अश्विनी कडू
सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या हेतूने गेली एक वर्ष युवाशाही संघटना महाराष्ट्र राज्य कार्यरत आहेत. सदैव तत्परतेने युवाशाही संघटना डी टी एड, बि एड, धारकांच्या हक्कासाठी का असो टीईटी बोगस भरती प्रक्रिया, खाजगी शाळांची दिवसेंदिवस वाढणारी फिस यासाठी आंदोलन करत त्यांच्या हक्कासाठी लढली. कोरोनाकाळात रक्ताचा अपुरा पडत असलेला पुरवठा भरून काढण्यासाठी शिबिर आयोजित केले. सामान्यांच्या हक्कासाठी लढणारी युवाशाही संघटनेचा आज पहिला वर्धापन दिन आहे.
मागील पाच ते सहा वर्षांपासून राज्यातील १५ लाख संख्या असल्यालेल्या डी टी एड, बि एड, धारकांच्या हक्कासाठी कार्यरत असतानाचा तुषार देशमुख, अश्विनी कडू, प्रमोद दिसले, सारंग पोतदार, दिगंबर वैद्य,गणेश वाघमारे, तुषार शेट्टे, आकाश साळुंखे, रामधन ठोबंरे, राम मस्के, विलास वायकर, निखिल जाधव, समाधान पाटील, सुरेश सावळे, विजय फाले, प्रल्हाद भोसले, प्रशांत ईगोंले, यासह राज्यातील युवकांनी मागील १४ मे २०२१ रोजी एकत्र येत विद्यार्थी/बेरोजगार तरुणांच्या न्याय हक्कासाठी, शेती, शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे ब्रीदवाक्य घेऊन युवाशाही संघटनेच्या नावाखाली संघटना उभारली.
त्यात पवित्र पोर्टल मार्फत असलेली शिक्षक पदभरती, स्पर्धा परीक्षेतील, व्यवसायीक, अव्यसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी समस्या निवारण असेल, अदिवासी विकास विभागातील पदभरतीत Tet, ctet, पात्रता धारकांना संधी देण्यात यावी यासह २०१९ मध्ये झालेल्या तब्बल २००० पदांची बोगस भरती प्रक्रिया राबवून गुणवत्तापूर्ण उमेदवारांना डावलण्यात आलेल्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने, गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी आंदोलन केली, निवेदन दिले.
यासह खासगी शाळांची दिवसेंदिवस वाढणारी फिस यासाठी आझाद मैदान मुंबई येथे पालक समितीने संयुक्तपणे मोठे आंदोलन केले. यासह मुंबई महानगरपालिका शाळेत पवित्र पोर्टल मार्फत इग्रंजी माध्यमांच्या मुलांना नियुक्तीस टाळाटाळ करीत असल्याने आंदोलन व निवेदन देऊन त्यांना न्याय मिळावा या हेतूने लढा चालू आहे. राज्यातील बहुसंख्येने गणित, विज्ञान, इग्रंजी, उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांसाठी पुणे येथे आयुक्त कार्यालय येथे आंदोलन केले, यासह राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष, इम्रान प्रताप गढी यांची दिल्ली येथे ऊर्दू माध्यमांच्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिष्टमंडळासह भेट घेतली.
कोरोना कालावधीत संघटनेच्या वतीने रक्ताचा पडत असलेला तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजने करण्यात आले होते. पेन या ठिकाणी रेल्वे थांबा मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. ५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या अभियोग्यता चाचणीचे आयोजन करण्यात यावे याकरीता हिगोली जिल्ह्यात असो या मंत्रायल (मुंबई) येथे डी एड, बि एड, धारकांसह शिक्षण मंत्री यांची भेट, त्यानंतर राज्य परीक्षा परिषद येथे दुसऱ्या अभियोग्यता चाचणीचे आयोजन करण्यासाठी, निवेदन देऊन आज तगायत पाठपुरावा चालू आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यापम, आरोग्य, परिक्षेतील गैरप्रकार, मागील काळात झालेला ९५०१ बोगस टीईटी प्रमाणधारकांना उघडकीस आणण्यासाठी संघटनेचे अथक प्रयत्न व पहिल्या अभियोग्यता परिक्षेतील गोंधळ बाहेर काढण्यासाठी व अपात्र उमेदवारांना बडतर्फ करा व दोषी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करा, यासाठी वेळोवेळी निवेदने व राज्य परीक्षा परिषद पुणे येथे धरणे आंदोलन, आरोग्य पदभरतीमध्ये क गटासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची पारदर्शक चौकशी करुन निष्पाप उमेदवारावर अन्याय न होता तात्काळ निकाल लावण्यात यावा यासाठी उमेदवारांसह युवाशाही संघटनेच्यावतीने आरोग्य संचालक येथे आंदोलने केली.
१९८५ पासून मराठवाड्यावरील वैद्यकीय प्रवेशाचा अन्यायकारक कोटा रद्द करण्यात यावा व प्रवेशाबाबत समान धोरण आखण्यात यावे यासाठी विविध ठिकाणी संघटनेच्यावतीने यशस्वी पाठपुरावा करण्यात आला. कोरोना कालावधीत पालकत्व गमावलेल्या विद्यार्थी यांना आर्थिक मदत करण्यात यावी, बालसंगोपन योजनेस मुदतवाढ देण्यात यावी यासाठी यशस्वी पाठपुरावा करण्यात आला. कोरोना कालावधीत दहावी, बारावी शालांत प्रमाण पत्र परिक्षा घेण्यात आल्या नाहीत त्यामुळे शिक्षण मंडळाकडील शैक्षणिक शुल्क परत करण्यात यावे यासाठी राज्यभर निवेदन मोहीम राबवली. कोरोना काळात भरती बंद असल्याने सरकारकडे सर्व भरतीत वयोमर्यादा वाढवून देण्यासाठी संघटनेने वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरवा केला आणि त्याला यश देखील आले.
भारतीय डाक पदभरतीमध्ये, EWS आरक्षण देण्यात आले नव्हते जाहिरातीत नियमाप्रमाणे उल्लेख नव्हता ती बाब संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली, राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामविकास विभागातील मागील अनेक वर्षांपासून क/ड संवर्गातील पदांसाठी शुल्कासहित अर्ज स्वीकृती झाली पण परीक्षा नाही त्यामुळे पदभरती नाही, यासाठी युवा शाही संघटनेच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निवेदन मोहिम राबविण्यात आली होती, राज्यातील विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ऑनलाईन शिकविण्यात आल्याने परीक्षेचे आयोजन १ महिना अगोदर परीक्षा वेळापत्रक जाहीर करुन परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी कुलगुरुना निवेदने दिली, व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. अनुक्रमे हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील विस्तार लक्षात घेऊन नवीन लॉ महाविद्यालय स्थापन करण्यात यावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. जो अन्नदाता आहे त्याप्रती कर्तव्य म्हणून, थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्याप्रमाणे चालुबाकीदार खातेधारकांनाही दिलासा देण्यासह मागील वर्षी झालेल्या ओला दुष्काळ जाहीर करुन मदतीसह पिक विमा देण्यात यावा यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी आयुक्त धीरजकुमार, यांच्याकडे पाठपुरावा केला.
ग्रामीण भागातील वाढती बेरोजगारी, व सुशिक्षित तरुणांची संख्या लक्षात घेऊन, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कौशल्यपूर्ण विकास मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे ग्रामीण भागात नवऊद्योग निर्माण करण्यासाठी यांच्याकडे अनेकवेळा मागणी केली. राज्यातील मराठी शाळांना दर्जेदार सुविधा प्राप्त होऊन सर्वसामान्य, शेतकरी कामगार यांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, मराठी शाळेचे संवर्धन व्हावे यासाठी संघटना कार्यरत आहे, मुख्यतः शिक्षण व सर्वच क्षेत्रातील थोर मोठ्यांच्या मार्गदर्शनाने संघटनेचे कार्य अविरत पणे चालू आहे, यापुढेही सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या हेतूने आपल्या सर्वांच्या सूचनांचा आदर करुन, मार्गदशनाखाली, सदैव तत्पर राहू हेच युवाशाही संघटना महाराष्ट्र राज्य प्रथम वर्धापनदिनी सर्व युवा शाही संघटनेतील परिवाराच्यावतीने अभिवचन देते.