Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आजपासून ‘फास्टॅग’ पाहिजेच…आता कसा, कुठे, कधी मिळवायचा?

February 16, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
FasTag must (2)

मुक्तपीठ टीम

 

आजपासून सर्व चारचाकी वाहनांना टोल भरण्यासाठी फास्टॅग असणे आवश्यक आहे. देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाचा टोल नाका ओलांडताना याची आवश्यकता असेल. वारंवार मुदत वाढवल्यानंतर अखेर आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. फास्टॅग म्हणजे काय, ते कसे कार्य करेल, आपण तो कसा, कुठे, कधी मिळवू शकतो हे जाणून घ्या…

 

फास्टॅग आहे तरी काय?

  • फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे.
  • जे स्टिकरच्या स्वरूपात आहे.
  • प्रत्येकाला ते कार किंवा कारच्या विंडशील्डवर लावावे लागेल.
  • फास्टॅग रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानासह कार्य करतो.
  • प्रत्येक फास्टॅग त्या संबंधित गाड्यांचे रजिस्ट्रेशन डिटेल्ससह जोडलेला असतो. हे लावल्यानंतर टोल नाक्यावर कॅशलेस व्यवहार करता येतो

 

फास्टॅग कसे काम करते?

  • जेव्हा आपण टोल नाक्यावरुन जाता तेव्हा टोल नाक्यावरील फास्टॅग रिडर आपल्या फास्टॅगचा बारकोड रिड करेल.
  • यानंतर, आपल्या बँक खात्यातून टोल फि घेतील. ते सुरू झाल्यानंतर टोल नाक्यांवर गाड्यांच्या लांबलचक रांगा नसतील.
  • हा फास्टॅग अद्याप दुचाकी वाहनांसाठी नाही.
  • नॅशनल पेमेंट्स कोऑपरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) आरएफआयडी तयार केले आहे.

फास्टॅग कुठे खरेदी करू शकतो?

  • आपण देशातील कोणत्याही टोल नाक्यावर फास्टॅग खरेदी करू शकता.
  • याशिवाय तुम्ही अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक बँक या शाखांकडूनही खरेदी करू शकता.
  • आपण पेटीएम, अॅमेझॉन, गूगल पे सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुनही हे खरेदी करू शकता.
  • यामध्ये बऱ्याच डिस्काउंटसह वेगवेगळ्या ऑफर देण्यात येत आहेत.
  • फास्टॅग खरेदी करताना आपल्याकडे आयडी प्रूफ आणि वाहन नोंदणी दस्तऐवज असणे आवश्यक आहे.

 

फास्टॅगच्या बॅलन्सच्या महितीसाठी माय फास्टॅग अॅप

  • अनेकदा लोकांच्या फास्टॅगची वैधता संपल्यावर फास्टॅग लेनमध्ये वाहनांची गर्दी होते.
  • काहीवेळा फास्टॅग नसलेल्या गाड्या फास्टॅग लेनमध्ये येतात.
  • जर आपल्या कारमध्ये फास्टॅग स्थापित केला असेल तर आपण त्यासंदर्भातील सर्व माहिती माय फास्टॅग नावाच्या यूपीआय अॅपवर पाहू शकता.
  • हे राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेडने तयार केले आहे.
  • हे अॅप आपल्या कारच्या फास्टॅगचे स्टेटस देखील सांगते.
  • आपण या अ‍ॅपसह आपल्या फास्टॅग खात्याला या अॅपशी लिंक करून पेमेंटसुद्धा करू शकतो.
  • आपण या अॅपसह आपले बँक खाते जोडू शकता.
  • यासह, जेव्हा जेव्हा आपण टोल नाक्यावर जाता तेव्हा आपल्या खात्यातून टोल कर वजा केला जाईल.

 

फास्टॅगची किंमत आणि मुदत

  • फास्टॅगची किमंत दोन गोष्टींवरून ठरवली जाते.
  • प्रथम आपली गाडी कोणती आहे आणि दुसरी ते आपण कुठून खरेदी करत आहात.
  • बँकांच्या ऑफरनुसार त्याच्या किंमतीत काही फरक असेल.
  • आपण फास्टॅग ज्या बँकेतून घेतलेले आहात त्याद्वारे आपण इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पैसे घेतल्यामुळे त्याच्या किंमतीतही फरक पडतो. एक वेळ फी २०० रुपये असल्याचे अधिकारी सांगतात.
  • पुन्हा जारी करण्यासाठी फी १०० रुपये आणि रिफंडेबल सिक्योरिटी डिपॉजिट २०० रुपये आहे.
  • एकदा खरेदी केलेला फास्टॅग स्टिकर पाच वर्षांसाठी वैध असेल.
  • स्टेट बँकेसारख्या बँका अमर्यादित वैधतेचा फास्टॅग देत आहेत.
  • उदाहरणार्थ, जर तुम्ही पेटीएमकडून कारसाठी फास्टॅग विकत घेतले असेल तर त्यासाठी तुम्हाला ५०० रुपये खर्च करावे लागतील.

 

तुम्हाला बँकेतून फास्टॅग घ्यायचा असेल तर ही कागदपत्रे असणे आवश्यक

  • बँकेतून फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला केवायसी कागदपत्र
  • वाहनाचा आरसी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पॅनकार्ड
  • पत्ता आणि आयडी पुरावा लागेल
  • आपला परवाना, आयडी आणि अॅड्ररेस पुरावा सबमिट करू शकता.
  • जर तुम्ही तुमचे खाते असलेल्या बँकेतून फास्टॅग घेतला, तर तुम्हाला फक्त आरसी घ्यावे लागेल.

Tags: fastagfastag in marathifastag marathiफास्टॅगफास्टॅग मराठीत
Previous Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – १५ फेब्रुवारी २४ तास – • आज ३,१०५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,७८,७०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७% एवढे झाले आहे. • आज राज्यात ३,३६५ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज २३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,५९,०२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,६७,६४३ (१३.४६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात १,७४,७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Next Post

महाराष्ट्रात कोरोनाचे ३,३६५ नवे रुग्ण, वाढता संसर्ग चिंताजनक!

Next Post
Corona Covid

महाराष्ट्रात कोरोनाचे ३,३६५ नवे रुग्ण, वाढता संसर्ग चिंताजनक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!