मुक्तपीठ टीम
१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानावर विजय मिळवला आणि नव्या बांग्लादेशाची निर्मिती झाली. १९६५ नंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. या दिवसाचं महत्त्व जाणण्यासाठी आपल्याला ५० वर्षे मागे जावं लागेल.चला तर मग जाणून घेऊया भारतीय पराक्रमानं कशी घडवली पाकिस्तानला अद्दल…
भारताने पाकिस्तानला का धडा शिकवला?
- पश्चिम पाकिस्तानच्या दडपशाही धोरणांमुळे पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोष वाढत होता.
- शेख मुजीबुर रहमान सुरुवातीपासून पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते.
- त्यासाठी त्यांनी १२ कलमी सूत्र तयार केले होते.
- त्यामुळे पाकिस्तान सरकारने त्याच्यावर खटलाही चालवला होता.
- पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र देश बनवण्यासाठी १९७० ची पाकिस्तानची निवडणूक महत्त्वाची होती.
- शेख मुजीबुर रहमान यांचा पक्ष पूर्व पाकिस्तानी अवामी लीग विजयी झाला होता.
- शेख मुजीबुर रहमान पक्षाला पूर्व पाकिस्तानात १६९ ते १६७ जागा मिळाल्या. त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं.
- पण पश्चिम पाकिस्तानच्या नेत्यांनी ते मान्य केले नाही आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
- देशाच्या सत्तेत योग्य प्रतिनिधित्व नसल्यामुळे पूर्व पाकिस्तानात निषेधाचा आवाज बुलंद झाला.
- लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले.
- ही चळवळ दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्करांनी अनेक क्रूर मोहिमा राबवल्या.
- खून आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच होत्या.
- या अत्याचारांपासून वाचण्यासाठी मोठ्या संख्येने लोक भारतात आश्रय घेऊ लागले, त्यामुळे भारतात निर्वासितांचे संकट वाढू लागले.
भारताने मुक्तीवाहिनीच्या मदतीचा निर्णय
- या सर्व अत्याचारांबाबत आणि निर्वासितांच्या वाढत्या संख्येबाबत भारत सतर्क होता.
- ३१ मार्च १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बंगालच्या लोकांना मदत करण्या, सांगितले.
- पश्चिम पाकिस्तानच्या अत्याचारांना तोंड देण्यासाठी पूर्व पाकिस्तानमध्ये मुक्ती वाहिनीची स्थापना करण्यात आली, मुक्तीवाहिनीला भारतीय लष्कराचे पूर्ण सहकार्य होते.
- संतप्त पाकिस्तानने ‘ऑपरेशन चंगेज खान’च्या नावाखाली ११ भारतीय एअरबेसवर हल्ला केला.
- या हल्ल्यानंतर ३ डिसेंबरला भारत अधिकृतपणे युद्धात सहभागी झाला.
- हे युद्ध १३ दिवस म्हणजे १६ डिसेंबरपर्यंत चालले.
- या दिवशी बांगलादेश स्वतंत्र झाला.
- तेव्हापासून हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
नौदलाने केले कराची बंदर बेचिराख!
- १९७१ मध्ये ४-५ डिसेंबरच्या रात्री भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ राबवले.
- त्यावेळी कराची बंदर पाकिस्तानसाठी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे होते.
- दिल्लीतील भारतीय नौदलाचे मुख्यालय आणि वेस्टर्न नेव्हल कमांडने एकत्रितपणे हे ऑपरेशन करण्याची योजना आखली.
- या कारवाईचा उद्देश कराचीतील पाकिस्तानी नौदलाच्या तळावर हल्ला करणे हा होता.
- भारतीय नौदलाच्या हल्ल्यात पाकिस्तानची चार जहाजे बुडाली आणि ५०० हून अधिक पाकिस्तानी खलाशांचा मृत्यू झाला.
- या हल्ल्यात कराची हार्बरचा इंधनसाठाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
- या कारवाईत प्रथमच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.
- या हल्ल्यानंतरच ८-९ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन पायथन’ राबवले.
- यादरम्यान भारतीय नौदलाने कराची बंदरांवर उपस्थित असलेल्या जहाजांवर हल्ला केला.
- या काळात एकाही भारतीय जहाजाचे नुकसान झाले नाही.
- या ऑपरेशनच्या यशानंतर, दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतात नौदल दिन साजरा केला जातो.
भारताचा पाकिस्तानला मोठा दणका!
- पाकिस्तानच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून भारताने त्यांच्या १५ हजार किलोमीटरहून अधिक भूभाग ताब्यात घेतला.
- पाकिस्तानी सशस्त्र दलाचे तत्कालीन प्रमुख जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी त्यांच्या ९३,००० सैनिकांसह भारतीय सैन्याला शरणागती पत्करल्याने युद्ध संपले.
- मात्र, भारताने १९७२ मध्ये पाकिस्तानसोबत सिमला करार केला.
- या करारानुसार भारताने पश्चिम आघाडीवर जिंकलेली जमीनही परत केली आणि पाकिस्तानी युद्धकैद्यांची सुटकाही केली.
- बांगलादेश पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त झाला आणि भारतीय सैन्य आपल्या मायदेशी परतले.