मुक्तपीठ टीम
जपानमधील वैज्ञानिकांनी तांदळापासून कॉलराची लस तयार केली आहे. लसची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली आहे. लस विकसित करणार्या टोकियो आणि चिबा विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, चाचणी दरम्यान त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत आणि रोगप्रतिकारक प्रतिक्रियाही चांगली दिसून आली आहे. या लसीला ‘म्यूको-राईस-सीटीबी’ असे नाव देण्यात आले आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्याचे निकाल लॅन्सेट मायक्रोब जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले आहेत.
तांदूळ कॉलरा लसीची वैशिष्ट्ये
१. लस साठवणूक करण्यासाठी फ्रीज किंवा कूलिंग सिस्टमची आवश्यकता नाही.
२. सुईच्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. कारण ही तोंडावाटे घेण्याची लस आहे.
३. लस घेतल्यानंतर रुग्णाची आतड्यांमधील प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजेच कॉलराविरूद्ध लढण्याची क्षमता वाढते.
कॉलराविरोधात लस कसे कार्य करते?
- चाचणी दरम्यान रुग्णांना लस लो (३ एमजी), मीडियम (६ एमजी) आणि हाय (१८ एमजी) डोस दिले गेले.
- सर्वाधिक प्रतिक्रिया हाय डोसमधून दिसून आल्या.
- आयजीए आणि आयजीजी या अँटीबॉडीज, लस दिल्यानंतर दुसर्या आणि चौथ्या महिन्यात रुग्णांमध्ये विकसित झालेल्या आढळल्या.
तांदळापासून कॉलरावरील लस कशी तयार झाली?
• ही लस तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी इनडोअर शेतात जेनेटिकली मॉडिफाइड तांदळाची छोटी रोपे लावली.
• पीक तयार झाल्यानंतर तांदूळ काढला.
• तांदूळाला अगदी बारीक दळण्यात आले.
• स्टोरेजसाठी ती पावडर अॅल्युमिनियमच्या पॅकेटमध्ये ठेवले होते.
• लसीकरणाच्या वेळी ही पावडर १/३ कप खारट पाण्यात मिसळून रुग्णाला दिली जाते.
• शास्त्रज्ञ म्हणतात, हे साध्या पाण्याने देखील रुग्णाला दिले जाऊ शकते.
समजून घ्या कॉलरा असतो कसा?
• कॉलरा हा जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.
• कॉलराचा संसर्ग सामान्यत: दूषित पाण्यामुळे होतो.
• संसर्ग झाल्यानंतर शरीरात पाण्याचा आणि पोषक तत्वांचा अभाव असल्यास हा रोग घातक ठरू शकतो.
• कॉलराची लक्षणे लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसू शकतात.
• काहींना संक्रमणानंतर काही तासांनंतर आणि इतरांमध्ये २ ते ३ दिवसांनंतर लक्षणे दिसतात.
• सांडपाण्यात धुतल्या जाणार्या भाजीपाल्याचे सेवन केल्यास कॉलऱ्याचा धोका असतो.
• यामुळे सर्व पदार्थ तसेच भाज्या आणि कोशिंबीर स्वच्छ पाण्याने धुऊनच खा.
• घरातील, घाणींवरील माशांमुळे कॉलरा होऊ शकतो.
• घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी कॉलरा पसरण्याचा धोका जास्त असतो.