मुक्तपीठ टीम
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरु असलेल्या प्रदीर्घ गदारोळानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. मात्र खरगे विरुद्ध थरूर अशा सामन्यात खरगे यांचं पारडं जड असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
खरगे काँग्रेसचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात…
- खरगे यांनी ३० सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला, त्यानंतर आता १७ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.
- त्यांनी नामनिर्देशन केले तेव्हा त्यांच्यासोबत ३० प्रस्तावक उपस्थित होते.
- ८० वर्षीय खरगे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह उमेदवारी अर्जांचे १४ संच सादर केले.
- त्यांच्या समर्थकांमध्ये अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, एके अँटनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक यांचा समावेश आहे.
- याशिवाय, त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी आणि भूपेंद्र हुडा यांसारखे नेते आहेत, जे जी-२३ चा भाग आहेत, पक्षात बदल करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांचा गट.
खरगे यांच्या समर्थनार्थ G-23 चे अनेक नेते
- शुक्रवारी एआयसीसी मुख्यालयात खरगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे अनेक नेते त्यांच्यासोबत होते.
- जी-२३ चे अनेक नेते त्यांना पाठिंबा देत आहेत.
- खरगे यांच्या कागदपत्रांवर अनेक खासदारांनी सह्याही केल्या आहेत.
- जर खरगे यांनी निवडणूक जिंकली तर ते एस निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते असतील.
- विजयी झाल्यास जगजीवन राम यांच्यानंतर हे पद भूषवणारे ते दुसरे दलित नेते असतील.
थरूर यांनी उमेदवारी अर्जाचे केवळ ५ संच भरले
- शशी थरूर हे स्वतः जी-२३ चे सदस्य राहिले आहेत.
- त्यांनी उमेदवारी अर्जाचे ५ संच दाखल केले.
- थरूर यांच्या काही समर्थकांमध्ये चिदंबरम, मोहम्मद जावेद आणि प्रद्युत बोरदोलोई यांचा समावेश होता.
- ६६ वर्षीय थरूर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी खरगे यांना पक्षाचे ‘भीष्म पितामह’ असे संबोधले.
खरगे नेहमीच नेहरू-गांधी घराण्याशी एकनिष्ठ
- ५० वर्षांहून अधिक काळ खरगे राजकारणात सक्रिय आहेत.
- खरगे हे नेहरू-गांधी घराण्याशी नेहमीच प्रामाणिक मानले गेले आहेत.
- काँग्रेसने आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे.
- अलीकडच्या काळात, जेव्हा राहुल आणि सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले होते तेव्हाही ते पुढे आले होते.
- रस्त्यावर निदर्शने करताना ते उपस्थित होते.