Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

कृषि कायद्यांविरोधात विदर्भातील शेतकरी विधवा दिल्लीस रवाना

२६ जानेवारीच्या किसान ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होणार

January 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
kisan yatra vidarbha widows (1)

मुक्तपीठ टीम

 

२६ जानेवारीच्या किसान परेडमध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातील शेकडो शेतकरी विधवा व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य आज यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून “किसान बचाव यात्रा ” काढून निघाले आहेत. किसान यात्रा मध्यप्रदेश उत्तर प्रदेश  मधून प्रवास करीत दिल्ली येथे पोहचणार आहे . या शेतकरी विधवा सर्व दिल्लीच्या सीमेवर भेट देऊन आपल्या व्यथा मांडतील. “जर पंतप्रधान, कृषिमंत्री यांनी वेळ दिला तर आम्ही त्यांची भेट घेणार,” अशी माहिती भारती पवार यांनी दिली.

 

किसान यात्रेला हिरवी  झेंडा दाखवितांना संयोजक किशोर तिवारी म्हणाले कि “ज्या कृषी सुधारणांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी व कृषी संकटावर २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विषेय पॅकेज देऊन सुरुवात केली होती. त्यानंतर खाजगी बाजार समिती शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मुभा, भंडारणं क्षमता नियंत्रण समाप्त करणे, कार्पोरेट शेती यांचे प्रयोग २०११मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केले होते. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुपट्ट तर सोडा अजून कमी झाले. त्यामुळेच महाराष्ट्रात २०१७ व २०१९ मध्ये अशी दोनवेळा ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी लागली. हे सत्य समोर असतांना त्याच सुधारणा उत्त्पन्न दुपट्ट करण्याचा नावावर करणे चुकीचे आहे. आंदोलन सरकारच्या अंगलट आल्यावरही अट्टाहास करणे अनुचित आहे, आता मोदी सरकारने कृषी कायदे रद्दच करावेत.”.

विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा मालीकर यावेळी म्हणाल्या कि ‘ भारतातील सध्याची शेतीविषयक संकट ही दोन घटकांची निर्मिती आहे: घटते उत्पन्न ओळखणे आणि अपयशी ठरलेले राज्य अपयश; आणि अनुदान मागे घेण्याचा आर्थिक परिणाम यामुळे खोलवर रुजलेली शेती संकटाची मुळे , मातीची सुपीकता कमी होत जाणे, पाण्याची पातळी  कमी  होणे  , लागवडीची वाढती किंमत आणि शेतकर्‍यांना पिकांचा नफा परतावा, वेळोवेळी निविष्ठांमधील असमाधानकारक वाढ आणि मागणीपेक्षाजास्त अतिरिक्त उत्पादन,  सदोष आयातीच्या धोरणांमुळे ओढवणारे कृषी संकट हे सारे मानवनिर्मित असतांना आपले नियोजन कोणासाठी असा सवाल त्यांनी केला .

या किसान बचाव यात्रेचे नेतृत्व शेतकरी विधवा अपर्णा मालीकर ,रेखा गुरनुले ,शोभा वाघाडे ,भारती  पवार ,शीला मांडवगडे ,अंजूबाई भुसारी ,आदीवासी नेते अंकित नैताम ,गजाननराव आष्टेकर ,निलेश जैस्वाल ,रवीभाऊ कुर्हेवार करीत आहेत .अशी माहीती या किसान यात्रेचे संयोजक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली . ग्रँड मराठा फौंडेशन अध्यक्ष रोहीत शेलटकर यांच्या सहकार्याने या किसान बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .

 

….तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढणार नाही! – किशोर तिवारी

  • सरकारने लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी खत रासायनिक सर्व प्रकारचे औषधी ,शेतीमधील सर्व प्रकारची मजुरी यावरील अनुदान सुरु करावे
  • शेतीमाल हमी भावात शेतकऱ्यांच्या दारावर विकला जावा
  • मरणासन जमिनीचे पुनर्जीवन करावे
  • गावामध्ये भंडारणं व्यवस्था ,प्रक्रिया व्यवस्था ,विपणन व्यवस्था निर्माण करावी
  • शेती लागणारा पतपुरवठा सरकारी बँकांनी पंचवार्षिक तत्वावर द्यावा
  • त्याच बरोबर शेतकऱ्यांचे जागतिक पर्यावरण बदल याला धरून हित जपणारी पीकविमा व्यवस्था सुरु करण्यात यावी
  • या बरोबरच देशाच्या १४० कोटी जनतेला लागणारी सर्व डाळी ,सर्व प्रकारचे तेल ,अन्न व जनतेला आव्यश्यक असलेला शेतात निर्माण होणाऱ्या सर्व कृषीमाल याची आयात बंदी करण्यात यावी

 


Tags: Farmer Delhi Protestfarmer lawkishor tiwariकिशोर तिवारीदिल्ली शेतकरी आंदोलनशेतकरी
Previous Post

मारुतीची नवीन ‘मेड इन इंडिया’ 3 डोर जिम्नी एसयूव्ही निर्यातीसाठी सज्ज

Next Post

जलसंघारण दुरुस्तीतील घोटाळे टाळण्यासाठी जीओ टॅगिंग, व्हिडीओ चित्रिकरण

Next Post
Shankarrao Gadakh

जलसंघारण दुरुस्तीतील घोटाळे टाळण्यासाठी जीओ टॅगिंग, व्हिडीओ चित्रिकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!