मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर, ५० खोके एकदम ओके अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दिल्या जात आहे. ५० खोक्यांवरून सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात २ हजार ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला जाणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनाही इशारा दिला. दरम्यान शिंदे गटाकडून उल्लेख केला जाणारा अब्रुनुकसानीचा कायदा काय असतो, कशी कारवाई होते, हे जाणून घेऊया…
अब्रनुकसानीचा गुन्हा कसा होतो?
अशी कोणतीही मोठी व्यक्ती किंवा संघटना ज्यांच्या विरोधात कोणी असं विधान करत असेल, जेणेकरून त्याची प्रतिमा मलिन होत असेल तर असे कोणतेही विधान कधीही करू नका. त्यामुळे अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करता येतो. एखाद्यावर खोटे आरोप करणे आणि व्यक्तीच्या लौकिकाला बाधा पोहोचत असेल तर ही बदनामी मानली जाते. यामागील तर्क असा आहे की, व्यक्तीची प्रतिष्ठा हा संपत्तीचा, मालमत्तेचा भाग समजला गेला आहे.
अब्रुनुकसानीच्या गुन्ह्यात तीन महत्त्वाचे भाग
- १. बदनामीकारक साहित्य प्रकाशित करणे.
- २. लेखी किंवा तोंडी बदनामी.
- ३. अशी कारवाई जी कोणाची बदनामी करण्याच्या उद्देशाने केली आहे.
अब्रुनुकसानीच्या आरोपाखाली कायदेशीर कारवाईचे प्रकार काय आहेत?
- अब्रुनुकसानीपेरकरणी दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारे कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- दिवाणी कायद्यानुसार, पीडित व्यक्ती आपली बदनामी सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकते आणि आरोपीकडून आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करू शकते.
- भारतीय दंड संहितेच्या कलम १२४अ मध्ये राज्याविरुद्ध बदनामी करणे याला देशद्रोह म्हटले जाते.
- भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ मध्ये कोणत्याही समुदायाविरुद्ध बदनामी करणे समाविष्ट आहे, ज्याला उपद्रव म्हटले जाते.
भारतीय दंड संहितेतील कलम ४९९ ते ५०२ अब्रुनुकसानी संबंधित आहेत.
- कलम ४९९ अंतर्गत एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला पुढील कलमांनुसार शिक्षा होऊ शकते…
- कलम ५००: अब्रुनुकसानी आयपीसी ५०० अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीची बदनामी केली, तर त्याला दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.
- कोणत्याही व्यक्तीची त्याच्या आर्थिक हेतूसाठी बदनामी केल्यास कलम ५०२ अन्वये दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.