मुक्तपीठ टीम
कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षात गेल्या सहा महिन्यात ( एप्रिल ते सप्टेंबर) २०२१-२२ या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत २५% वाढ झाली आहे. वाणीज्य माहिती आणि सांख्यिकी महासंचालनालयाने(डीजीसीआय अँड एस) प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या एकंदर निर्यातीमध्ये एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या काळात २५ टक्के वृद्धी झाली आहे.
कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात विकास प्राधिकरणाच्या(अपेडा) एकंदर निर्यातीमध्ये वाढ होऊन ती एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या काळात १३,७७१ दशलक्ष डॉलरवर पोहोचली. गेल्या वर्षी याच काळात ती ११,०५६ दशलक्ष डॉलर होती.
वाणीज्य आणि उद्योग मंत्रालयाने अपेडाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे २०२२-२३ या वर्षासाठीच्या निर्यातीच्या उद्दिष्टापैकी ५८ टक्के निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यातच झाली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अपेडाने कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी २३.५६ अब्ज डॉलरचे लक्ष्य निर्धारित केले आहे आणि या आर्थिक वर्षात सहा महिन्यांच्या काळात यापूर्वीच १३.७७ अब्ज डॉलर निर्यात झाली आहे.
डीजीसीआय ऍन्ड एसच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रक्रियाकृत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत एप्रिल ते सप्टेंबर २२ या काळात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ४२.४२ टक्के इतक्या उल्लेखनीय वृद्धीची नोंद झाली आहे तर ताज्या फळांमध्ये ४ टक्के वाढीची नोंद झाली आहे.
तृणधान्यांसारखी प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने आणि इतर प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत २९.३६ टक्के वाढीची नोंद झाली आहे.
डाळींच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत १४४ टक्के वाढीची नोंद झाली आहे. मसूर डाळीच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या (एप्रिल ते सप्टेंबर २०२१-२२) १३५ दशलक्ष टनांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात याच कालावधीत( एप्रिल ते सप्टेंबर २०२२-२३) ३३० दशलक्ष टनांपर्यंत वाढ झाली आहे.
कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीमधील वाढ म्हणजे केंद्राने कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचा परिपाक आहे. विविध देशांमध्ये व्यापारी प्रदर्शनांचे आयोजन, भारतीय दुतावासांच्या सहकार्याने विशिष्ट उत्पादने आणि सामान्य विपणन मोहिमा राबवून चांगली मागणी असलेली बाजारपेठ शोधणे यांसारख्या उपक्रमांचा त्यात समावेश होता.
सरकारने देखील भारतात जीआय मानके मिळालेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीसोबत कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांचे खरेदीदार आणि विक्रेते यांच्या आभासी मेळाव्यांचे तसेच अमेरिकेसोबत हस्तकलाकृतींच्या मेळाव्यांचे आयोजन केले होते.
निर्यात होणार असलेल्या उत्पादनांच्या दर्जाचे प्रमाणीकरण विनासायास होण्यासाठी अपेडाने देशभरात २२० प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे. ज्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी निर्यातदारांना सेवा उपलब्ध होत आहेत.
India’s Export Comparative Statement: APEDA Products | |||
Product Head | April-Sept, 2021 | April-Sept, 2022 | % Change (April-Sept, 2022) |
USD Million | |||
Fruits | 301 | 313 | 4.04 |
Cereal preparations & Miscellaneous processed items | 1632 | 2111 | 29.36 |
Meat, dairy & poultry products | 1903 | 2099 | 10.29 |
Basmati Rice | 1660 | 2280 | 37.36 |
Non-Basmati Rice | 2969 | 3207 | 8.03 |
Other products | 2591 | 3761 | 45.16 |
Total | 11056 | 13771 | 24.55 |