Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

महात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ. श्रीमंत कोकाटेंचे व्याख्यान

April 11, 2021
in सरकारी बातम्या
0
dr shrimant kokate

मुक्तपीठ टीम

महात्मा जोतिराव फुले यांनी धर्मव्यवस्था व राजसत्तेला आव्हान दिले. सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी नष्ट करणारे व देशातील शुद्रातीशुद्रांना शिक्षण देण्याचे क्रांतिकारक कार्य करणारे महात्मा फुले हे जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव ठरतात, असे मत प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे यांनी आज मांडले.

 

“महात्मा फुले : एक क्रांतिकारक महामानव” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 24 वे पुष्प गुंफताना डॉ. कोकाटे बोलत होते.

 

महात्मा फुले हे मध्ययुगीन काळाला व आधुनिक काळाला बांधून ठेवणारे क्रांतिकारक व्यक्तीमत्व आहे. आधुनिक महाराष्ट्राला महात्मा फुलें यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा परिचय झाला. राज्यात व देशात सार्वजनिक व मोफत शिक्षणाचा पाया फुले यांनी घातला. पिढयान-पिढया पिचलेल्या वर्गाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी व्यवस्थे विरूध्द लढा दिला. जनमाणसाची, शुद्रातीशुद्रांची, कष्टक-यांची मराठी भाषा साहित्यामध्ये आणण्याचे महत्वाचे कार्य फुले यांनी केले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य‍िक‍ि, सांस्कृतिक क्षेत्रात महात्मा फुले यांनी अमुलाग्र क्रांती घडवून आणत जनसामान्यांना जगण्याचे बळ दिले व त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, असे डॉ. कोकाटे म्हणाले.

 

महात्मा फुले शिक्षण घेत असतांनाच त्यांनी अनुभवले की, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, क्रांती नाही व परिवर्तनही नाही म्हणूनच सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने धर्म बुडतो असा समज असणा-या तत्कालीन समाजव्यवस्थेने महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचे चित्र पाहून त्यांनी या विरूध्द बंड पुकारत १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरु केली. पुढे १८५२ मध्ये मुलांची शाळा सुरु केली. या शाळांमध्ये सर्व जाती धर्माच्या स्त्री -पुरुषांना प्रवेश दिला. स्त्री-पुरुष समानता हे महात्मा फुले यांच्या कार्याचे वैशिष्टे आहे. १८८२ साली त्यांनी ‘हंटर कमिशन’ पुढे साक्ष देत समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्त्रियांना शिक्षण देण्याचे महत्व पटवून दिले होते.

 

शिक्षणाच्या अभावामुळे या देशातल्या शुद्रातीशुद्रांची काय अवस्था झाली याचे विवेचन महात्मा फुले यांनी ‘शेतक-यांचा असुड’ या आपल्या ग्रंथाच्या उपोद्घाटामध्ये करताना म्हटले आहे, “विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नितीविना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शुद्र खचले ,इतके सगळे अनर्थ एका अविज्ञेने केले”

 

महात्मा फुले हे बांधकाम व्यावसायिक होते. पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रजच्या बोगदयाचे बांधकाम, खडकवासला धरणाचे बरेचसे बांधकाम व पुण्यातील अनेक पुल त्यांच्या कंपनीने बांधले. बांधकाम व्यवसायातून आलेला पैसा त्यांनी जनकल्याणासाठी वापरला. येणा-या उत्पन्नातून त्यांनी शाळा काढल्या गोरगरिबांना शिकवले. महात्मा फुलेंना संकुचित राष्ट्रवाद मान्य नव्हता ‘ एकमयी समाज’ हा त्यांचा राष्ट्रवाद होता असे डॉ कोकाटे यांनी सांगितले.

 

स्त्रीभृणहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून महात्मा फुले यांनी अबला, निराधार स्त्रियांना आधार दिला. या महिलांमधील एक काशीबाई नातू यांचा मुलगा यशवंत यास दत्तक घेवून आपल्या विचाराचा व संपत्तीचा वारसदार केले म्हणून महात्मा फुले हे क्रांतिकारक ठरतात असे डॉ. कोकाटे म्हणाले.

 

अकाली वैधव्य आलेल्या महिलांना तत्कालिन समाजरितीनुसार केशवपणाला सामोरे जावे लागत असे केशवपणाची ही अमानुष प्रथा महात्मा फुले यांनी बंद पाडली, त्यासाठी नाभीकाची संघटना उभारली.

 

महात्मा फुलेंचे साहित्य जनसामान्यांना आत्मविश्वास मिळवून देणारे

महात्मा फुलें यांचे साहित्य हे क्रांतिकारक आहे. त्यांच्या साहित्याने दबलेल्या-पिचलेल्या वर्गाला प्रेरणा दिली त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. ‘गुलामगिरी’, ‘शेतक-यांचा असूड’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ‘शिवरायांचा पोवाळा’ ‘तृतियरत्न नाटक’ या महात्मा फुलेंच्या साहित्याने अमुलाग्र क्रांती घडवून आणल्याचे डॉ कोकाटे म्हणाले.

 

महात्मा फुलेंनी शिवजन्मोत्सवाचा पाया घातला

आधुनिक महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून देण्याचे जास्तीत-जास्त श्रेय महात्मा फुलेंना जाते. १८६९ मध्ये महात्मा फुले रायगडावर गेले शिवरायांच्या समाधीचा त्यांनी शोध लावला व तिथे चार दिवस मुक्काम केला. रायगडाहून परत येऊन पुण्यामध्ये त्यांनी १८६९ मध्ये शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करून देशात शिवजन्मोत्सवाचा पाया घातला असे डॉ कोकाटे यांनी सांगितले.

 

३० सप्टेंबर १८७३ ला ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना करून फुले यांनी विवेकी पिढी निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रेरणेने कामगारांचे संघटन उभे राहिले नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंचे अनुयायी देशातील कामागार संघटनेचे पहिले अध्यक्ष होत, असे डॉ कोकाटे म्हणाले.

पुणे, सातारा, जुन्नर आदी भागात पडलेल्या दुष्काळाच्या काळात महात्मा फुले यांनी स्वत:च्या वाडयातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. दुष्काळी भागातील जनतेला अन्न-धान्य पोहचविले.

महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचे अनुयायी, सहकारी व सर्व क्षेत्रातील लोकांनी १८८८ मध्ये मुंबई येथील सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना उत्सफुर्तपणे ‘महात्मा’ ही पदवी दिली.

महात्मा फुले यांनी शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आदी क्षेत्रात केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात मोठे कार्य उभे राहिल्याचे डॉ .कोकाटे यांनी सांगितले.


Tags: dr.shrimant kokateडॉ श्रीमंत कोकाटेमहात्मा जोतिराव फुले
Previous Post

वाझेंचा साथीदार रियाज काझीला अटक, माफीचा साक्षीदार होणार?

Next Post

रविवारी जास्तच! ६३ हजार नवे रुग्ण, ४८ तासात २१० मृत्यू! ३४ हजार बरे

Next Post
रविवारी जास्तच! ६३ हजार नवे रुग्ण, ४८ तासात २१० मृत्यू! ३४ हजार बरे

रविवारी जास्तच! ६३ हजार नवे रुग्ण, ४८ तासात २१० मृत्यू! ३४ हजार बरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!