मुक्तपीठ टीम
हल्ली रासायनिक खतांचा वापर जास्त केला जातो. रासायनिक खत टाकून कमी जागेत मोठ्या प्रमाणवर उत्पन्न घेणे शक्य असल्याने अवलंब मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पण रासायानिक शेतीच्या माध्यमातून घेतलेली उत्पन्ने ही मानवाच्या जीवनावर घातक परिणाम घडवून आणतात. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होते, जमिनीचा कस कमी होऊ लागतो. यामुळेच कोकणातील इस्कॉनला सेंद्रिय शेतीवर भर दिला जात आहे. तिथलेच एक मराठवाड्यातील नांदेडचे शेतकरी सेंद्रिय शेतीवर प्रयोग करत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात….
सदानंद दास हे मुळचे मराठवाड्यातील नांदेडचे पुसद गावचे. सदानंद हे आधी एका कंपनीमध्ये कामाला होते. कंपनीमधून व्हीआरएस घेतल्यानंतर ते कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील इस्कॉनच्या गोवर्धवन इको व्हिलेज प्रकल्पात आले. त्यांना आता १८वर्ष झाली. इथे येण्याचे कारण म्हणजे कृष्णभक्ती. इथला शांतमय परिसर. इथे असणारा भक्तांचा संघ, आजूबाजूला असणारा दाट जंगलांचा परिसर, माणसांचा खूप कमी वावर यामुळे त्यांना इथे यावंसं वाटलं. सुरुवातीला ते एक महिना इथे राहिले, त्यांना इथले वातावरण प्रचंड आवडले आणि आपणही आपल्या गुरुसाठी काही तरी करावं या जाणीवेतून त्यांनी इथेच स्थायिक व्हायचं ठरवलं.
कोणकोणतं पिक घेतलं जातं आणि कसं?
- सदानंद या परिसरात भाजीपाला पिकवतात. वांगी टोमॅटो, मिर्ची,गवार आणि फ्लॉवरचं उत्पादन ते घेतात.
- वांग्याचे पिक हे दोन बाय दोन वर लावले. सुरवातीला त्यांनी बीफ्ट वैगेरे टाकली जातात. नंतर आता बीफ्ट काढून त्याचे स्पिंकलर आहे. स्पिंकलर नसलं तरी दानपानी देऊ शकतो त्याला. स्पिंकलरच्या सहाय्यानं उत्पादन जास्त येतं त्यांच्याकडे चार झाडं आहेत. आठवड्याला ६० ते ७० किलो काढतात.
बिना वाताची वांगी उत्पादन
इथे असलेली वांगी ही वांगी बिना वाताचे आहेत. काहींना वांग्याचा त्रास असतो, गॅससारखे प्रकार होतात. पण इथल्या वांग्यांचे वैशिष्ट्य असे की ही वांगी चांगल्या दर्जाची असून याने कोणताही त्रास होत नाही. भारतामध्ये अडीचशे ते तीनशे प्रकारच्या वांग्याची वाण आहेत. तर इथले शेतकरी चांगल्या-चांगल्या दर्जाची वांगी निवडतात. बिनवाताच्या वांग्याचं उत्पादन इथे घेतले जाते. साधारणत: आठ ते नऊ महिने पीक चालते. याला अधून-मधून खतपाणी द्यायला लागते.
सेंद्रीय शेतीवर भर
सदानंद दास यांचा सुरुवातीला सेंद्रीय शेतीवर विश्वास नव्हता. तर ते जेव्हा इथं उत्पादन कसं घ्यायचे हे शिकले तेव्हा सेंद्रीय शेती केलेली चांगली असे त्यांना वाटले. इथे कोणत्याही पिकांवर कोणतंही किटकनाशक, रासायनिक खते फवारली जात नाहीत. खतपाणी जसं की गाईचं शेणं,गोमूत्र, कुजलेला पालापाचोळा याचंच खत बनवून टाकले जाते. त्यामुळे कमी खर्चामध्ये उत्पादनपण चांगलं येतं. सुरवातीला थोडं उत्पादन कमी येतं पण जसं बॅक्टेरिया शेतीमध्ये जास्तीत जास्त निर्माण होतील त्यावेळेस उत्पादन वाढतं
बऱ्याच शेतकऱ्यांना नेहमी काळजी असते अनेकदा किड येते किंवा अन्य कोणत्या कारणांमुळे पिक खराब होते, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. जर वातावरणात बदल होणार तसं आपण थोडं स्प्रे करायचं, सदानंद थोड्या प्रमाणात गोमूत्र स्प्रे करतात.किडे पडायच्या आधीच दक्षता घेत त्याच्यावर उपाय केले जाते.
खाण्यासाठी आणि शेतकऱ्यासाठीचे फायदे
- जसं आपण रासायनिक खतं वापरतो,रासायनिक खतांची बाजारात किंमत महाग आहे.
- साधारणतः टोमॅटोचं जरी उत्पादन घ्यायचं असलं तुम्हाला त्याला हजार रूपये खर्च करावा लागतो. त्यावेळेस तुम्हाला जर पाच रूपये,दहा रूपये टोमॅटोचा दर मिळाला, एवढा चांगला स्प्रे करून तुम्हाला दहा रूपयानी,वीस रूपयानी काय पुरणार आहे?
- सेंद्रिय असं गोमूत्र,दुष्पर्णी जल जर लसूण,मिर्ची,आलं स्प्रे करून काढलं तर तुम्हाला कमी पैशामधी उत्पादनपण चांगलं मिळेल. त्याचा फायदापण होईल.तुम्ही स्वतः खऊ शकता.
- स्वतः म्हणजे त्यामध्ये रसायन नसणार तुम्ही स्वतः खाऊ शकता.
- जेव्हा बाहेर जातो तेव्हा सांगितलं जातं.
- हे फळ खाऊ नका यात जास्त केमिकल टाकलं जातं तुम्हाला ते पचणार नाही, त्याच्यापेक्षा तुम्हाला आम्ही दुसरं आणू.
- काय पिकवलेले आपल्यालाच खाण्याच्या लायकीचे नसेल तर?
- आणि एवढे पन्नास-पन्नास,साठ,साठ हजार रूपयाचे स्प्रे करतात त्याच्यावर.
आम्ही आता आमच्या इथं ट्रॅप वैगेरे लावलेत, शत्रू किडे, मित्र किडे त्याच्यावर बरोबर असतात.
- तुम्ही जर स्प्रे केला तर ते सर्वच मरणार ना. मित्रपण वाचणार नाही आणि शत्रूपण वाचणार नाही.
- शेतीला जे उपयोगी आहे ते आपण जगवायचा प्रयत्न करतोय.
- साधारण त्यांचे गुरूजी सापालापण मारू देत नाहीत.
- साप मारू नका म्हणतात. उंदीर खातात.
- तसं बाहेर विचार करत नाही कोणी, उंदीर म्हंटलं की लगेच औषध टाकून मारून टाकणार. किंवा ते जर खाल्ल तर मांजर मरेल. त्याची साखळी तोडू द्यायची नाही असं विचार करतात ते.
- एकीकडे निसर्गाची साखळी ही सुरूच राहिली पाहिजे असे त्यांना इस्कॉनचे प्रभूजी सांगतात.