मुक्तपीठ टीम
गुणवत्तेशी तडजोड न करता नाविन्यपूर्ण संशोधनाचा रस्ते बांधणीत उपयोग केला पाहिजे. रस्ते बांधणीत स्टील व सिमेंटचा वापर कमी केला पाहिजे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसे करताना सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलचा उपयोग रस्ते उपकरणाच्या यंत्रणेसाठी करावा. आयातीवर निर्बंध लादणे, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी पद्धती आणि पर्यायी इंधन विकासावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. “भारतातील रस्ते विकास” या विषयावरील सोळाव्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
- सुमारे ६३ लाख किलोमीटर रस्त्याचे जाळे असणारा भारत हा याबाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
- रस्ते पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
- कारण ७० टक्के वस्तू आणि सुमारे ९० टक्के प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर केला जातो.
- पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांत भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
• सरकार राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १.४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच १११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.
• यावर्षी सरकारने पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च ३४ टक्क्यांनी वाढवून ५.५४ लाख कोटी रुपये केला आहे.
• पायाभूत सुविधांमधील वाढीव गुंतवणूकीमुळे कोरोना महामारीच्या काळात रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. ते म्हणाले कि दररोज ४० किमी प्रमाणे ६० हजार कि.मी. लांबीचे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.