मुक्तपीठ टीम
आयआयटी मद्रासमध्ये शिकलेल्या आयआयटीयनन्सी कोरोना संकटातील चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या स्टार्टअपनं थ्रीडी प्रिंटिग तंत्रज्ञानाने आता चक्क ६०० चौरस फुटांचे घर बनवले आहे. खरंतर छापले आहे. त्या घरात हॉल, किचन, बेडरूम सारं सारं काही बांधण्यात नाही तर छापण्यात आलं आहे.
हे तंत्रज्ञान आयआयटी मद्रासमधील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे तीन माजी विद्यार्थी आणि आता तिस्ता मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स या स्टार्टअपचे सीईओ आदित्य व्हीएस, सीईओ विद्याशंकर सी आणि सीटीओ परिवर्तन रेड्डी यांनी विकसित केले आहे. त्यांनी ‘त्वास्ता मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स’ ही स्टार्टअप सुरु केली आहे. त्वास्ताच्या टीमने कॉन्क्रिटचे थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञाम म्हणजे ‘रेडी टू-इम्प्लिमेड मेथडॉलॉजी’ आहे. त्यासाठी बांधकामासाठीचा पूर्वतयारीचा वेळ जात नाही. त्यामुळे इतरही बरेच फायदे आहेत. आयआयटी मद्रासमध्ये असलेल्या भारताच्या पहिल्या ३-डी मुद्रित घराचे ऑनलाइन उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले.
Stay tuned in for further details on India’s First 3D Printed House by Tvasta.#construction #constructionautomation #concrete3dprinting #concreteprinting #indiasfirst3dprintedhouse #3dprinting #industrialautomation #3dconcreteprinting #technology pic.twitter.com/yzyzy5kcAR
— Tvasta (@Tvasta_3DP) October 31, 2020
त्यांनी वर्कशॉपमध्ये आधी घराचे वेगवेगळे भाग छापले आणि त्यानंतर क्रेनद्वारे ते चेन्नई कॅम्पसमध्ये जोडले. ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या घरात एक बेडरूम, हॉल, किचन आणि इतर आवश्यक भाग आहेत. थ्री डी प्रिटिंग तंत्रज्ञानाने रिकाम्या जमिनीवर फाउंडेशनच्या प्रत्येक सुविधेसह एक हजार चौरस फूट घर अवघ्या अडीच आठवड्यात बांधले जाईल.
एकूण बांधकाम खर्च आणि वेळेची बचत करण्यात हे तंत्रज्ञान खूप उपयोगी ठरते. तसेच कार्बन फूटप्रिंटही खाली आणते. या घराच्या निर्मितीसाठी पर्यावरणास अनुकूल साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
कसे छापले जाते थ्री डी प्रिंटिगने घर?
• आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी अवघ्या पाच दिवसात थ्रीडी प्रिंटरने सिमेंट काँक्रीट हाऊस बांधले.
• चेन्नई परिसरात ६०० चौरस फूट क्षेत्रफळाचे एक मजली घर बांधण्याचा खर्चही पारंपारिक बांधकाम खर्चाच्या तुलनेत ५० टक्क्यांनी कमी झाला.
• थ्री डी प्रिंटेड घराच्या कल्पनेपासून डिझाईन पर्यंत घरापर्यंतची प्रत्येक गोष्ट ‘मेड इन इंडिया’ आहे.
• हे गृहनिर्माण क्षेत्रातील एक क्रांतिकारक तंत्रज्ञान मानले जाते.
• भविष्यात स्वस्त आणि मजबूत घर बनविण्यासाठी हे तंत्रज्ञान खूपच उपयोगी आहे.
• आता ‘बिल्ड’ ऐवजी ‘प्रिंट’ म्हणजेच बांधण्याऐवजी छापले हा शब्द वापरला जाऊ शकतो.
• हे घर तयार करण्यासाठी एक मोठा 3 डी प्रिंटर वापरण्यात आला.
• हा प्रिंटर थ्री डी डिझाइन फाइल्स स्वीकारून लेयर आउटपुटद्वारे थर प्रदान करतो.
• थ्री-बाय-लेयर पद्धतीने 3 डी रचना फॅब्रिक केल्या जातात.
• मटेरियल, सिमेंट, काँक्रीट स्लरी म्हणून त्यात वापरण्यात येत होते.
पाहा व्हिडीओ: