मुक्तपीठ टीम
देशातील कुपोषण आणि पोषणमूल्यांची कमतरता दूर करण्यासाठी केंद्राने गंभीरतेने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी अधिक पोषणमूल्य पुरवणारे तांदूळ सामान्यांना मिळावे, यासाठी खास योजना आखली गेली आहे. त्यासाठी तांदूळ मिल चालकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने भारतीय अन्न महामंडळाच्या समन्वयाने एप्रिलपासून पोषणयुक्त तांदुळाच्या वितरणाची योजना आखली आहे. पोषणयुक्त तांदुळाला क्षमता दीड लाख मेट्रिक टनांवरून साडेतीन लाख मेट्रीक टन केली आहे. यासाठी तांदुळ गिरणीचालकांना प्रोत्साहन देत जागृत केले आहे. सध्या तांदूळ गिरणीचालक आणि बँकांना जोडणारी कोणतीही योजना नाही. मध्यम, लघू, सूक्ष्म उद्योगात आत्मनिर्भर भारत निधी योजनेच्या विविध तरतुदींनुसार गिरणीचालकांना बँकांशी जोडण्याचे काम राज्य सरकार करणार आहेत. पोषणयुक्त तांदळाची किंमतही वाढवण्यात आलीय.
पोषक मूल्यांची कमतरता दूर करण्यासाठी पोषणयुक्त तांदुळ आणि त्याच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने केन्द्र पुरस्कृत पथदर्थी योजनेला तीन वर्षांसाठी मंजूरी दिली आहे. यासाठी एकूण १७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने, भारतीय अन्न महामंडळाच्या समन्वयाने एप्रिल २०२१ पासून पोषणयुक्त तांदुळाच्या वितरणाची आयसीडीएस/एमडीएम अंतर्गत योजना आखली आहे. पोषणयुक्त तांदुळाला चालना देण्यासाठी त्याची क्षमता १५,००० मेट्रीक टनांहून वाढवत ३.५ लाख मेट्रीक टन केली आहे. यासाठी तांदुळ गिरणीचालकांना प्रोत्साहन देत जागृत केले आहे. सध्या तांदूळ गिरणीचालक आणि बँकांना जोडणारी कोणतीही योजना नाही. मध्यम, लघू, सूक्ष्म उद्योगात आत्मनिर्भर भारत निधी योजनेच्या विविध तरतुदीं अतंर्गत गिरणीचालकांना बँकांशी जोडावे असे पत्र राज्यांना पाठवले आहे. याबरोबरच पोषणयुक्त तांदुळाची वाढीव किंमत ०.७३/किग्रॅ इतकी निश्चित केली. यात एफआरके खरेदी आणि वाहतुक, प्रक्रीया किंमत, घसारा, (प्रयोगशाळेतील चाचणी, जमा करण्याचे शुल्क) आदींचा समावेश आहे.
पोषणयुक्त तांदूळ पथदर्शी योजना सध्या सहा राज्यांमध्ये
• केन्द्र पुरस्कृत पोषणयुक्त तांदूळ पथदर्शी योजनेवर सध्या सहा राज्यात अंमलबजावणी केली जात आहे.
• आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश यांनी पथदर्शी योजने अतंर्गत पोषणयुक्त तांदुळाच्या वितरणाला सुरुवात केली आहे.
• संबंधित राज्यांमधे पोषणयुक्त तांदुळाचा किती वापर होत आहे याचे मुल्यांकन/ तुलना करण्यासाठी मूळ आणि अंतिम अशी मर्यादा रेषा आखून अभ्यास करावा असे केंद्राने राज्यांना सांगितले आहे.
• नीती आयोगही आपल्या नव भारत@75 धोरणांतर्गत सरकारी कार्यक्रमात पोषणयुक्त धान्य अनिवार्य करण्याबाबत विचार करत आहे.
• टिपीडीएस(एनएफएसए) आयसीडीएस, मध्यान्ह भोजन योजना (एमडीए) इत्यादींचा यात समावेश आहे.
• भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणन संस्थेच्या (FSSAI) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खर्च विभागाच्या सचिवांना, १ जानेवारी २०२४पासून पोषणयुक्त तांदूळ अपरिहार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पोषणयुक्त तांदूळ कशासाठी?
• पोषणयुक्त तांदूळ हा परवडणारा उत्तम आहार आहे.
• यात जीवनसत्वे, खनिजे यांचे मुबलक प्रमाण आहे.
• पोषण सुरक्षेच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे.
• देशातील अशक्तपणा आणि कुपोषणा विरोधातल्या लढ्यातील ही महत्वाची रणनीती आहे.
पाहा व्हिडीओ: