Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशभरातील राज्यांमध्ये वैद्यकीय साधनांच्या उत्पादनाला चालना

December 13, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Medical equipment

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकार वैद्यकीय साधनांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देत आहे. सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, उच्च प्रतीची डिजिटल क्ष-किरण तपासणी, डिजिटल मॅमोग्राफी, लिनीयर अॅक्सिलरेटर इत्यादींसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्तम दर्जाच्या आधुनिक वैद्यकीय साधने आणि यंत्रांसाठी अनेक उत्पादनविषयक परवानग्या जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, या आधुनिक यंत्रांपैकी अनेक यंत्रे विविध देशांतून आयात देखील करण्यात येत आहेत.

औषधनिर्माण विभागाने वैद्यकीय साधनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या साधनांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने निश्चित कार्यक्रमानुसार खालील उपाययोजना हाती घेतल्या आहेत :

“वैद्यकीय साधनांना प्रोत्साहन देण्यासाठीचे पार्क” या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये वैद्यकीय साधनांच्या पार्कमधील सामायिक सोयीसुविधांची उभारणी करण्यासाठी यातील प्रत्येक राज्याला १०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या पार्क्समध्ये नेहमीच्या सर्व तपासण्या तसेच चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची सुविधा इत्यादींसाठी लागणाऱ्या साधनांची निर्मिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे यासाठी या  वैद्यकीय साधनांचा उत्पादन खर्च लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि त्यातून देशात वैद्यकीय साधनांच्या उत्पादनांसाठी एक सशक्त पूरक व्यवस्था निर्माण करण्यास मदत होईल. या उपक्रमातील ३० कोटी रुपयांचा पहिला हप्ता वर उल्लेखलेल्या प्रत्येक राज्याला देण्यात आला आहे.

“सामायिक सुविधा केंद्रांसाठी लागणाऱ्या वैद्यकीय साधनांच्या उत्पादनासाठी मदत” या उप-योजने अंतर्गत आंध्रप्रदेशमधील आंध्रप्रदेश मेडटेक झोन या कंपनीला २५ कोटी रुपयांचे मदत अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सुपर कंडक्टींग मॅग्नेटिक कॉईल टेस्टिंग आणि संशोधन सुविधा उभारण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे.

औषध निर्माण विभागासाठीच्या उत्पादनावर आधारित मदत योजनेअंतर्गत, आर्थिक वर्ष २०२०-२०२१ ते २०२८-२०२९ या काळासाठी पाच उद्योगांची निवड करण्यात आली असून त्यांना या काळात निदानविषयक वैद्यकीय साधनांच्या निर्मितीसाठी या योजनेतून मदत करण्यात येईल.

वैद्यकीय साधनांच्या देशांतर्गत निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ३,४२० कोटी रुपये खर्चाच्या  उत्पादनावर आधारित मदत योजनेअंतर्गत, आर्थिक वर्ष २०२०-२०२१ ते २०२८-२०२९ या काळासाठी, निवडक कंपन्यांना आर्थिक मदत दिली जाईल. या कंपन्यांनी ५ वर्षांच्या काळात भारतात निर्मित वैद्यकीय साधनांच्या विक्रीत दर वर्षी ५% दराने वाढीव विक्री करणे अपेक्षित आहे.

रोपणयोग्य इलेक्ट्रॉनिक साधनांसह सर्व प्रकारचे रोपण या योजनेअंतर्गत एकूण २१ अर्जदारांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. निवड झालेल्या अर्जदारांची नावे औषधनिर्माण विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.


Tags: Dr. bharati pawargood newsGood news MorningMedical Equipmentsगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगवैद्यकीय साधन
Previous Post

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

नासा: ४० हजार किमीच्या वेगाने चंद्राहून पृथ्वीवर परतली अमेरिकेची ओरियन कॅप्सुल

Next Post
NASA capsule Orion

नासा: ४० हजार किमीच्या वेगाने चंद्राहून पृथ्वीवर परतली अमेरिकेची ओरियन कॅप्सुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!