मुक्तपीठ टीम
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय कामधेनु आयोग पहिल्यांदाच देशात गाय विज्ञान परीक्षा घेत आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसीने देशभरातील सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांना कामधेनू गोविज्ञान प्रचार प्रसार परीक्षा २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आवाहन केले आहे. आयोगाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, भारत सरकारच्या वतीने विद्यापीठाला २५ फेब्रुवारी रोजी गाय विज्ञान परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे, अशा सूचना यूजीसीनं दिल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं यासंदर्भातील उदासीनता पाहूनच विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गो विज्ञान परीक्षा कोणासाठी?
• आता ही परीक्षा दरवर्षी घेण्यात येईल
• कोणतीही व्यक्ती या परीक्षेत सहभाग घेऊ शकेल.
• यासाठी कामधेनु कमिशनच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
• प्राथमिक विद्यार्थ्यांपासून ते सामान्य लोक परीक्षेमध्ये सहभाग घेऊ शकतील.
या व्यतिरिक्त, यूजीसीने विद्यापीठाला संबंधित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना सहभागास प्रोत्साहित करण्यासाठी निर्देश करण्यास सांगितले आहे. या परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना आयोगाकडून प्रोत्साहनपर प्रमाणपत्र दिले जाईल. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामान्य लोक या परीक्षेत भाग घेऊ शकतात. यासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही.
कशी असणार गो विज्ञान परीक्षा
• या परीक्षेचा कालावधी एका तासाची असेल.
• मुले, प्रौढ आणि परदेशी नागरिक देखील परीक्षेत सहभाग घेऊ शकतात.
• ही परीक्षा बहूपर्यायी स्वरुपाची असेल.
• हे प्रश्न हिंदी, इंग्रजी आणि १२ प्रांतीय भाषांमध्ये विचारले जातील.
• प्रश्नपत्रिका १०० गुणांची असेल.
• सहभागी होणारे विद्यार्थी लॅपटॉप आणि मोबाईलवरुन परीक्षा देऊ शकतात.
• परीक्षेसाठी नोंदणी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर, www.kamdhenu.gov.in वर करता येईल.
गो विज्ञान परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता?
• कामधेनु आयोगानेही या परीक्षेसाठी अभ्यासक्रम जाहीर केला आहे. यात गायींच्या विविध जाती आणि प्राणी मारल्यामुळे झालेल्या आपत्तींबद्दल माहितीही आहे.
• संपूर्ण अभ्यासक्रम राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या वेबसाइटवर आहे.
• तसेच परीक्षेच्या तयारीसाठी गाय विज्ञान विषयावरील अभ्यासाचे साहित्यही या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
गो विज्ञान परीक्षा चार स्तरावर होईल
• ही परीक्षा चार स्तरांवर घेण्यात येईल.
• प्राथमिक स्तरावरील ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यानंतर १२ वीच्या पुढे शिक्षण देत असलेल्या आणि चौथ्या स्तरावर सामान्य लोकांसाठी.
• परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
गो विज्ञान परीक्षेचा उद्देश
गाय विज्ञान परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशीगाय आणि त्यासंदर्भातील मुद्दे, अर्थव्यवस्था, पर्यावरण, आरोग्य याविषयी जागरुक केले जाणार आहे.