Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कॉर्पोरेट क्षेत्राची सह्रदयता, ऑक्सिजन सयंत्रं उभारणार, महाराष्ट्रासह देशात दहा!

October 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
honeywell

मुक्तपीठ टीम

कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरी संपलेली नाही. त्यामुळेच तिसरी लाट आलीच तर नागरिकांना त्रास होऊ नये यायाठी सरकारचे प्रयत्न सुरुच आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रत्येक रुग्णालय ऑक्सिजन सक्षण बनवणे. या लढ्यात सरकारला मदत करण्यासाठी हनीवेल देशभरात १० ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारणार आहे.त्यातील चार ही महाराष्ट्रातील पुणे, रत्नागिरी व सोलापूर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये उभारली जाणार आहेत. यातील पहिले संयंत्र पुण्यातील बोपोडी येथील स्व. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले.

 

“कोरोना साथीच्या काळात रुग्णांची काळजी घेण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सरकारसोबत भागीदारी करण्यात हनीवेलला आनंद आहे,” असे ‘हनीवेल इंडिया’चे प्रेसिडेंट आशिष गायकवाड म्हणाले. “कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर व पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास त्यांचा जीव वाचेल. या दृष्टीने ऑक्सिजन ही अत्यावश्यक वैद्यकीय सामग्री गणली जाते. सर्वांसाठी सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा आणि उत्तराखंडच्या दुर्गम जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६०० लिटर प्रति मिनिट (एलपीएम) क्षमतेची १० ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारण्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे,” असे ते पुढे म्हणाले.

 

‘अमेरिकेअर्स’च्या देखरेखीखाली महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये १० ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारण्याच्या ‘एचएचएसआयएफ’च्या वचनबद्धतेचा हा उपक्रम एक भाग आहे.

 

“हनीवेलची ही मदत अतिशय वेळेवर होणारी आणि केंद्रित स्वरुपाची आहे. ही ऑक्सिजन निर्मितीची संयंत्रे कोरोना साथीच्या काळात जीव वाचविण्यात मदत करतील आणि येत्या काही वर्षांपर्यंत सरकारी आरोग्य सुविधांमध्ये गंभीर उपचारांसाठीची गुणवत्ता सुधारण्यात मदत करतील, ” असे ‘अमेरिकर्स’चे एमडी व कंट्री डायरेक्टर श्रीपाद देसाई म्हणाले.

 

या प्रत्येक संयंत्रामध्ये ६०० एलपीएम ऑक्सिजन उत्पन्न करण्याची क्षमता आहे. ज्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात १५०हून अधिक खाटा असतील, तेथील गरज भागविण्यास एवढा ऑक्सिजन पुरेसा होईल. संयंत्रांचा एक वर्षाच्या वॉरंटीचा कालावधी संपल्यानंतर ती सुरळीत चालतील याची तजवीज करण्यासाठी संयंत्रांच्या वार्षिक देखभालीच्या कंत्राटाचा २ वर्षांचा खर्चही हनीवेलकडून भागविला जाईल.

 

पुण्यातील ऑक्सिजन निर्मिती संयंत्राचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. यामध्ये पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (आयएएस), पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचा समावेश होता.

 

“कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आकस्मिक योजनांवर पुणे महापालिका सक्रियपणे काम करीत आहे. गेल्या काही महिन्यांत, कोविड साथीच्या नियंत्रणासाठी आणि आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आमच्या प्रयत्नांत मदत करण्यासाठी ‘हनीवेल’चा आम्हाला मोठा पाठिंबा मिळाला आहे. कोविड केअर सेंटर उभारणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करणे अशी ही मदत आम्हाला मिळत आहे. पुण्यातील रुग्णालयासाठी ऑक्सिजन निर्मितीचे संयंत्र उभारले गेल्याने आम्ही समाधानी आहोत. हा एक दीर्घकालीन शाश्वततेचा उपाय आहे,” असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. ते पुढे म्हणाले, “कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुण्याला स्वावलंबी होण्यामध्ये ‘हनीवेल होमटाउन सोल्यूशन्स इंडिया फाउंडेशन’चा हातभार लागत आहे, ही बाब फार मोलाची आहे.”

