मुक्तपीठ टीम
आतापर्यंत युरोप आणि आखाती देशांपुरताच मर्यादित असलेला कोरोना शोधण्यासाठीचा कुत्र्यांचा वापर आता भारतातही सुरु होणार आहे. लुधियानातील गुरू अंगद देव पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठात त्यासाठी तयारी सुरु आहे. कोरोना आणि कर्करोगासह मादक पदार्थांच्या तपासणीसाठी विशेष जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. रिमाउन्ट व्हेटरनरी कोरच्या (आरबीसी) कुत्र्यांचे प्रजनन करणाऱ्या केंद्राने मानवी शरीरात कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी स्निफर जातीच्या कुत्र्यांना तयार केले आहे.
वास घेण्याच्या जबरदस्त शक्तीमुळे कुत्र्यांना कोरोना ड्युटी
• कुत्र्यांना वासाची शक्ती जबरदस्त असते.
• ही शक्ती मानवांपेक्षा जवळजवळ एक हजार पट जास्त असते. कुत्र्यांनी एकदा वास घेतला की, दुसऱ्यांदा ते तो वास सहज ओळखतात.
• यामुळेच जगात कुत्र्यांच्या या शक्तीचा वापर केला जात आहे.
• त्यामुळे आता भारतातही या शक्तीचा उपयोग करण्याच्या विचार आहे.
• यासाठी विद्यापीठात कुत्र्यांचे प्रशिक्षण त्यासह प्रजनन केंद्र सुरू केले जात आहे.
कुत्रे देणार काही सेकंदातच कोरोना रिपोर्ट
• या केंद्रात कुत्र्यांना कोरोना विषाणू, कर्करोग, अंमली पदार्थांच्या चाचणीसाठी प्रशिक्षण दिले जाईल.
• सुरुवातीला लॅब्राडोर, पग आणि बिगेल जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जाईल. याद्वारे, संसर्गित व्यक्तीची तपासणी लवकर केली जाईल.
• कुत्र्यांच्या मदतीने, संसर्गित कोरोना रूग्ण काही सेकंदातच ओळखला जाऊ शकतो.
• आरटीपीसीआर परीक्षेचा निकाल मिळण्यास आता दोन दिवस लागतात.
• आरबीसीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुन्हा कामावर घेण्यात येणार आहे.
• या संदर्भातील एक प्रकल्प केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
कुत्र्यांमध्ये असते मोठी क्षमता
• संसर्ग झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी इस्रायलने कुत्र्यांच्या वास ओळखण्याच्या तंत्राचा वापर केला आहे.
• जर कुत्र्यांना प्रशिक्षण दिले गेले तर, ते संक्रमित व्यक्तीस ओळखू शकतात.
• कारण संसर्गित कोरोना रूग्णाचे श्वास घेण्याचे प्रमाण वाढते.
• लघवी, घाम, शरीरातील बदलांमुळे कुत्र्यांना वासाने जाणवते.
अबोहरच्या पशुवैद्यकीय विद्यापीठात मल्टी स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय स्थापित करण्यात येईल. हा राज्य सरकारचा प्रकल्प आहे. यासाठी ६२ कोटी रुपये खर्च केले जातील. येत्या दीड वर्षात त्याची इमारत तयार होईल. हे एक प्रकारचे प्रादेशिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र असेल. येथे लहान ते मोठ्या प्राण्यांच्या आजारांची तपासणी केली जाईल. उपचार केले जातील आणि शस्त्रक्रिया करण्यात येतील.