Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवाजी पार्क मैदानावर कायमस्वरुपी रोषणाई, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

October 15, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Maha CM

मुक्तपीठ टीम

दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. यावेळी पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका सभागृह नेता विशाखा राऊत, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर विद्युत रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण केले. मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या प्याऊचे लोकार्पण व कोनशिला अनावरण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे व सर्व मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. मैदान परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघणाऱ्या परिसराचे अवलोकन करतानाच सर्व रोषणाई स्वयंचलित पद्धतीने व रंगीबेरंगी कशी संचालित होते, त्याची प्रत्यक्ष पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा सन १९६६ मध्ये उभारण्यात आला. तथापि, या पुतळ्यावर आजपर्यंत कोणतीही विद्युत रोषणाई करण्यात आली नव्हती.
  • महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर तसेच या मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात यावी, असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.
  • मुख्यमंत्री महोदयांच्या आमदार निधीतून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला आहे. यामध्ये ५ वर्षांचा परिरक्षण खर्चदेखील समाविष्ट आहे.
  • ही रोषणाई कायमस्वरुपी आहे. तसेच स्वयंचलित व विविधरंगी म्हणजे रंग बदलत्या स्वरुपाची आहे.
  • प्रामुख्याने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा म्हणून विविध रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत.
  • पुतळ्याच्या पदपीठावर (pedestal) विविध रंग बदलणारे एलईडी वॉल वॉशर दिवे लावले आहेत.
  • पुतळ्याच्या पदपीठावरील खोबणीत एलईडी स्ट्रीप लावली आहे.
  • पुतळ्याच्या चारही बाजुस जळती मशाल भासेल, अशारितीने दिवे बसविण्यात आले आहेत.
  • पुतळ्याच्या आजुबाजूस असलेल्या उद्यानात एलईडी स्पाईक दिवे लावले आहेत.
  • पुतळ्याच्या पदपीठावर रेषीय भूमिगत दिवे लावण्यात येणार आहेत.
  • पुतळ्याच्या आजुबाजूच्या पदपथाची शोभा वाढवण्यासाठी ४२ बहुरंगी एलईडी ग्लोब दिवे बसविले आहेत.
  • बेंगाल क्लब परिसरातील धबधबा तसेच झाडांवर रंग बदलणारे एलईडी विद्युत दिवे लावले आहेत.
  • मैदानाच्या पदपथास लागून सुशोभित असे २५ बोलार्डस (छोटेखानी खांब) लावले आहेत.
  • मैदान परिसरातील ७ प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक भित्तीचित्रं, दीपस्तंभ आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळा या सर्व ठिकाणी एलईडी विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.
  • छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात गोबो लाईट्स प्रोजेक्शन लावण्यात येणार आहेत.
  • मैदानाच्या दोन्ही बाजूस असलेले सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक यांचे सौंदर्यीकरण व रोषणाईचे काम प्रगतिपथावर आहे.
  • ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागविले आहेत. या सर्व साहित्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे.
  • सर्व विद्युत दिवे आणि साहित्य यांस एकूण ५ वर्षांची हमी आहे. प्रकल्प खर्चामध्ये प्रत्येक वर्षाची अर्थात वार्षिक परिरक्षण किंमत देखील समाविष्ट आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील कबड्डी असोसिएशन येथे स्थित १०० वर्षांचा वास्तूवारसा असलेल्या पुरातन प्याऊचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येणारे खेळाडू तसेच परिसरात येणाऱया नागरिकांना पाणी पिण्याची सुविधा म्हणून ही प्याऊ उपयोगात येणार आहे. प्याऊमधून २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. प्याऊच्या जीर्णोद्धारासह या सुविधेसाठी एकूण २० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.


Tags: Aaditya Thackeraychief minister uddhav thackeraykishori pednekarआदित्य ठाकरेकिशोरी पेडणेकरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवाजी पार्क
Previous Post

महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

Next Post

आर्यन ड्रग्स प्रकरणामुळे मंत्रीपुत्राच्या शेतकरी हत्याकांडाकडे दुर्लक्ष

Next Post
Aryan khan-lakhimpur

आर्यन ड्रग्स प्रकरणामुळे मंत्रीपुत्राच्या शेतकरी हत्याकांडाकडे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!