Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

मुख्यमंत्र्यांनी मांडलं  ‘स्थानिकांचा सहभाग, लोणारचा विकास’ धोरण

लोणार विकासाचा आराखडा आणि लोणार सरोवराविषयी सर्वकाही समजून घ्या

February 8, 2021
in सरकारी बातम्या
0
Uddhav thackeray lonar-1

मुक्तपीठ टीम

         लोणारसारखी स्थळे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या वैभवाचे जतन, संवर्धन करुन त्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. हा विकास करतांना स्थानिक गावकऱ्यांचे प्रश्न समाजावून घेऊ, त्यांची सोडवणूक करु व त्यांचा सहभागही ह्या विकास प्रक्रियेत करुन घेऊन  हा आराखडा राबविण्यात येईल. याच धर्तीवर ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ चा ही विकास करण्यात येईल, तेथेही आपण लवकरच भेट देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav thackeray lonar -2

            श्री. ठाकरे यांनी लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवराची पाहणी करुन या परिसराचे जतन संवर्धन व विकासाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी त्यांचे समवेत  पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर,आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, लोणार नगराध्यक्ष पूनम पाटोळे, मुख्य सल्लागार अजोय मेहता, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,  माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, आदी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी लोणार सरोवर संवर्धन  विकास कामांबाबत सादरीकरण केले. यात प्राधान्याने करावयाच्या कामांची माहिती देण्यात आली.  सुलतानपूर येथील कौशल्य विकास केंद्र व अंजनी खुर्द येथील  आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, लोणार परिसर आणि यासारखी अनेक स्थळे ही महाराष्ट्राचे वैभव आहेत. हा लपलेला खजिना आहे. हा आपल्याला जगासमोर आणायचा आहे. लोणार सरोवर परिसराचे जतन संवर्धन करतांना निश्चित प्राधान्यक्रम ठरवून कामे केली जातील. यात जे जे नैसर्गिकरित्या प्राप्त झाले आहे ते जतन करणे याला प्राथमिकता असेल.  इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे. सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करणे, प्रक्रिया करणे ह्या सर्व बाबी विकास आराखड्यात आहेत. ह्या विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही. तसेच प्राचीन मंदिरांचेही जतन संवर्धन केले जाईल. याचाच एक भाग म्हणून लोणार महोत्सव आयोजित करावा, अशी सूचनाही श्री.ठाकरे यांनी केली.

            श्री. ठाकरे म्हणाले, हा विकास करतांना स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर ते समाजावून घेऊन सोडवणूक करु आणि सर्व मिळून ह्या परिसराचा विकास करु,असेही श्री.ठाकरे यांनी स्पष्ट केले. याच धर्तीवर मातृतीर्थ  सिंदखेडराजा येथील विकास करावयाचा आहे. त्यासाठी नियोजित आराखड्यावर  मुंबईत बैठका होतील. या विकासाबाबत प्रश्न समजावून घेऊन त्यावरचे उपाय निश्चित करुन मग प्रत्यक्ष सिंदखेडराजाला भेट देण्यासाठी आपण येऊ, अशी ग्वाहीही श्री. ठाकरे यांनी दिली.

            श्री. ठाकरे म्हणाले की, ठरल्याप्रमाणे आराखडा नक्की झाल्यावर होणारे काम हे वेगात आणि पक्के व्हायला हवे. हे वैभव जपण्याची व त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपणा साऱ्यांची आहे. लोणारच्या विकासासाठी मी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून नियंत्रण ठेवेन, प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येईल, असेही श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. तहसिलदार सैफन नद्दाफ यांनी सूत्रसंचालन केले.

 

लोणार सरोवर आहे तरी कसं?

  • लोणार हे बुलडाणा जिल्ह्यात असून येथे  उल्कापाताने तयार झालेले मोठे विवर आहे.
  • इतक्या मोठ्या आकाराचे व बेसॉल्ट खडकातील हे एकमेव विवर आहे.
  • या ठिकाणी  झालेल्या उल्कापाताचा काळ हा सुमारे ५० हजार वर्षापूर्वीचा असावा, असे मानले जाते.
  • या सरोवराचा व्यास  सुमारे १८३० मिटर तर खोली १५० मिटर आहे.
  • वर्तुळाकार असलेल्या या सरोवराचा परिघ सहा किमी इतका आहे.
  • या परिसरात अनेक  प्राचीन मंदिरे आहेत.

‘लोणार’चा विषय पूर्वीपासूनच मनात; मुख्यमंत्री रमले आठवणीत

Uddhav thackeray lonar -4

            लोणारबाबत, ‘मुख्यमंत्र्यांनी सांगितले हा विषय फार पूर्वीपासून मनात होता. बऱ्याच वर्षांपूर्वी मी  लोणार येथे आलो होतो. येथील मी काढलेले छायाचित्र माझ्या छायाचित्र प्रदर्शनात लावले होते. प्रदर्शन पहायला येणारे लोक लोणारच्या छायाचित्रापाशी थबकत. ते याबद्दल कुतुहलाने चौकशी करत. इथे यायचं कसं? थांबायचं कुठं अशी माहिती विचारत. त्या वेळपासूनच ह्या भागाचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने झाला पाहिजे हे मनात होते. म्हणूनच मी आज इथे आलो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

असा आहे ‘लोणार संवर्धन व विकास आराखडा’

