मुक्तपीठ टीम
बऱ्याच वर्षानंतर यंदा कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. जागतिक बाजारपेठेत कापसाचे दर वाढले असून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय कापूस उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे. २०२०-२१ मध्ये २०१९-२० च्या तुलनेत देशाची कापूस निर्यात ७ कोटी गाठींपर्यंत वाढू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.
अनलॉक झाल्यानंतर कापसाचा व्यवसाय वेगाने वाढू लागला आहे. त्याची मागणीदेखील वाढली आहे. आता सूत गिरण्या त्यांच्या एकूण क्षमतेच्या ९० ते ९५% कार्यरत आहेत. त्या दृष्टीने यावर्षी कापसाची निर्यात मागील हंगामाच्या ६ लाख गाठींपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे. सध्या कापसाचा घाऊक दर ५,३०० ते ५,४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहे. निर्यातीच्या मागणीमुळे याची किंमत आणखी वाढू शकते.
जाणकारांच्या मते कोरोना महामारीमुळे कमी झालेला खप आता पुन्हा एकदा पुर्नस्थितीत आला आहे. गेल्या दोन महिन्यांत सेंद्रिय कापसाचे दर ८ टक्क्यांनी वाढून १२ टक्के झाले आहेत. देशांतर्गत मेडिकल टेक्सटाइल सेक्टरसह आंतराष्ट्रीय बाजारपेठ चांगली खरेदी करीत असल्याने ही वाढ कायम राहील.”
नॅशनल टेक्सटाईल पॉलिसीमध्ये १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे ध्येय ठेवले आहे. भारताला ग्लोबल टेक्सटाईल प्लेअर बनविण्याचे ध्येय समोर ठेवले गेले आहे. त्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत स्वदेशी यंत्रसामग्री तयार करण्याचे धोरण आहे. या धोरणानुसार देशभरात सात मेगा टेक्सटाईल हब उभारण्याची अपेक्षा आहे. तयार झालेल्या उत्पादनांच्या कच्च्या मालापासून तयार होणारे सर्व उत्पादन या केंद्रांवर उपलब्ध असतील. याचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
पाहा व्हिडीओ: