मुक्तपीठ टीम
अचानक, वेळी अवेळी कधीही येणारे अनोळखी कॉल, एसएमएसचा भडिमार…त्रासून जातो आपण सर्वच. पण आता सर्व मोबाईल ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. आता आपल्याला नको असलेले अनोळखी कॉल, एसएमएस यापासून सुटका होण्याची शक्यता आहे. डीओटी विभागाने पुन्हा-पुन्हा येणारे फोन कॉल किंवा एसएमएसद्वारे जास्त त्रास देत असणाऱ्यांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनोळखी कॉल – एसएमएस पाठवणाऱ्यांना मोठा दंड
• डीओटीकडून अशा कॉल आणि एसमएमएस पाठवणाऱ्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.
• त्यासाठी खास नियमावली ठरवण्यात येत आहे.
• नव्या नियमांनुसार ५० तक्रारींनंतर असे करणाऱ्या प्रत्येक कॉल,एसएमएस साठी १०,००० रुपयांचा दंड लावला जाईल.
• नवीन प्रस्तावा नुसार शून्य ते १० उल्लंघना साठी प्रति उल्लंघन हजार रुपये, १० ते ५० उल्लंघन प्रति उल्लंघन पाच हजार रुपये आणि पन्नास ते जास्त उल्लंघन केल्यावर दहा हजार रुपये चा दंड लावण्याचा नियम आहे.
पुन्हा उल्लंघनाची खात्रि पटल्यास सर्व क्रमांक डिस्कनेक्ट केले जातील आणि त्यांच्याशी संबंधित आयएमईआय संशयास्पद यादीत टाकले जातील. संशयास्पद यादीमध्ये आयएमईआयसाठी ३० दिवसांच्या कालावधीसाठी कोणत्याही कॉल, एसएमएस किंवा डेटा (इंटरनेट) ला परवानगी दिली जाणार नाही. संशयित यादीमध्ये सूचीबद्ध आयएमईआय क्रमांकासह डिव्हाइस वापरुन नवीन कनेक्शनला एग्रीज्ड कॉलरद्वारे केलेले कोणतेही कॉल, एसएमएस किंवा डेटा पुन्हा सत्यापित करण्यास सांगितले जाईल.
दोन वर्षांची बंदी
• पुन्हा पडताळणीनंतर अडचणीत आलेल्या कॉलरचा नंबर सक्रिय झाल्यास आणि पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास नवीन कनेक्शनचा वापर सहा महिन्यांकरिता दररोज २० कॉल आणि २० एसएमएसपुरते मर्यादित असेल.
• त्यानंतरही उल्लंघन होतच राहिल्यास दूरसंचार कनेक्शन खरेदी करण्यासाठी वापरलेली ओळख आणि पत्ता पुरावा दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल.
नको त्या कॉल्ससाठी कडक दंड
• दूरसंचार विभागांचे डिजिटल इंटेलिजेंस युनिट कॉल उल्लंघनांची चौकशी करेल
• संशयास्पद नंबरची पडताळणी करण्यासाठी सिस्टम जनरेटेड संदेश पाठवेल
• पुन्हा पडताळणीच्याबाबतीत नंबर बंद केला जाईल
• तसेच संबंधित आयएमआयला करड्या यादीमध्ये टाकले जाईल
• अशा नंबरवर ३० दिवस संदेश आणि कॉलची सुविधा नाही.
• ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट केलेला आयएमआय नंबर असलेल्या मोबाइलला पुन्हा सत्यापन करावे लागेल
– पडताळणीनंतरही नियमांचे उल्लंघन केल्यास संदेशांची संख्या कमी होईल
• असे ग्राहक सहा महिन्यांसाठी जास्तीत जास्त २० संदेश पाठवू शकतील.
• यानंतरही दोन वर्ष उल्लंघन रोखले जाईल.