  •  लोणार सरोवर संवर्धन व जतन करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ९१ कोटी २९ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.
  • त्यात प्रयोगशाळा व पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालय
  • दुर्गा टेकडी परिसरात रस्ते,सांडपाणी, वाहनतळ व सुशोभिकरण,
  • सरोवराजवळील सुरक्षा कक्ष, निरीक्षण तळ, प्रदूषण विरहित बसेस आदी कामे
  • तसेच सरोवर परिसरातील पुरातन मंदिरांचे संवर्धन, शासकीय इमारतींचे नूतनीकरण,
  • दुर्गा टेकडी येथे पर्यटक निवास बांधणे प्रस्तावित आहेत.
  • याशिवाय ६१ कोटी रूपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगर परिषद, लोणार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणार आहे.
  • तसेच ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चून पिसाळ बाभूळ निष्कासन प्रकल्प विभागीय वनाधिकारी, वन्यजीव अकोला या यंत्रणेमार्फत राबविण्यात येईल.
  • ५४ हेक्टर क्षेत्रावर हे काम करण्यात येईल.
  • तसेच परिसराच्या विकासासाठी आवश्यक खाजगी जमीन  संपादनासाठीही १५ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव आहे.
  • एकूण लोणार सरोवर परिसराचा विकास करण्यासाठी २०५ कोटी १२ लक्ष रुपयांचा विकास आराखडा करण्यात आला असून  त्यातून मंजुरी मिळालेल्या व निधी प्राप्त झालेले साडेसात कोटी रुपयांची कामे पूर्ण ही झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली

००००००

वनकुटी व्ह्यू पॉईंटवरून मुख्यमंत्र्यांनी केली लोणार सरोवराची पाहणी

Uddhav thackeray lonar-1

          मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील सरोवराची वनकुटी व्ह्यू पाँईंटवरून पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली. भेटी दरम्यान त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सरोवराचे छायाचित्रही घेतले. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि. प. अध्यक्ष मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा ‘कृउबास’ चे सभापती जालींधर बुधवत आदींसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

            पाहणी करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका कोणत्या पद्धतीने करावा, याचा विचार एकत्रितरित्या करण्यात यावा. सरोवर परिसरात मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या ठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची  वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा.  लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी.

            लोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, अशा सूचनाही श्री.ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

०००००

लोणारच्या धारातीर्थ परिसर व दैत्यसुदन मंदिराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

Uddhav thackeray lonar -3

  • विकासकामांबाबत दिल्या सूचना
  • सेल्फी घेऊन सरोवराचे केले छायाचित्रण

 

            बुलडाणा, दि. 5 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील धारातीर्थ परिसराची पाहणी केली. धारातीर्थ येथील सतत वाहणारी धार, परिसरात असलेली वृक्षवल्ली, वन्यजीव आदींची माहिती मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी घेतली. माहिती घेत असतानाच परीसर विकासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

            यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा ‘कृउबास’चे सभापती जालींधर बुधवत आदींसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरोवरासोबत सेल्फीसुद्धा घेतला. तसेच उपस्थितांसोबत सरोवराचे छायाचित्रणही केले.

Uddhav thackeray lonar -5

 धारातीर्थ परिसराच्या विकासाबाबत सूचना देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, परिसरातील जमिनीचे सपाटीकरण करून लँण्डस्केप विकसित करावे. अतिशय मानव निर्मितपणा वाटू नये याची काळजी घेत त्याचा नैसर्गिकपणा जपावा.  सौंदर्यीकरण करून शोभेची झाडे लावण्यात यावीत. परिसराच्या विकासासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे.

            धारातीर्थ परिसराची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी गावातील दैत्यसुदन मंदिराला भेट दिली.  दैत्यसुदन मंदीरात मुख्यमंत्र्यांनी तेथील ऐतिहासिक शिल्पाविषयी माहिती घेतली.  दैत्यसुदन मंदिरातील कोरीव कामाची पाहणीही त्यांनी केली. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत छायाचित्रण केले. कोरीव कामांचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. यावेळी लोणार सरोवराचे अभ्यासक स्व. सुधाकर बुगदाने यांच्या स्नुषा शैलेजा श्रीपाद बुगदाने व शुभदा स्वप्नील बुगदाने यांनी स्व. सुधाकर बुगदाने लिखित लोणार सरोवर हे पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिले


Tags: chief minister uddhav thackeraylonarमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलोणार
Previous Post

कसोटीच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व; कर्णधार जो रुटने झळकवले विक्रमी शतक

Next Post

महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस किमान तापमान घटणार “IMD GFS मॉडेलनुसार, राज्यात ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान परत किमान तापमानात घट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमान १०° सेल्सियसच्या खाली जाण्याची शक्यता. मुंबई, ठाणे…१५ ते १६° ! काळजी घ्या, आनंद पण घ्या” हवामान खात्याचे संशोधक के. एस. होसालीकरांचे ट्वीट

Next Post

महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस किमान तापमान घटणार "IMD GFS मॉडेलनुसार, राज्यात ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान परत किमान तापमानात घट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमान १०° सेल्सियसच्या खाली जाण्याची शक्यता. मुंबई, ठाणे...१५ ते १६° ! काळजी घ्या, आनंद पण घ्या" हवामान खात्याचे संशोधक के. एस. होसालीकरांचे ट्वीट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!