मुक्तपीठ टीम
प्रतिकुलतेच्या रखरखाटातही परिश्रमाच्या बळावर यशाचं नंदनवन फुलवणं शक्य असतं. जव्हारच्या बाबू सोन्या वाघेरा या शेतकऱ्यानं आणि त्यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी मिरचीच्या लागवडीतून जीवनात गोडवा आणलाय. यापूर्वी फायद्याची नसणारी शेती त्यांच्यासाठी फायद्याची ठरली आहे. सध्या बाबू वाघेरा स्वत:च वाशी बाजारात माल विकतात. एकेकाळी मिठागरात मजुरी करणाऱ्या बाबू सोन्या वाघेरांची प्रेरणादायी चांगली बातमी.
छोटी छोटी फुलं डवरलीत ही रोपं आहेत मिरचीची आणि आज गोड अशी कहाणी सांगणार आहे ते तिखट अश्या मिरचीच्या पीकातून संपन्नतेच्या मार्गावर निघालेल्या हैदीचा पाडा या आदिवासी गावातील एका शेतकऱ्याची.हे शेतकरी आमच्या सोबत आहेत आपण आता त्यांच्याच शेतात आहोत.आणि ही सारी हिरवीगार रोपं त्यांच्यावरची पांढरी फुलं.म्हणजे आता काही दिवसांनी त्याला मिरच्या येऊ लागतील आणि अर्थातच आपल्या या शेतकरी मित्राच्या चेहऱ्यावर आणखी हसू सुद्धा उमलेल एवढं नक्की!
खरंतर अनेकदा घडतं असं जव्हार मोखाडा म्हंटलं ना काही नको वाटतील लोकांचा त्रास,आदिवासीचं कुपोषण अगदी बालमृत्यू अश्याच बातम्या जास्त समोर येतात.मात्र या सर्व प्रतिकुलतेच्या रखरखाटात काहींनी योग्य मार्ग स्वीकारून असं हिरवं नंदनवनसुद्धा फुलवलेलं आहे.आपण बाबू सोन्या वाघेरा यांच्याच शब्दात जाणून घेवूया…
शेतकरी बाबू वाघेरांच्या शब्दात तिखट मिरचीची जीवनात गोडवा आणणारी कहाणी…
मी मूळचा हैदीचा पाडा गावातीलच आहे. बालपणापासून म्हणजे,पहिले आम्ही मजुरी करायला जायचो. आम्ही धामणी धरणावरही काम करत होतो.आणि मग धामणी धरणावर तर आम्ही नऊ रुपयानी काम करायचो. त्याच्यानंतर पालघरला मिठागरावर गेलो.त्यावेळेस मजुरीपण काय नव्हती.घनसोलीला कामावर जायचो तिथे बारा रुपये मजुरी मिळायची. तेथून मग असं करता करता १९९३ मध्ये बायफ मित्र संस्था आली आणि म्हणे आंबे लावा मग आंबे लावले. १९९४ पासून मग तुम्ही बाहेर नका जाऊ शेत आहे तर शेतात तुम्ही राबा.मग मी पहिल्या वर्षी लागवड केली तीन किलो तीन किलोवर तीन क्विंटल निघाले.त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षीपासून भाजीपाला लावत गेलो. थोडा थोडा असं आपले वाढवत गेलो.वाढवत वाढवत गेलो. त्यानंतर मिरची लावली चार वर्षांपासून.तर मिरचीमध्ये एवढा आहे का,उत्पन्न चांगलं आहे. पण फवारणी ही वेळेवर द्यावी लागते.उत्पन्न चांगलं आहे मिरचीमधी.मला तर असं वाटतं का प्रत्येक शेतकऱ्याने मिरची करावी तर जरा काही नफा येईल.
१९९४पासून जीवन बदलले…
बायफने १९९४ साली इथं लागवड करायला सांगितली तेव्हा तर आम्हाला इंजिन कशी चालवायची आहे ते पण माहिती नव्हते.तर मग त्यांनी शिकवलं.पहिले वर्ष वालखड लावली दुसऱ्या वर्षी मग थोडासा भाजीपाला,भाजीपाला करता करता दोन वर्ष कलिंगड लावलं.कलिंगडवरून अशी अनेक पीक भाजीपाल्याची घेत गेलो.
चार वर्षांपासून मिरची…
चार वर्षांपासून आता मिरची घेवू लागलो. जिथून लावतो तिथून चार पैसं हातात राहतात.म्हणजे लाख दीड लाख तरी उत्पन्न होतं वर्षिक. मिरचीच्या पिकासाठी आम्ही पहिली नांगरणी करतो दोन-तीन वेळेस आणि जमीन भुसभुशीत करतो. भुसभुशीत केलं का सऱ्या ओढतो सऱ्या ओढल्या की ठिबक टाकतो. ठिबक चालू करून बघतो. ठिबक चालू करून बघितल्यावर बाबा आहे काय व्यवस्थित ते तपासतो. त्याच्यानंतर मंचिंग पेपर टाकतो. मंचिंग पेपर टाकलं का साईटला होल मारून घेतो. होल मारल्यानंतर रोपं लावून घेतो.रोपं लावली की तिसऱ्या दिवशी ड्रीचिंग करतो ड्रीचिंग केल्यानंत फवारणी म्हणजे कुठलीतरी कीटक नाशक म्हणून एक ती करून घेतो. त्याच्यानंतर चार-पाच दिवसांनी मग सतत फवारणी चालूच. महत्वाची कीटक नाशक फवारणी म्हणजे अमावस्या किंवा पौर्णिमा यावेळी कीटक नाशक फवारणी करावीच लागते. मध्ये कुठलीही फवारणी म्हणजे खताची फवारणी वगैरे चालू असते माझी.
किती महिने जातात मिरचीचे पीक हाती येण्यात?
मिरची हाती येण्यात साठ दिवसांनी सुरुवात होते.पण चालुवर्षी थंडीमुळे उशीर झाला आहे. पाऊसपण,थंडीपन तरी म्हणजे सत्तर ते बहात्तर दिवसांनी यायला चालू होईल.आणि शेवट जूनपर्यंत जातं म्हणजे पाऊस पडे पर्यंत.आणि अकरा दिवसांनी खुडा चालतो.
यावेळी ही लागवड डिसेंबरमध्ये केली आहे. अंदाजे ७२ दिवसांनी याचा अर्थ दोन महिन्यापेक्षा जास्तच ३०-३० साठ आणि पुन्हा म्हणजे अडीच महिन्याचा कालावधी यात जाईल. मार्चमध्ये मिरच्या तुमच्या हाती लागतील. पूर्वी आम्ही डेलमोंटनला देत होतो. आताचा गेल्यावर्षापासून वाशीला पाठवतो. डेलमोंटनचा आमचा करारनामा होत होता.वाशी मार्केटला जिथून पाठवायला लागलो तिथून दोन पैसं जास्त मिळतात. मिरचीत जेवढी कमाई आहे तेवढी इतर भाजीपाल्यामध्ये नाही आहेत.
पाहा व्हिडीओ: