मुक्तपीठ टीम
तुम्ही जर आयकराच्या कक्षेत येत असाल, तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सीबीडीटीने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ निश्चित केली आहे.
या वर्षाच्या मध्यात, ७ जून रोजी, आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी एक नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू केले होते. नवीन पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे, सीबीडीटीने आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. शेवटच्या तारखेपूर्वी आयकर रिटर्न भरण्यासाठी, करदात्यांना नवीन ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. या तारखेपर्यंत टॅक्स रिटर्न न भरल्यास करदात्यांना मोठा दंडही भरावा लागू शकतो.
सरकारला मुदतीत वाढ का करावी लागली?
- यूजर्सच्या सोयीसाठी आयकर विभागाने यावर्षी ७ जून रोजी नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू केले होते, परंतु या नवीन पोर्टलमध्ये अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या.
- त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना अनेक समस्या युजर्ससमोर येऊ लागल्या.
- यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पोर्टल बनवणाऱ्या इन्फोसिसला समन्स बजावले.
- सरकारने कंपनीला समस्या सोडवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली.
- नवीन पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणींनंतर, आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे.
आयकर रिटर्न दाखल करण्याटची पद्धत पुढीलप्रमाणे
- आयकर रिटर्न भरण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- यानंतर होमपेजवर लॉगइन हियर पर्याय निवडा.
- यानंतर, तुम्ही तुमचा यूजर आयडी पर्यायामध्ये तुमचा स्थायी खाते क्रमांक किंवा पॅन नंबर प्रविष्ट करा आणि नंतर स्टार्टवर क्लिक करा.
- यानंतर, तुम्हाला प्राप्त झालेल्या सुरक्षित प्रवेश संदेशाची पुष्टी करावी लागेल. त्यानंतर कन्टिन्यूवर क्लिक करा.
- येथून तुम्हाला ६ अंकी ओटीपी मेसेज किंवा व्हॉइस कॉलद्वारे प्राप्त करायचा आहे की नाही हे निवडावे लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर एंटरवर क्लिक करा. ओटीपी १५ मिनिटांसाठी वैध असेल. यानंतर तुम्हाला नवीन ओटीपी जनरेट करावा लागेल. तुम्हाला योग्य ओटीपी टाकण्यासाठी तीन संधी मिळतील.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि नंतर लॉगिन वर क्लिक करा.
- यशस्वी पडताळणीनंतर आयकर ई-फायलिंग डॅशबोर्ड दिसेल.
- आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा नेट बँकिंग देखील वापरू शकता. आधार लॉगिनसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सूचनांनुसार ओटीपी द्यावा लागेल. नेट बँकिंगसाठी तुमच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
- यशस्वीरीत्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे आर्थिक वर्ष २०११-२२ साठी आयकर रिटर्न भरावा लागेल. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला आयकर रिटर्न भरताना नंतरच्या तारखेला दंड भरावा लागेल.
- जर तुम्ही उशीरा रिटर्न भरला, जो वेळेच्या मर्यादेत आयटीआर भरत नसेल, तर तुम्हाला जास्त कर भरावा लागेल.