मुक्तपीठ टीम
‘बाऊन्स’ ही भारतातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन कंपनी आहे. आता ‘बाऊन्स इन्फिनीटी’ आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही प्रगत ‘मेड इन इंडिया’ स्कूटर सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी आणि उत्तम वैशिष्ट्यांसह असेल. ‘बाऊन्स इन्फिनिटी’ साठीची पूर्वनोंदणी लवकरच सुरु होणार असून जानेवारी २०२२ पर्यंत या गाड्यांची डिलिव्हरी सुरु होण्याची अपेक्षा आहे.
‘बाऊन्स इन्फिनिटी’ मध्ये उत्तम आणि काढता येणारी ली-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सोय आणि गरजेप्रमाणे गाडीतून बॅटरी काढून घेऊन चार्जिंग करू शकतात. या जोडीला, ’बाऊन्स’ तर्फे वैशिष्ट्यपूर्ण ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ हा पर्यायही देण्यात येत आहे. भारतीय बाजारपेठेत हे प्रथमच होत आहे. यामध्ये ग्राहकांना एकदम वाजवी किंमतीत बॅटरी शिवाय ‘बाऊन्स इन्फिनिटी’ खरेदी करण्याचा आणि ‘बाऊन्स’ बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क त्याऐवजी वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ग्राहकांनी बॅटरी स्वॅप्स साठी पैसे भरले की ‘बाऊन्स’ स्वॅपिंग नेटवर्क मधून रिकाम्या बॅटरीच्या बदल्यात संपूर्णपणे चार्ज झालेली बॅटरी ते घेऊ शकणार. यामुळे पारंपरिक स्कूटर्स च्या तुलनेत या स्कूटरची प्रवाही किंमत ४०% पर्यंत खाली उतरते.
इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत ४० ते ५०% पर्यतची किंमत ही बॅटरीचीच असते. बॅटरीची किंमत वजा जाता इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत ग्राहकांच्या खिशाला परवडणारी आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या मागणीला चालना मिळेल. या जोडीलाच, ’बाऊन्स’ वेगाने व्यापक पातळीवर बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क उभारत आहे. त्यामुळे किरकोळ ग्राहक आणि त्यांच्या यशस्वी राईड शेअरिंग व्यवसायालाही मदत होईल.
‘बाऊन्स’ ने २०२१ मध्ये २२मोटर्समध्ये १०० टक्के वाटा मिळविला असून या कराराचे मूल्य ७ दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. २२मोटर्सशी झालेल्या कराराचा भाग म्हणून ‘बाऊन्स’ ने त्यांची बौद्धिक संपदा आणि राजस्थानमधील भिवडी येथील उत्पादन केंद्र यांच्यावर ताबा मिळविला आहे. या अत्याधुनिक केंद्राची दरवर्षी १८०,००० स्कूटर्स उत्पादन करण्याची क्षमता आहे. भारतीय बाजारपेठेची क्षमता लक्षात घेऊन, कंपनी दक्षिण भारतात आणखी एक उत्पादन केंद्र उभारण्याची योजना आखत आहे. पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर गुंतविण्यासाठी ‘बाऊन्स’ ने बाजूला ठेवले आहेत.
https://bounceinfinity.com/
About Bounce:
With a strong desire and determination to address the need to bring ease of commuting to people across many categories like small businesses, college students, workers and delivery agents, a formidable team of three – Vivekananda, Anil and Varun – launched Bounce in 2018. First-of-its-kind, indigenously built using in-house R&D, Bounce dockless bikes were launched in Bengaluru in May 2018. A blend of advanced digital solutions with a seamless operations network on the ground helped Bounce become a popular and desired mode of transport across diverse economic and age groups in Bengaluru.
Having created India’s first smart mobility solution, Bounce moved in the direction of providing sustainable mobility by launching electric vehicles in Bengaluru. With other countries like China and the US already leading EV growth, Vivek strongly believed that India could not afford to miss the bus of global EV renaissance. Undaunted by the immense execution challenges on the ground, considering the EV infrastructure in India is at a very nascent stage, the start-up took the challenges head-on, and the in-house EV mobility solution was built and launched in Bengaluru. Six months since its launch, Bounce EVs clocked 8 million kilometres. This was achieved with a distributed network of battery stations across 170+ locations, clocking over 200,000 battery swaps.
Considering there is a dearth of options for reliable, sustainable EV bike models, Bounce built its own EV and launched it in April 2021. The model has proven superior performance and offers better value economically than other variants available in the market. The company’s EV fleet has successfully completed over 2 crore kilometres and has facilitated over 500,000 battery swaps to date. Now Bounce is all set to introduce the all-new Bounce Infinity electric scooter in more cities across India.
पाहा व्हिडीओ: