मुक्तपीठ टीम
कंत्राटदार व अभियंता हा नेहमीच समाजाच्या दृष्टीने, लोकाच्या नजरेत चांगलेच असतात असे नाही. गैरसमजातून अनेकदा वाईटच बोलले जाते, पण हेच कंत्राटदार, अभियंता जेव्हा देवदूत बनून येतात, तेव्हा तेव्हा मात्र लोकांचे हात कृतज्ञतेने जोडलेही जातात. नागपुरात सध्या याच दगड-मातीवाल्यांच्या रूग्णसेवेची प्रशंसा होत आहे.
त्यांची कथा प्रवीण महाजन यांच्या शब्दात:
दगड-मातीवाल्यांची रूग्णसेवा
कंत्राटदार व अभियंता हा नेहमीच समाजाच्या दृष्टीने, लोकाच्या नजरेत चांगला नसतो. हे कुठे ना कुठे नेहमीच बोलल्या जाते, ते बरोबर असते असे मुळीच नाही. वर वर समाज या कंत्राटदाराला, अभियंत्याला पाहत असतो आणि आपले मत बनवित असतो. सर्वच वाईट असतात असेही नाही. काहीचा अपवाद सोडला तर बरेच जण चांगले असतात. याचा प्रत्यय कोरोना काळात येत आहे. कंत्राटदार, अभियंता जेव्हा देवदूत बनून येतो तेव्हा मात्र लोकांचे हात नमस्कारासाठी जोडल्या जात आहेत.
मुळात माती – दगडात, गांवा बाहेर जंगलात हा अभियंता, कंत्राटदार काम करत असतो, तेव्हा त्याबाबत फारसे माहित नसते. अंत्यत अडचणीचा सामना करत तो विश्वमित्राचे काम करत असतो. ज्या काही विकास योजना आकाराला येत असतात त्यात त्याचेशिवाय शक्यच नसतात. समाजाला त्यांच्या चांगल्या कामाविषयी कळत नसते. चांगल्या कामाची वाह वाह होत नसते. थोडे चूक झाले कि गांवभर मात्र डंका पिटल्या जातो आणि मग बदनामीचा ससेमिरा त्यांचे मागे लागतो. आज मात्र कंत्राटदार व अभियंताचे कोरोना आयसोलेशन केंद्र म्हणटले की लोकांना आश्चर्य वाटत आहे. शेती आणि पिण्यासाठी पाणी वितरण करणार्या जलसंपदा विभागातील दगड-मातीचे काम करणारे कंत्राटदार कोरोना महामारीत समाजऋण फेडण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांनी हाती घेतलेले काम हे फार मोठे आहे. १०० खाटांचे कोरोना आयसोलेशन केंद्र ते पण सर्व सोयींने युक्त आणि पूर्ण पणे निःशुल्क. हे काम दिसते तेव्हढे सोपे अन छोटे मुळीच नाही, नेहमीच संकटसमयी काम करणारा हा कंत्राटदार व अभियंता समाजासाठी धडपडत असतो ते मात्र दिसत नसते. आज मात्र ज्या तयारी निशी आपले कार्यक्षेत्र नसलेल्या आरोग्य सेवेत ते उतरले आहे हे अभिनंदनीय आहे.
कोरोना आयसोलेशन सेंटरची कल्पना छोटी नव्हती. योजनेचा आवाका मोठा होता. कोरोना काळात कोणी साथ देईल अशी परीस्थिती नसतांना नेहमी सारखेच स्वत:ला झोकून देणारा महाजनाचा स्वभाव यावेळी सुध्दा कोरोना रूग्णांचे दुःख पाहून हळहळला आणि कोरोना आयसोलेशन सेंटर साठी पुढाकार घेत त्यांनी आपल्या काही मित्राना सांगितले, तेव्हा उत्तर नेहमीचेच ठरलेले, तू जबाबदारी घेत असल्यास आम्ही तयार आहे. मग प्रश्न होता आर्थिक मदतीचा, ६०-७० बेडसाठी जागेचा, या दोन गोष्टी जर जुळून आल्या तर रूग्णाची काळजी घेणारे आरोग्य दूत कसे मिळतील याचा. जागेचा शोध चालू असतांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वैनगंगा नगरात काही कार्यालय आहेत. प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रातील हॅास्टेलचा विचार समोर आला. या हॅास्टेलच्या इमारती वर्षभरापासून रिकाम्या होत्या, त्यांचा उपयोग कोरोना बाधितांसाठी झाला तर केंद्र चालू करणे व सांभाळणे सुलभ होईल ही धारणा पक्की झाली.
या कल्पनेला मुर्त स्वरूप देण्याकरीता राजेंद्र मोहिते, कार्यकारी संचालक या उच्चस्थ अधिका-याकडे प्रवीण असलेल्या महाजनानी कल्पना मांडली. ही योजना साकार करता आली तर अनेकांना मदत होईल, थोडे का होईना आपणास त्यांचे दुःख कमी करता येईल. थोड्या प्रमाणात का होईना पण लोकाचा जीव वाचविता येईल यावर मोहिते साहेबांनी होकार देत आपले वरीष्ट्र असलेले अप्पर मुख्य सचिव विजयकूमार गौतम व जलसपंदा मंत्री जयंतराव पाटील यांचे कानावर टाकली आणि त्यांनी अवघ्या काही सेंकदात या प्रकल्पास मान्यता दिली व स्वत: या सेवा समर्पणासाठी वेळ देवून हा आरोग्य सेतू जनतेच्या सेवेत रूजू करण्यासाठी मदत केली. आता प्रश्न शिल्लक होता आरोग्य व्यवस्थेचा. यासाठी प्रविण महाजनाचे मित्र व गेली १५ वर्षापासून अनेक समाज कार्यात सोबत असलेले डॅाक्टर पिनांक दंदे यांनी त्यांचे प्रेमा खातर ही जबाबदारी कुठलेही आडे वेडे न घेता स्विकारून या योजनेवर शिक्का मोहुर्तब केला.
जलसंपदा विभागाने जागा उपलब्ध करून दिली तर कंत्राटदार बंधूनी आर्थिक बाजू भक्कम करत आपला पांठिबा दर्शिविला. आरोग्य सेवेची जबाबदारी डॅा. दंदे फाऊन्डेशनने स्विकारली. आता योजेनाला आकार प्राप्त झाला होता. आज हे कोरोना आयसोलेशन सेंटर प्रत्यक्ष रूग्ण सेवेत चालू झाले आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीत अजनी येथील हे कोरोना केअर सेंटर अनेक रुग्णांना दिलासा देण्याचे काम करीत असून येथे गरजू लोकांसोबत गोरगरीबाना सुध्दा मोफत औषधापोचारा सोबत, राहण्याची सोय, दोन वेळेचे पौष्टिक जेवण, नास्ता, चहा व बिस्कीट आणि बिसलरी पाणी ते पण विनामुल्य देत आहे. या विलगीकरण केंद्रातील राहणार्यांच्या सेवे करीता डॉ. दंदे फाऊंडेशनचे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी चोवीस तास डॉ. पिनाक दंदे व डॅा. सौ. सीमा दंदे यांचे नेतृत्वात सेवा देत आहे. डॅा. लोकेश अग्रवाल या केंद्राची जबाबदारी सांभाळत असून आज केंद्रात या रूग्ण दाखल झालेले आहे.
कोरोना महामारीत आवश्यक्ता आहे समाजातील सामाजिक संघटनांनी आपल्या कामाचा परीघ वाढविण्याची. रुग्णांना मदत मिळवून देणेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेवून पुढे येण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयांमधील भार हलका होण्यासाठी अशा सेवा कार्याची नितान्त आवश्यकता आहे. कोरोना चेन तोडण्यासाठी समाज, स्वयंसेवी संस्था या साऱ्यांनी पुढाकार घेवून मदत कार्य करण्याची गरज आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, डॅाक्टर दंदे फाऊन्डेशन व कॅान्ट्रक्टर बिल्डर्स असोशिएशन याचा हा उपक्रमला खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन.
पाहा व्हिडीओ: