मुक्तपीठ टीम
दक्षिण भारतातील अग्रगण्य खासगी डेअरी कंपनी आणि ‘गोदरेज अॅग्रोव्हेट’ या भारतातील सर्वात मोठ्या व वैविध्यपूर्ण कृषी व्यवसायाची उपकंपनी असलेल्या ‘गोदरेज जर्सी’ने नटी बदाम फ्लेवर्ड दूध सादर करीत असल्याची घोषणा आज येथे केली. दुधाचा पौष्टिकपणा आणि बदामाचा कुरकुरीतपणा यांनी युक्त असलेले हे दूध आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या ग्राहकांसाठी पोषण, हायड्रेशन आणि प्रथिने यांचे उत्कृष्ट मिश्रण मिळवून देणार आहे.
फुल-क्रीम दुधाने बनवलेले आणि खऱ्या बदामाच्या तुकड्यांनी भरलेले हे दूध अशा ग्राहकांसाठी एक आरोग्यदायी पेय आहे, जे आरोग्यदायी व पोटभर पेय पिण्यास प्राधान्य देतात आणि ज्यांना पौष्टिक बदाम खायलाही आवडतात.
तहान शमवण्याचा आणि शरीरातील प्रथिनांचे प्रमाण सुधारण्याचा फ्लेवर्ड दूध हा एक आरोग्यदायी व पौष्टिक मार्ग आहे. बदामाच्या दुधाची चव पारंपरीकपणे सर्वांनाच आवडते आणि सांस्कृतिकदृष्ट्या या दुधाचे महत्त्वही मोठे आहे. हे तहान भागवणारे पौष्टिक पेय तर आहेच, त्याशिवाय बहुसंख्य भारतीय ग्राहकांमध्ये नॉस्टॅल्जिया वाढवणारे हे दूध आहे. या उत्पादनाच्या या फायद्यांचा विचार करूनच, गोदरेज जर्सीच्या ‘नटी बदाम दुधा’ची टॅगलाइन, ‘यम्मी दुध, कुरकुरीत बदाम’, अशी ठेवण्यात आली आहे. ग्राहकांच्या बदलत्या धारणा आणि दुधाच्या वापराचे समर्थन त्यातून व्यक्त होते.
‘कार्वी इनसाइट्स’च्या ‘साउथ इंडिया प्रोटीन गॅप स्टडी’मध्ये (२०१९) असे दिसून आले आहे, की केवळ ३२ टक्के प्रौढ लोक दुधाचे सेवन करतात आणि वाढत्या वयाबरोबर त्याचा वापरही कमी होतो. प्रौढांना दही किंवा पॅकेज्ड मिल्क ड्रिंक्ससारखे व्यापक पर्याय हवे असतात. फ्लेवर्ड दूध हे पॅकेज दुधाच्या पेयाची गरज पूर्ण करते. दक्षिणेकडील राज्यांमध्ये अनेक घरांमध्ये फ्लेवर्ड दूध अत्यंत आवडीने प्यायले जाते.
हे नवीन उत्पादन सादर करताना ‘गोदरेज जर्सी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सुरी म्हणाले, “भारत हा दुधाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे आणि तरीसुद्धा भारतात दरडोई दुधाचा वापर तुलनेने कमी आहे. फ्लेवर्ड दुधाच्या क्षेत्रातीस अग्रगण्य ब्रँड म्हणून आम्ही ‘नटी बदाम दूध’ सादर करून भारताला निरोगी जीवनशैलीकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. अत्यंत चविष्ट आणि खऱ्या बदामांनी युक्त अशा या दुधामुळे ग्राहकांना प्रथिनयुक्त, पौष्टिक आणि चवदार पेय मिळते.”
फ्लेवर्ड मिल्क ही एक आश्वासक श्रेणी आहे जी नियमित दुधाच्या सेवनात येणारे अडथळे दूर करत आहे. यात पोटॅशियम, प्रथिने, जस्त, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी, ए आणि बी-१२ यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे. हे दूध स्नायू घडविण्यात आणि ते दुरुस्त करण्यात मदत करते आणि त्यामुळे हे व्यायामानंतरचे, हायड्रेशनसाठीचे आदर्श पेय आहे. रोग प्रतिकारशक्ती, चयापचय आणि त्वचेचा पोत सुधारण्यास, हाडे तयार करण्यास, निरोगी दातांना प्रोत्साहन देण्यास आणि शरीरातील कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण करण्यास हे दूध मदत करते.
या उद्योगाच्या अंदाजानुसार, २०२१मध्ये भारतातील फ्लेवर्ड दुधाची बाजारपेठ ३३.२ अब्ज रुपये इतकी होती. ‘आयएमएआरसी’ समुहाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २०२२-२०२७ या कालावधीत या उद्योगामध्ये २६.०१ टक्क्यांची दरसाल वाढ होईल आणि २०२७ पर्यंत यातील उलाढाल १२७.७ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल, अशे अपेक्षा आहे.
‘गोदरेज जर्सी नटी बदाम दूध’ आता दक्षिणेकडील पाचही राज्यांमध्ये, म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये उपलब्ध असेल. या २०० मिली दुधाची किंमत ४० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.