मुक्तपीठ टीम
कोणताही उद्योगपती म्हटलं की त्यांच्या मालमत्तेची चर्चा होतेच होते. त्यांची आलिशान जीवनशैली, गाड्या, खर्च सारंच बातमीचा विषय बनते. पण आज मुक्तपीठ अशा एका उद्योगपतीची माहिती देत आहे, ज्याने आपल्या तब्बल ५०० कर्मचाऱ्यांना कोट्यधीश बनवलं आहे. त्यांचे दोन तृतीयांश कर्मचारी कंपनीमध्ये भागधारक आहेत.
कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे बीएमडब्ल्यू असावी…
- आयटी क्षेत्रातील फ्रेशवर्क्स इंक ही कंपनी सध्या कर्मचाऱ्यांच्या भरभराटीच्या धोरणामुळे गाजत आहे.
- फ्रेशवर्क्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ गिरीश मातृभूतम यांच्या वेगळ्या धोरणांमुळे ते चर्चेत आहेत.
- गिरीश म्हणतात, स्वत:साठी बीएमडब्ल्यू खरेदी करण्यासाठी मी ही कंपनी सुरू केलेली नाही. मला कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे बीएमडब्ल्यू असावी असे वाटते!
फ्रेशवर्क्सची अमेरिकन शेअर बाजारात विक्रमी धडक
- बिझनेस सॉफ्टवेअर फर्म फ्रेशवर्क्स इंकने बुधवारी अमेरिकन एक्सचेंज (NASDAQ) वर धडक दिली.
- NASDAQवर सूचीबद्ध होणारी ही भारतातील पहिली सॉफ्टवेअर एज सर्व्हिसेस (सास) आणि युनिकॉर्न कंपनी आहे.
- गिरीश मातृभूतम यांच्या कंपनीचे शेअर्स त्याच्या इश्यू किमतीपेक्षा २१ टक्के प्रीमियमने नॅसडॅक इंडेक्समध्ये दाखल झाले.
- कंपनीचे मार्केट कॅप १२ अब्ज डॉलर्सवर पोहोचले.
- भारताऐवजी अमेरिकेन शेअर बाजारात कंपनी लिस्टेड करण्याबाबत ते म्हणाले की, ‘फ्रेशवर्क्स’ ही स्थापनेपासून जागतिक कंपनी आहे.
- त्यांचे ग्राहक १२०हून अधिक देशांमध्ये आहेत आणि त्यांचा सर्वाधिक महसूल अमेरिकेतून येतो.
गिरीश मातृभूतम यांचे ‘फ्रेश’ विचार!
- गिरीश मातृभूतम यांची पार्श्वभूमी व्यावसायिक घराण्याची नाही.
- त्यांचे वडील बँकेत काम करत होते.
- ते स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करायचे.
- म्हणूनच सामान्य कर्मचाऱ्यांच्या स्वप्नांची त्यांना जाणीव आहे.
- त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितले होते की मी स्व:तासाठी बीएमडब्ल्यू खरेदी करण्यासाठी ही कंपनी सुरू केलेली नाही, परंतु प्रत्येक कर्मचाऱ्याकडे बीएमडब्ल्यू असावे असे मला वाटते. स्वप्न पाहणे ही यशाची पहिली पायरी आहे.
- कंपनीच्या यशाचे श्रेय ते आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना देतात.
- फ्रेशवर्क्सला मोठं करण्यात फक्त त्यांची मेहनत नसून, सर्वांनी मिळून कंपनीला मोठं केलं आहे, असं ते कृतज्ञतेनं सांगतात.
‘फ्रेशवर्क्स’मुळे तरुण वयातच कोट्यधीश!
- ‘फ्रेशवर्क्स’ आता पब्लिक लिमिटेड झाल्यामुळे कंपनीचे ५०० कर्मचारी कोट्यधीश झाले आहेत. त्यापैकी ६९ भागधारक हे तिशीतील आहेत.
- फ्रेशवर्क्सचे दोन तृतीयांश कर्मचारी भागधारक आहेत.
- ज्यांनी कंपनी बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली त्यांना बक्षीस मिळाले पाहिजे, गिरीश यांचे धोरण आहे.
‘फ्रेशवर्क्स’ची ११ वर्षे…शून्यातून शिखराकडे!
- ‘फ्रेशवर्क्स’ची सुरूवात २०१०मध्ये झाली.
- तेव्हा गिरीश मातृभूतम आणि शान कृष्णस्वामी यांनी क्लाउड बेस्ड कस्टमर सर्विस साँफ्टवेअर वर काम सुरू केले होते.
- ते त्यांच्या मित्रांमध्ये G म्हणून प्रसिद्ध होते.
- त्यांनी विज्ञान विद्यापीठ, तंजावरमधून पदवी घेतल्यानंतर झोहोमध्ये काम केले.
- फ्रेशवर्क्सची स्थापना होईपर्यंत जगातील अनेक कंपन्या या क्षेत्रात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्याच्या यशाबद्दल शंका घेतली जात होती.
- फ्रेशवर्क्सला २०११मध्ये पहिले भांडवल मिळाले.
- एक्सेलने यात १ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली.
- त्याच वर्षी कंपनीला पहिला ग्राहकही मिळाला.
- फ्रेशवर्क्सने नंतर विक्री आणि सीआरएम समाविष्ट करण्यासाठी त्याच्या उत्पादनाची श्रेणी वाढवली.
- तसेच फ्रेशवर्क्सला फ्रेशडेस्क म्हणून रीलाँच करण्यात आले.
- २०२१ मध्ये त्याची वार्षिक कमाई ४९ टक्यांनी वाढून डॉलर्स दशलक्ष झाली.
- आता आपल्या अनुभवांमुळे आता नव्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक फंड देखील तयार केला आहे.