Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेतून मांडला लेखाजोखा

February 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Maharashtra-BJP-leader-Devendra-Fadnavis-770x433

मुक्तपीठ टीम

केंद्राचा अर्थसंकल्प न वाचता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण, तो पूर्ण वाचला असता तर महाराष्ट्रासाठी किती भरीव तरतुदी आहेत, हे स्पष्ट झाले असते. या केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक तरतुदींचा लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रपरिषदेत सादर केला.

अर्थसंकल्पीय तरतूद, विविध विभागांनी विद्यमान प्रकल्पांबाबत यंदाच्या वर्षासाठी केलेली तरतूद, गुंतवणूक, केंद्राची हमी अशा विविध बाबी त्यांनी यातून मांडल्या. शेती आणि सिंचन क्षेत्राची आकडेवारी सांगताना ते म्हणाले की, हवामानाधारित शेती प्रकल्पासाठी ६७२ कोटी रूपये, महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन : २३२ कोटी रूपये, दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पासाठी ३००८ कोटी रूपये, प्रत्येक घराला नळाचे पाणी : ११३३ कोटी रूपये, विदर्भ आणि मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळप्रभावित जिल्ह्यांमध्ये सिंचनसुविधांसाठी ४०० कोटी रूपये देण्यात आले आहेत. शेतकरी सन्मान निधीसाठी ६८२३.८१ कोटी रूपये आहेत.

पायाभूत सुविधांची माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या उर्वरित २६० कि.मीच्या कामांचा ३१ मार्च २०२१ पर्यंत कार्यारंभ होईल. ईस्ट-वेस्ट फ्रेट कॉरिडॉर : भुसावळ ते खरगपूर ते डंकुनीला मंजुरी देण्यात आली आहे. रस्ते प्रकल्पांसाठी एकूण तरतूद : १,३३,२५५ कोटी रूपये असून यात एकूण प्रकल्प : ३२८, तर एकूण कि.मी : १०,५७९ इतकी आहे. मुंबई मेट्रो-३ साठी : १८३२ कोटी रूपये, पुणे मेट्रोसाठी : ३१९५ कोटी रूपये, नागपूर मेट्रो टप्पा-2 साठी : ५९७६ कोटी रूपये, नाशिक मेट्रो प्रकल्पासाठी : २०९२ कोटी रूपये, मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी : ४४१ कोटी रूपये.

विद्यमान ३९ रेल्वे प्रकल्प कार्यान्वयन/नियोजन/मंजुरीच्या विविध टप्प्यात आहेत. त्याची एकूण किंमत : ८६,६९६ कोटी रूपये असून एकूण लांबी : ६७२२ कि.मी. इतकी आहे. यात २०१७ कि.मीच्या १६ नवीन लाईन्स (४२,००३ कोटी रूपये), ११४६ कि.मीचे ५ गेज रूपांतरण प्रकल्प (११,०८० कोटी रूपये), ३५५९ कि.मीचे १८ डबलिंग प्रकल्प (३३,६१३ कोटी रूपये) यांचा समावेश आहे. रेल्वेने यंदाच्या अर्थसंकल्पात ७१०७ कोटी रूपये महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद असून ती ५०७ टक्के अधिक आहे. २००९-१४ या काळात महाराष्ट्राला प्रतिवर्षी ११७१ कोटी रूपये मिळत असे.

यात अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ (२५० कि.मी) : 527 कोटी रूपये, वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ, पुसद (270 कि.मी) : 347 कोटी रूपये, इंदूर-मनमाड व्हाया मालेगाव (३६८ कि.मी) : ९५४७ कोटी रूपये, सोलापूर-उस्मानाबाद नवीन मार्ग व्हाया तुळजापूर (८४ कि.मी) : २० कोटी रूपये, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे गुंतवणूक : ७८९७ कोटी रूपये इत्यादी प्रमुख तरतुदी आहेत.

 

टॅक्स डिव्होल्यूशनसाठी ४२,०४४ कोटी, वित्त आयोगाचे अनुदान १०,९६१ कोटी, स्पेशल असिस्टन्स फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर ५२९ कोटी, सीएस/सीएसएसचे १३,४१६ कोटी रूपये इत्यादींचा उल्लेखही त्यांनी पत्रपरिषदेत केला.


Tags: budgetdevendra fadanvisईस्ट-वेस्ट फ्रेट कॉरिडॉरकेंद्रीय अर्थसंकल्पदिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेदेवेंद्र फडणवीसनाशिक मेट्रो प्रकल्पमहाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशनमुंबई मेट्रो प्रकल्पविरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसशेतकरी सन्मान निधी
Previous Post

पाच महिन्यांच्या तीराला मिळणार इंजेक्शन; पंतप्रधान मोदींकडून कर माफ

Next Post

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे कृषी कायदे रद्द करणार, प्रियांका गांधीची महापंचायतीत घोषणा

Next Post
priyankagandi-

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे कृषी कायदे रद्द करणार, प्रियांका गांधीची महापंचायतीत घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!