Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईकरांना अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

November 1, 2022
in सरकारी बातम्या
0
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली BMC मुख्यालय येथे आढावा बैठक 1

मुक्तपीठ टीम

राज्य शासन, जिल्हा वार्षिक योजना तसेच महानगरपालिका अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तथापि, आवश्यकतेनुसार नाविण्यपूर्ण योजनेतून शहरातील विविध भागांमध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.             

मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे, सर्वश्री आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुपेकर, महानगरपालिकेतील संबंधित विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते.            

पालकमंत्री श्री. केसरकर यांनी महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना जेथे निधीची अथवा यंत्रसामग्रीची आवश्यकता आहे, तेथे त्या जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पुरविल्या जातील, असे सांगितले. शहरातील मलनि:सारण करणाऱ्या वाहिन्या दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांच्या देखभालीचे सर्वोत्तम पर्याय वापरा, असेही त्यांनी सांगितले.            

श्री. केसरकर म्हणाले, नागरिकांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा देताना महालक्ष्मी मंदीर, हाजीअली परिसरात पार्किंगची सुविधा निर्माण करावी. सौंदर्यीकरण करताना अत्यावश्यक सेवांना प्राधान्य द्यावे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शहरातील जलतरण तलावांची संख्या वाढवावी, कामगार मैदान येथे उपलब्ध असलेल्या जलतरण तलावाचा विकास करून ऑलिंपिक दर्जाचे मैदान, रनिंग ट्रॅक तयार करावे. यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये मलनि:सारण वाहिनी, पाणीपुरवठा, स्मशानभूमी, शौचालये आदी मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात यावा. चौपाट्यांवर स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.            

शिक्षण क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे नाव उज्ज्वल व्हावे, यादृष्टीने दर्जा वाढवून मुंबईचा पॅटर्न निर्माण करावा, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यकतेनुसार शासनाकडून मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित केला जातो. यातील ओल्या कचऱ्याचे जागेवरच कंपोस्टिंग करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आधुनिक यंत्रांचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी फिरती रूग्णालये तयार करावीत, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारी केंद्रे उभारावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


Tags: Guardian Minister Deepak KesarkarMaharashtramumbaiपालकमंत्री दीपक केसरकर
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला साताऱ्यातील पर्यटन विकासकामांचा आढावा

Next Post

महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
Hon DCM Press Conf 1

महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!