Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

लेह-लडाख येथे भारतातील पहिले हरित हायड्रोजन इंधन केंद्र!

June 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Green Hydrogen Fuel Center Leh-Ladakh

मुक्तपीठ टीम

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NTPC लेह, लडाख येथे भारतातील पहिले हरित हायड्रोजन इंधन केंद्र उभारणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेमुळे लेह आणि आसपासच्या परिसरात उत्सर्जन मुक्त वाहतुकीच्या नवीन युगाची सुरुवात होईल. या नव्या हरित दळणवळण क्षेत्रामध्ये आघाडी घेणार्‍या काही मोजक्या देशांपैकी भारत एक असेल. सुरुवातीला एनटीपीसी या प्रदेशात ५ हायड्रोजन इंधन सेल बस चालवण्याची योजना आखत आहे. हे काम उभारण्याचे काम अमारा राजा पॉवर सिस्टिम्स लिमिटेडला देण्यात आलं आहे.

हा पथदर्शी प्रकल्प लेहच्या आत्यंतिक टोकाच्या परिस्थितीमध्ये समुद्रसपाटीपासून ३६०० मीटर उंचीवर -१४ अंश ते +२० अंश सेल्सिअस तापमानातील फरकासह उभारला जात आहे. १.३ अब्ज डॉलर्सच्या अमारा राजा समूहाचा एक भाग असणाऱ्या अमारा राजा पॉवर सिस्टीम्सची त्यांच्या तांत्रिक कौशल्यावर आधारावर या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निवड करण्यात आली. २०७० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने हा सरकारचा पहिला उपक्रम आहे. राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियानाचा एक भाग असलेला हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी आणि स्टोरेज प्रकल्पांचा अग्रदूत असेल. तसेच देशभरात सर्वत्र अनेक इंधन केंद्रांचा अभ्यास आणि उभारणीसाठी उपयुक्त ठरू शकेल.

पुनर्वापर उर्जा स्त्रोतांद्वारे निर्माण केलेल्या विजेद्वारे इलेक्ट्रोलिसिस पद्धती वापरून हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये पाण्याचे विभाजन करून ग्रीन हायड्रोजन तयार केले जाईल अशा प्रकारे हायड्रोजन उत्पादित केल्याने कार्बनफूटप्रिंट राहणार नाही. या प्रतिष्ठित प्रकल्पाबद्दल बोलताना, अमारा राजाचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य गौरिनेनी म्हणाले, “गेल्या तीन दशकांपासून आम्ही पॉवर सिस्टीम आणि एनर्जी स्टोरेजच्या व्यवसायात आहोत आणि या काळात आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या शिखरावर राहण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील संभाव्य ऊर्जा स्त्रोत म्हणून हायड्रोजन असून त्यासाठी यासारखे प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहेत. एनटीपीसीचे विशासू कंत्राटदार म्हणून सेवा सुरू ठेवण्याचा आम्हाला सन्मान वाटतो.”

ईपीसी विभागाचे व्यवसाय प्रमुख द्वारकानधा रेड्डी पुढे म्हणाले, “हा आव्हानात्मक प्रकल्प आमच्या ईपीसी कौशल्याची पुष्टी करेल आणि ग्रीन हायड्रोजन पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रवेश करणारे पहिले असल्याबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत.”

हा पथदर्शी प्रकल्प ९९.९७7% शुद्ध हायड्रोजनचे किमान ८०किलोग्रॅम/दिवस उत्पादन करेल. तो कॉम्प्रेस्ड, साठवला जाईल आणि वितरित केला जाईल.

अमारा राजा समुहा बद्दल

अमारा राजा हे भारतातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक आहेत ज्यामध्ये लीड-अॅसिड बॅटरीज (AMARON ब्रँड), पॉवर कन्व्हर्जन उत्पादने, शीट मेटल उत्पादने, प्लॅस्टिक मोल्डिंग, अचूक घटक, इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा, पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक सेवा, अन्न प्रक्रिया, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांचा समावेश आहे. अमारा राजा भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक बॅटरी उत्पादकांपैकी एक आहे आणि जगभरातील अनेक देशांना त्याची उत्पादने निर्यात करते. समूह १६,००० हून अधिक लोकांना रोजगार देत असून त्यांची उलाढाल १.३ अब्ज डॉलर इतकी आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Amara Raja Power Systems Limitedgood newsGreen Hydrogen Fuel CenterIndiaLEH LADAKHmuktpeethNational Thermal Power Corporation Limitedअमारा राजा पॉवर सिस्टिम्स लिमिटेडचांगली बातमीनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनभारतमुक्तपीठलेह-लडाखहरित हायड्रोजन इंधन केंद्र
Previous Post

देशात टाकाऊ पोलादापासून तयार केलेला पहिला सहापदरी महामार्ग!

Next Post

वारकऱ्यांसाठी पंढरपुरात एसटीकडून आरोग्य शिबिर, पिण्याचे स्वच्छ पाणीही!

Next Post
Health Camp for Warkaris

वारकऱ्यांसाठी पंढरपुरात एसटीकडून आरोग्य शिबिर, पिण्याचे स्वच्छ पाणीही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!