Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जेएनपीटीत कचऱ्यापासून वीज आणि बायोगॅस

February 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
biogas

मुक्तपीठ टीम

हरीत बंदर उपक्रमाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वसाहतीत जेएनपीटीचे अध्यक्ष राजीव सेठी यांनी दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्‌घाटन केले.

 

हा नवीन प्रकल्प भाभा अणू विज्ञान संशोधन संस्थेच्या तंत्रज्ञानावर आधारीत असून त्यात २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार १० मेट्रिक टन प्रतिदिन कचऱ्याचे व्यवस्थापन करता येईल अशी रचना केली आहे.हा ५ मेट्रिक टन प्रतिदिन बायोगॅस प्लॅंटच्या क्षमतेवर आधारीत असून त्यातून बायोगॅस आधारीत वीजनिर्मिती आणि बायोगॅस उत्पादन करता येईल. तसेच यात सुका कचरा दाबण्यासाठी हायड्रॉलिक बेलिंग यंत्र असून त्यात सुका आणि ओला कचरा याचे वेगळे संकलन करण्यासाठी दोन विभाजकांसह घंटागाड्या आहेत तसेच वापरकर्त्यांना नियोजित घनकचरा संकलन एकत्रितपणे करण्यासाठी प्रशिक्षिण देणारी उपकरणे आहेत.

 

स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून देशभरात सर्वांना आरोग्य, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सुनिश्चित करणे हा त्याच्या मूलभूत उद्देश असून विविध सहयोगी संस्थांच्या मदतीने स्वच्छ भारत हे ध्येय गाठण्यासाठी त्याची चौकट आखली आहे.आधुनिक पध्दतीने घनकचरा व्यवस्थापन आणि त्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा हे त्याच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे.

 

या उद्‌घाटन प्रसंगी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ,आणि इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

jnpt

 

जेएनपीटी बद्दल सर्वकाही:

  • जेएनपीटी हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणारे बंदर आहे.

 

  • ते बंदराच्या कारभाराचा पर्यावरण आणि आसपासच्या समुदायावर कमीत कमी प्रभाव पडेल यावर सतत लक्ष ठेवत असते.

 

  • पर्यावरण संवर्धनासाठी बंदराने विविध हरीत उपक्रम हाती घेतले आहेत.

 

  • ज्यात सौरऊर्जा, सांडपाणी पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प, ई-आरटीजीसीज याव्यतिरिक्त पर्यावरण पूरक उद्यान, सागरी जीवांचे संवर्धन आणि एकात्मिक वृक्षारोपण असे प्रकल्पही विकसित केले आहेत.

 

  • बंदर क्षेत्रातील ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बनचा उपयोग कमी करण्यासाठी बंदरातील दिवे बदलून एलईडी बल्बची सुरुवात केली आहे.

 

  • बंदराचे उद्दिष्ट केवळ आर्थिक कार्यक्षमता प्राप्त करणे हे नसून त्याचा केंद्रबिंदू पर्यावरण आणि सामाजिक सुरक्षितता हा देखील आहे.

सध्या जेएनपीटीचे पाच कंटेनर टर्मिनल कार्यरत आहेत : जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनरl (JNPCT),न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल(NSICT), गेटवे टर्मिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (GTIPL), न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय गेटवे टर्मिनल l(NSIGT) आणि नव्याने सुरू झालेले भारत मुंबई कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड (BMCTPL) बंदरात सर्वसाधारण मालवाहतूकीसाठी उथळ वॉटर बर्थ,आणि बीपिसीएल -आयओसीएल (BPCL-IOCL) यांच्या संयुक्त व्यवस्थापनाने चालविले जाणारे जल वाहतूक टर्मिनलही आहे.


Tags: biogaselectricityJNPTrajiv sethiwasteघनकचरा व्यवस्थापनजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टजेएनपीटीभाभा अणू विज्ञान संशोधन संस्थाराजीव सेठी
Previous Post

मुंबई वर्सोवा येथील गॅस सिलिंडरच्या गोदामाला लागलेली आग आटोक्यात

Next Post

सरकारी मालकीची अतिरिक्त जमिनी विक्रीची प्रक्रिया सुरु

Next Post
ministry of rural development

सरकारी मालकीची अतिरिक्त जमिनी विक्रीची प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!