखलेल्या एका आगळ्यावेगळ्या मोहिमेचा महत्वाचा भाग म्हणजे खारघरच्या चौकातली ही कृत्रिम फुफ्फुसं.

 

अशाच प्रकारची कृत्रिम फुफ्फुसांची जोडी जानेवारी 2020 मध्ये मुंबईच्या वांद्रे परिसरात उभारण्यात आली होती. ती फुफ्फुसंही केवळ 14 दिवसांत काळी पडली. तर, दिल्लीत नोव्हेंबर 2018 मध्ये तयार केलेली कृत्रिम फुफ्फुसे अवघ्या 6 दिवसांत काळी झाली.

 

या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचा विचार धोक्याची घंटा म्हणूनच केला जावा आणि या भागातल्या हवेचा पोत सुधारण्यासाठी त्वरित काही महत्वपूर्ण हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा खारघरवासी आणि काही तज्ञ मंडळी महाराष्ट्र सरकारकडून करत आहेत.

 

‘द बिलबोर्ड दॅट ब्रेथ्स’ असे शीर्षक देऊन ही कृत्रिम फुफ्फुसं खारघर येथील सेक्टर 7 मधील बॅंक ऑफ इंडिया चौकात उभारण्यात आली. वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांच्या मते, हवेचे अत्युच्च प्रदुषण झाल्याचं लक्षण दाखवणारा कोणतातरी एक घटक श्वासावाटे आपल्याही शरिरात जातो आहे, हेच या फुफ्फुसांच्या बदललेल्या रंगातून आपण ओळखू शकतो. आता गेल्या काही दिवसांत लॉकडाऊन उघडल्यानंतर रस्त्यावरची रहदारी तसेच, बांधकामं अशा गोष्टी पुन्हा सुरू झाल्याने वायू प्रदुषणाची पातळीही वाढत चालली आहे.

 

Vatavaran Pollution Lungs study - (5)

स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग काळा व्हायला सुरूवात झाली होती आणि सातच दिवसांत हा रंग करडा झाला. सोमवारी, 25 जानेवारीला मात्र या फुफ्फुसांचा रंग पूर्णतः काळा झाल्याचे आमच्या निदर्शनास आले, केसभट सांगतात. खारघरमधले स्थानिक रहिवासी प्रदुषित हवा श्वासावाटे आत घेत आहेत, हे पटवून देण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग असल्याचेही केसभट म्हणतात. स्थानिक रहिवासी या बिलबोर्डला भेट देतात. इतकेच नव्हे तर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमाल यांच्यासह सहा ते सात स्थानिक राजकीय नेत्यांनीही या ठिकाणाला भेट दिली आणि वाढत्या प्रदुषणाबद्दलची समस्या गांभीर्याने घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले.

 

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की खारघर-तळोजा-पनवेल परिसरातल्या वायू प्रदुषणाच्या या गंभीर समस्येचे निवारण करण्यासाठी सर्वच सामान्य लोकांनी एकत्र येऊन एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. स्थानिक रहिवासी रोज श्वासावाटे प्रदुषित, विषारी हवा शरिरात घेतात, याबद्दल चिंता व्यक्त करताना महापौर डॉ. कविता चौतमाल यांनीही हवेचा पोत तपासण्यासाठी आणि यामागचे कारण समजून घेऊन त्यावर उपाययोजना राबवण्यासाठी एका विशेष समितीची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.

 

Vatavaran Pollution Lungs study - (2)

खारघरवासी  प्रा. डॉ. सुदर्शन रणपिसे म्हणाले, गेली कित्येक वर्षे मी खारघर येथील प्रदूषणाने त्रस्त आहे. माझ्याकडील रुग्णांनीही याबाबत माझ्याकडे बोलून दाखवले आहे. प्रदूषणामुळे डोळे जळजळणे, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास, खोकला ही लक्षणे प्रामुख्याने जाणवतात. सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा ड्युटीवर जाताना प्रदूषण जास्त जाणवते.

 

शासनाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसते. वातावरण फाऊंडेशनने हवेच्या प्रदूषणाची पडताळणी करण्यासाठी कुत्रिम फुफ्फुसे सेक्टर ७ चौकात लावून प्रदूषणाची वाढलेली पातळी दाखवून दिली आहे. शासनाने या विषयात त्वरित लक्ष देऊन नागिरकांचे जीवन धोक्यातुन बाहेर काढावे ही विनंती.

 

स्थानिक रहिवासी श्रीनाथ कोलारे म्हणाले, ज्या वेगाने या फुफ्फुसांचा रंग पांढऱ्याचा काळा झाला आहे, तो वेग आम्हा स्थानिकांसाठी नक्कीच काळजीची आणि भितीची बाब आहे. एक छोटेसे उदाहरण म्हणूनच पहायचे झाले तर आम्ही, आमची मुले आणि इथले ज्येष्ठ नागरिक दररोज किती विषारी आणि प्रदुषित हवेत जगतो हे यातून लक्षात येते. गेल्या काही वर्षांत या भागांत घरे घेण्याचा लोकांचा ओढा वाढल्याने इथे बरीचशी नवीन बांधकामे सुरू झाली आणि त्याच घाईगर्दीत प्रशासनालाही या समस्येकडे पाहण्याची फुरसत मिळाली नाही. त्यामुळे वायू प्रदुषणावर लवकरात लवकर काही उपाययोजना आखण्यासाठी सामान्य लोकांनीच एकत्र येऊन काही ठोस पावले उचलणे आता अनिवार्य झाले आहे.

