मुक्तपीठ टीम
आसामला दरवर्षी पावसाळ्यात पूराचा फटका बसतोच. आसामचे पूरामुळे अतिशय नुकसान होते. पुरामुळे आसाममधील परिस्थिती गंभीर बनली आहे. आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील २८ जिल्ह्यांतील १९ लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, होजई, नलबारी, बजाली, धुबरी, कामरूप, कोक्राझार आणि सोनितपूर जिल्ह्यात मृत्य लोकांची संख्या नोंदवली गेली आहेत. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे २ हजार ९३० गावे पाण्यात बुडाली.
आसाममधील पुरामुले ४३,३३८.३९ हेक्टर पीक जमीनही पाण्याखाली गेली आहे. तसेच ४१० जनावरं वाहून गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत. राज्यातील जवळपास सर्वच नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. सध्या १ लाख ०८ हजार १०४ पूरग्रस्त लोक ३७३ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. दिमा हासाओ, गोलपारा, मोरीगाव, कामरूप आणि कामरूप महानगर जिल्ह्यात भूस्खलनाची नोंद झाली आहे.
आसाममधील पुराची कारणे:
- आसाममधील नद्यांच्या वरच्या भागात अनेक धरणे बांधण्यात आली आहेत. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने काही धरणेही बांधली आहेत. या धरणांमधून अनियमित पाणी सोडल्याने मैदानी भागात पूरस्थिती निर्माण होते.
- आसामचा भूभाग हा काहीसा खोल आहे. आजूबाजूच्या सर्व भागात पाण्याचा साठा वाढला की प्रवाहाचा मार्ग फक्त आसामच्या दिशेने जातो.
- आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये भूस्खलन होतं राहतं,
- भूस्खलन आणि भूकंपांमुळे नदीपात्रात गाळ साचतो. नदीचे पात्र गाळानं भरतं. त्यामुळे नद्यांची पाणी प्रवाह क्षमता कमी होते. ते पात्राबाहेर होतो.
- ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या वेगवान प्रवाहामुळे धूप होऊन किनारपट्टीच्या जमिनी नष्ट होतात. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाची धूप झाल्यामुळे या खोऱ्याची रुंदी १५ किमी पर्यंत वाढली आहे.
धरणे बांधणे:
अतिक्रमणाचाही बसतो फटका!
- पर्यावरणीय वनजमीन आणि पाणवठ्यांवरील अतिक्रमणामुळेही राज्यात पूर येतो.
- ओलसर जमीन जास्त प्रमाणात पाणी शोषून घेते, परंतु त्यांच्या घटत्या संख्येमुळे पुराची परिणामकारकता वाढली आहे.
पूररोधी उपाययोजनेत गंभीरतेचा अभाव :
राज्यातील भीषण पूरस्थिती लक्षात घेऊन ब्रह्मपुत्रा नदीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती, त्याची अंमलबजावणी होण्यास सातत्याने विलंब होत आहे.