मुक्तपीठ टीम
प्रसारण सुधारणां अंतर्गत दूरदर्शन आणि आकाशवाणीतून गेल्या दोन वर्षांपासून कालबाह्य अॅनालॉग टेरेस्ट्रियल टीव्ही ट्रान्समीटर सारखे तंत्रज्ञान प्रसार भारती वेगाने बाद करत आहे. यामुळे नव्या तंत्रज्ञान आणि नवीन आशयाच्या संधीकडे वळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अॅनालॉग प्रादेशिक दूरदर्शन केंद्रे बंद केल्यामुळे ५जीसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रादेशिक केंद्रांचे कार्यक्रम हे प्रादेशिक वाहिन्या आणि समाजमाध्यमांवर वापरले जाणार आहेत.
काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रकाशित होत असल्याची दखल घेत प्रसार भारतीने स्पष्ट केले आहे की कालबाह्य अॅनालॉग टेरेस्ट्रियल टीव्ही ट्रान्समीटरला टप्प्याटप्प्याने बाद केले जात आहे. मात्र या प्रसारण सुधारणा चुकीच्या पद्धतीने सादर केल्या जात आहेत. अलीकडेच, डीडी सिलचर, डीडी कलबुर्गी इत्यादींविषयी असे खोटे अहवाल समोर आले आहेत. दूरदर्शन केंद्रे त्यांच्या संबंधित राज्यांना समर्पित उपग्रह वाहिन्यांवर प्रसारित करण्यासाठी कार्यक्रम तयार करत राहतील, त्याशिवाय यूट्यूबद्वारे आणि सोशल मीडियावर डिजिटल माध्यमांवरही कार्यरत राहतील असे प्रसार भारतीने स्पष्ट केले आहे. उदाहरणार्थ, डीडी सिलचर आणि डीडी कलबुर्गी द्वारे निर्मित कार्यक्रम आता अनुक्रमे डीडी आसाम आणि डीडी चंदना वर प्रसारित केले जातील.
अॅनालॉग टेरेस्ट्रियल टीव्ही हे एक कालबाह्य तंत्रज्ञान आहे. टप्प्याटप्प्याने ते बाद करणे सार्वजनिक आणि राष्ट्रीय हिताचे आहे. यामुळे 5 जी सारख्या नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मौल्यवान स्पेक्ट्रम उपलब्ध होतो आणि त्याशिवाय विजेवरील व्यर्थ खर्च कमी होतो. आतापर्यंत, सर्व अॅनालॉग ट्रान्समीटरपैकी जवळजवळ ७०% टप्प्याटप्प्याने बंद केले गेले आहेत. मनुष्यबळाच्या पुन्हा उपयोजनासाठी योग्य उपाययोजना केल्याची खातरजमा केल्याचे सांगत, इतरही ट्रान्समीटर टप्प्याटप्प्याने बंद केले जात असल्याची माहिती प्रसार भारतीने दिली. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सुमारे ५० अॅनालॉग टेरेस्ट्रियल टीव्ही ट्रान्समीटरचा अपवाद वगळता प्रसार भारती ३१ मार्च २०२२ पर्यंत उर्वरित कालबाह्य अॅनालॉग ट्रान्समीटर बंद करणार आहे.
एटीटी बाद करणे आणि संसाधन सुसूत्रीकरणाची मुदत
Year | Number of ATTs phased out | Spectrum Bandwidth Freed | IEBR Expenditure Reduction/Annum |
2017 – 18 | 306 |
7 MHz in VHF, 8 MHz U inHF |
Around Rs 100 Cr savings in operating expenditure annually |
2018 – 19 | 468 | ||
2019 – 20 | 6 | ||
2020 – 21 | 46 | ||
2021 – 22 | 412 | ||
By Oct 21 – 152 | |||
By Dec 21 – 109 | |||
By Mar 22 – 151 |
प्रसार भारतीने आयआयटी कानपूरसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदमच्या उपयोगाच्या माध्यमातून डिजिटल टेरेस्ट्रियल प्रसारणासाठी नेक्स्ट जनरेशन ब्रॉडकास्ट सोल्यूशन/ कृती आराखडा विकसित करण्यासाठी ५ जी ब्रॉडकास्ट सारख्या अत्याधुनिक मानकांशी सुसंगत, डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्टिंग सारख्या नवीन प्रयोगांना सक्षम करण्यासाठी आणि वापराद्वारे नवीन आशयाच्या संधी निर्माण करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
डीडी फ्रीडिश डीटीएचच्या (DD FreeDish DTH) माध्यमातून डीडी आसामसह अनेक दूरदर्शन वाहिन्या प्रसार भारतीद्वारे भारतभर कोणत्याही मासिक शुल्काशिवाय मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. “फ्री टू एअर मोड” अर्थात मोफत डीडी फ्रीडिश डीटीएच वाहिन्या प्राप्त करण्यासाठी खुल्या बाजारात सेट टॉप बॉक्स खरेदी करता येतात. यासाठी एकदाच गुंतवणूक करावी लागते. ज्यामध्ये १२० पेक्षा जास्त मोफत वाहिन्यांसह अनेक शैक्षणिक वाहिन्या तसेच ४० हून अधिक आकाशवाणीच्या उपग्रह वाहिन्यांचा समावेश आहे.