वातावरण फाउंडेशनतर्फे 13 नोव्हेंबर 2020 ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत हवेच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. यानुसार असे निदर्शनास आले की, खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील लोक दिवसांतून जवळपास 17 तास प्रदुषित हवेत श्वास घेतात. या अभ्यासांती असे स्पष्ट झाले की, या भागातल्या हवेत सकाळी 6 ते 8 या वेळात पर्टिक्युलर मॅटर पोल्युटंट म्हणजेच पीएम 2.5 हा घटक सर्वाधित असतो.

 

प्रदुषणाच्या आरोग्यावरील दुष्परिणाविषयी तज्ज्ञ काय सांगतात?

Vatavaran Pollution Lungs study - (3)

 

डॉ. संदीप साळवी

(संचालक, पल्मोकेअर रिसर्च अण्ड एज्युकेशन (PURE) फाउंडेशन, पुणे)

लहान मुले असोत वा ज्येष्ठ नागरिक. या नकली फुफ्फुसांचं जे होत आहे, तेच आपल्याही फुफ्फुसांचं होत आहे. काळ्या फुफ्फुसांमुळे अशी व्यक्ती असंख्या आजारांचं माहेरघर बनू शकते. यात अस्थमा आणि न्युमोनिटिस यांसारख्या आजारांपासून फुफ्फुसांच्या कर्करोगासारक्या गंभीर आजारांचाही समावेश असू शकतो. हवा प्रदुषणाचा गंभीर परिणाम आपले ह्रदय, मेंदू आणि मज्जासंस्थेवरही होतो. त्यामुळे, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. काही नवीन अभ्यासांती असेही दिसून आले आहे की, वाढत्या वायू प्रदुषणामुळे मधूमेह आणि लठ्ठपणाचे प्रमाणही वाढत चालले आहे. या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग फारच कमी काळात काळा झाला आहे. ही नक्कीच धोक्याची घंटा आहे आणि या समस्येवर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढण्याची गरज आहे, हेच यातून स्पष्ट होते.

 

डॉ. सलील बेंद्रे

(सल्लागार, पल्मोनोलॉजी आणि ब्रॉन्कोस्कोपी, नानावटी सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विले पार्ले)

खारघरमधल्या या कृत्रिम पण जीवंत फुफ्फुसांचा रंग बदलल्यामुळे आपल्या आजुबाजूच्या हवेत किती प्रदुषके आहेत आणि आपण दररोज किती धोकादायक हवा शरिरात घेतो हे स्पष्ट झाले आहे. हवेचे प्रदुषण हे फुफ्फुसांच्या आजारामागचे एक महत्वाचे कारण असून हवेतला कार्बन आणि हायड्रोकार्बन यामुळे फुफ्फुसांना मोठी हानी पोहोचते. प्रदुषण पातळी वाढेल तसा हवेतला कार्बनही वाढेल आणि अखेर, फुफ्फुसांच्या अत्यंत गंभीर अशा आजारांना आपण सर्वचजण आमंत्रण देऊ. वायू प्रदुषणावर नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज का आहे, हे या प्रकल्पातून स्पष्ट झाले आहे.

 

डॉ. प्रशांत छाजेड

(सल्लागार – चेस्ट मेडिसिन (पल्मोनोलॉजी), लंग केअर क्लिनिक, मुंबई)

मानवी फुफ्फुसांवर हवेतल्या प्रदुषकांचा किती आणि कसा गंभीर परिणाम होतो, हे दाखवणारा हा अतिशय सुंदर दृश्यात्मक प्रयोग आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, क्रोनिक आणि एपिसोडिक कफ, क्रोनिक ब्रॉंकायटिस, ऑबस्ट्रक्टिव्ह एअरवेज डिसीज, ऱ्हायनिटिस, कर्करोग, कार्डिओव्हॅस्क्युलर आजार आणि उच्च रक्तदाब अशा अनेक समस्या सांगणाऱ्या लोकांची वाढती संख्या आणि वाढचे वायू प्रदुषण याचा थेट संबंध आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे, वैयक्तिक शारीरिक नुकसानासोबतच एकूणच माणसांची सकारात्मक उत्पादकता कमी झाल्यामुळे याचे आर्थिक परिणामही गंभीर होऊ शकतात. आपल्या श्वास घेणाऱ्या या फुफ्फुसांना वाचवायचे असेल, तर वायू प्रदुषणावर त्वरित योग्य त्या उपाययोजना आखण्याची आता गरज आहे.

 


Tags: khargharlungspollutionvandrevatavaran foundationWhat pollution can do to your lungs in 10 days?खारघरप्रदुषणामुळे फुफ्फुसावर काय दुष्परिणाम होतो?फुफ्फुसवातावरण फाऊंडेशनवांद्रे
Previous Post

#नोकरीधंदाशिक्षण महावितरणमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी अप्रेंटिसशिपची करिअर संधी

Next Post

विराट कोहली, तमन्ना भाटिया अडचणीत का आले?

Next Post
Tamannaah_Bhatia_Virat_Kohli_PIL_

विराट कोहली, तमन्ना भाटिया अडचणीत का आले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!