मुक्तपीठ टीम
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आज विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध केले. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १६४ आमदारांचा पाठिंबा मिळवत जिंकल्यामुळे नव्या सरकारचे बहुमत दिसले होते. आज विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्तावावर झालेल्या मतदानात तेवढीच मते मिळवत या सरकारने बहुमत चाचणीत विजय मिळवला आहे. विधानसभा अध्यक्षपदी अॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर सरकारच्याबाजूने कमी झाले होते. पण हिंगोलीचे शिवसेना आमदार बांगर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कालचा १६४चा आकडा कायम राहिला.
बहुमत चाचणीतही सरकार पास!
- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसाठी बहुमत चाचणीची परीक्षा खूपच सोपी झाली होती.
- अपेक्षेप्रमाणे १६३ आमदारांना मतदान करता येणार असल्याने अपेक्षेप्रमाणे १६३ मते मिळतील अशी अपेक्षा होती. पण शिवसेनेच्या बांगर यांच्या गटांतरामुळे अध्यक्षपदी गेलेल्या राहुल नार्वेकरांच्या मताची घट भरून निघाली. सरकारच्या बाजूने १६४ मते कायम राहिली.
शिवसेनेच्या निष्ठावंतांपुढे संकट
नव्या अध्यक्षांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांना मान्यता दिली. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेचे मूळ प्रतोद सुनिल प्रभू आणि गटनेतेपदी नव्याने झालेली अजय चौधरी यांची निवड रद्द ठरवली. त्यामुळे शिवसेनेला दुहेरी धक्का बसला. आता खरं संकट आहे ते शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेल्या १५ आमदारांवर अपात्रततेची कारवाई होते की काय, याचं!