मुक्तपीठ टीम
भारतात कोरोना भयावहरीत्या उफाळत आहे. देशातल्या अतिवेगानं होणाऱ्या रुग्णवाढीमागे कोरोनाचा डबल म्युटंट कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. जगभरात भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल चर्चा सुरू आहे. जगातील अनेक देशांनी त्यामुळे भारतीयांवर सध्या प्रवेश बंधनं लादली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात हाहाकार माजवणारा कोरोनाचा नवा डबल म्युटंट विषाणू नेमका काय आहे आणि त्याचा धोका किती आहे, ते समजून घेण्याचा हा प्रयत्न:
डबल म्युटंट विषाणू म्हणजे काय?
- हा विषाणूचा एक प्रकार आहे ज्याचा जीनोममध्ये दोनदा बदल झाला आहे.
- जेव्हा व्हायरसच्या दोन म्यूटेटेड स्ट्रेन मिळतात आणि तिसरा स्ट्रेन बनतो तेव्हा डबल म्युटेशन होते.
- या प्रकाराला वैज्ञानिकदृष्ट्या B.1.617 असे नाव देण्यात आले आहे.
- E484Q आणि L452R हे कोरोनाचे दोन वेगवेगळे स्ट्रेन आहेत.
- भारतात नोंदविलेले डबल म्युटंट विषाणू E484Q आणि L452R पासून बनलेले आहेत.
- L452R चा स्ट्रेन अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आढळतो आणि E484Q चा स्ट्रेन भारतात आहे.
- हे डबल म्युटेशन महाराष्ट्रात प्रथम सापडले
- डबल म्युटंट विषाणू देशातील किमान पाच राज्यात आढळला आहे.
- महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही अशी राज्ये आहेत ज्यात डबल म्युटंटचे विषाणू आढळले आहेत.
- कोरोना प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होण्यात हा डबल म्युटंट जबाबदार आहे.
हा डबल म्युटंट विषाणू धोकादायक का आहे?
- नवीन म्युटेशन दोन डबल म्युटेशनच्या जेनेटीक कोड (E484Q आणि L452R) पासून आहे.
- या दोन्ही डबल म्युटेशन्समध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे ज्ञात आहे.
- परंतु प्रथमच दोन्ही म्युटेशन एकत्र मिळाले आहेत, ज्याचा अर्थ कोरोनाचा प्रसार आणि त्याच्या भीषणतेत दुपटीनं वाढ झाली.
- डबल म्युटंटवर विषाणूवर लस किती प्रभावी ते याक्षणी हे स्पष्टपणे सांगता येत नाही.
- सध्याची लस डबल म्युटंट विषाणूंविरूद्ध प्रभावी आहे की नाही हे शोधण्यासाठी सध्या अभ्यास सुरु आहे.
- आतापर्यंत असे मानले जाते की भारतातील कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या लसी या व्हेरियंटविरूद्ध प्रभावी आहेत.
शरीरात व्हायरल लोड वाढवण्याची भीती
- म्युटेशननंतर बर्याच वेळा विषाणू पूर्वीपेक्षा कमकुवत होतो, परंतु कधीकधी म्युटेशनची ही प्रक्रिया विषाणूला खूप धोकादायक बनवते.
- अशा परिस्थितीत जर विषाणू आपल्या शरीरातील कोणत्याही पेशीवर हल्ला करतो तेव्हा तो काही तासांत हजारो विषाणू वाढवतो.
- यामुळे शरीरात विषाणूचे प्रमाण वेगाने वाढते आणि रुग्ण लवकरच रोगाच्या गंभीर टप्प्यापर्यंत पोहोचतात.
- इतर प्रकारांपेक्षा हा प्रकार अधिक धोकादायक आहे? का यावर संशोधक अभ्यास करत आहेत.
- मात्र, L452R वर अमेरिकेत बरेच संशोधन केले गेले आहे आणि असे आढळले आहे की यामुळे संसर्ग २० टक्क्यांपर्यंत वाढतो आणि ५० टक्क्यांपर्यंत अँटीबॉडीजवरही परिणाम करतो.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे डबल म्युटेशन? स्ट्रेनबद्दल केंद्राकडून रिपोर्टच मिळत नसल्याने लढण्यात अडचण!