 

या उपक्रमाबाबत सविस्तर सांगताना, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (आयएएस) म्हणाले, “कोरोना साथीच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे पुणे शहराला सर्वाधिक फटका बसला, ही बाब सर्वजण जाणतात. आमच्या आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आम्ही सतत लढत आहोत. आम्हाला ‘हनीवेल’ने चांगले सहकार्य केले आहे आणि गेल्या काही महिन्यांत आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नात सहाय्य करण्यासाठी ‘हनीवेल’ने उल्लेखनीय कामही केले आहे. ‘हनीवेल’ने दान केलेल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्राने पुण्यातील रुग्णांना जीवरक्षक ऑक्सिजनचा पुरवठा मिळण्यात मदत होणार आहे.”

 

कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने देशातील आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण आला. तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सरकारने विविधांगी काळजी घेत रणनीती आखली आहे. यामध्ये हनीवेल कंपनी आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) माध्यमातून सरकारला आरोग्यसेवेच्या क्षमता निर्माण करण्यात मदत करीत आहे. याआधी, ‘एचएचएसआयएफ’ने नैनीताल, गुरुग्राम, दिल्ली आणि पुणे येथे कोविड केअर सेंटर्सची स्थापना केली होती, तसेच मुंबई आणि बंगळुरूमध्ये १० खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू केला होता. कंपनीने देशभरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांना १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, १० व्हेंटिलेटर्स, १० हजार एन-९५ रेस्पिरेटर्स आणि २५०० पीपीई किट या वस्तू देणगीदाखल दिलेल्या आहेत.

 

‘संरक्षण संशोधन विकास संस्था’ (डीआरडीओ) आणि ‘वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद-भारतीय पेट्रोलियम संस्था’ (सीएसआयआर-आयआयपी) यांच्याशी हनीवेलने भागीदारी केली आहे. देशात वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीची संयंत्रे उभारण्यास गती मिळावी, याकरीता लागणाऱ्या ‘मॉलिक्युलर सीव्ह अॅडसॉर्बंट’चा (एमओपी) पुरवठा करणे त्यातून ‘हनीवेल’ला शक्य होणार आहे.

 

महाराष्ट्रात मुंबईतील दहिसर येथील कोरोना जंबो सेंटरमध्ये अतिदक्षता विभाग हनीवेलने उभारला आहे. तसेच पुण्यातील बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयात २० खाटांचे कोविड उपचार केंद्रही स्थापन केले आहे. ‘हनीवेल’ने राज्यात १२० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, एन-९५ रेस्पिरेटर्स आणि पीपीई किट यांचेही दान केलेले आहे.

 

About Honeywell India

Honeywell (www.honeywell.com) is a Fortune 100 technology company that delivers industry-specific solutions that include aerospace products and services; control technologies for buildings and industry; and performance materials globally. Our technologies help everything from aircraft, buildings, manufacturing plants, supply chains, and workers become more connected to make our world smarter, safer, and more sustainable. All of Honeywell’s global businesses have a strong legacy in India, built over the last eight decades. Honeywell’s India commitment is evident in three state-of-the-art manufacturing and engineering operations, and four global centers of excellence for technology development and innovation. Honeywell employs ~13,000 people across different locations including Bengaluru, Chennai, Dehradun, Gurugram, Hyderabad, Madurai, and Pune.

About Honeywell Hometown Solutions India Foundation (HHSIF)

Honeywell Hometown Solutions India Foundation (HHSIF) is a not-for-profit organization that deploys Honeywell’s corporate social responsibility (CSR) efforts in five critical areas: education and skill development, gender equality, natural resources and the environment, holistic rural development, and disaster management. HHSIF’s programs include Honeywell Student Empowerment Program an upskilling program in deep science subjects for women and youth to build a future-ready workforce; creating Honeywell Model Villages by promoting holistic rural development; incubation and seed capital support to startups in deep science through Honeywell Start-up Support Program; Honeywell Center for Advancing Girls in Science at Avasara Academy to promote STEM education among girls; lake rejuvenation and establishment of global center of excellence for clean and affordable energy and Honeywell COVID-19 relief.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ashish gaikwadcoronahoneywell indiaMaharashtraoxygenpuneratnagirisolpurआशिष गायकवाडऑक्सिजनपुणेमहाराष्ट्ररत्नागिरीसोलापूरहनीवेल इंडिया
Previous Post

रशियन अभिनेता-अभिनेत्री अंतराळात, पहिल्यांदाच स्पेस स्टेशनवर चित्रपट शुटिंग

Next Post

आता मुंबईमध्ये टाटा पॉवरचं वीज वितरणात रिअल-टाइम एआय ऑटोमेशन

Next Post
tata power

आता मुंबईमध्ये टाटा पॉवरचं वीज वितरणात रिअल-टाइम एआय ऑटोमेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!