मुक्तपीठ टीम
मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद आता पेटला आहे. संकुलाबाहेर भाजपा आणि बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या सर्व वादातच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावर पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपाच्या पोटात अचानक का दुखू लागले?
- प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अस्लम शेख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार पलटवार केला.
- भाजपाने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे.
- ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का?
- आता भाजपाच्या पोटात अचानक का दुखू लागले? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.
भाजपा लोकांना नावाच्या नादात मुर्ख बनवतेय
- जर फडणवीसांनी प्रस्ताव ठेवणाऱ्या नगरसेवकाचा आणि मंजुरी देणाऱ्या आमदाराचा राजीनामा घेतला तरच त्यांची नियत साफ असेल, अन्यथा त्यांची नियत साफ नाही.
- येत्या मनपा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थरला जात आहे.
- तसेच मुंबई मनपाच्या नियमानुसान एकदा कुठेही कुणाचेही नाव दिले ते हटवता येत नाही.
- तसेच इथे झालेल्या विकासाकडे बघा, नावाच्या वादाकडे जास्त लक्ष देऊ नका, भारतीय जनता पक्ष लोकांना नावाच्या नादात मुर्ख बनवत आहे.
- सत्तेसाठी शिवसेनेची लाचारसेना झाल्याची टीकाही भाजपकडून सतत करण्यात येत आहे.