मुक्तपीठ टीम
लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी पॅराशूट रेजिमेंटच्या चार तुकड्यांना राष्ट्रपती ध्वज प्रदान केला. राष्ट्रपती ध्वज हा प्रतिष्ठेचा मानला जातो. यात, ११ पॅराशूट (विशेष दल), २१ पॅराशूट (विशेष दल), २३ पॅराशूट आणि २९ पॅराशूट या चार तुकड्यांचा समावेश आहे. बुधवारी बंगळुरू इथे झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पॅराशूट रेजिमेंट ही भारतीय लष्करातील एक सर्वोत्तम रेजिमेंट असून, या रेजिमेंटने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक मोहिमांमध्ये स्पृहणीय कामगिरी केली आहे. या रेजिमेंटला याआधीही अनेक ठिकाणी, असे की गाझा, कोरिया, बांगलादेश, श्रीलंका, मालदिव, कच्छचे रण, सीयाचेन, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य भारतातील मोहिमांमध्ये -ज्यात मणिपूर, नागालैंड आणि आसामचाही समावेश आहे, तिथे पराक्रम गाजवल्याबद्दल अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
तसेच, स्वातंत्र्यानंतर या रेजिमेंटच्या तुकड्यांना ३२ वेळा लष्करप्रमुख युनिट प्रशस्तिपत्र, आणि तुकडीच्या सैनिकांना शौर्य आणि विशेष पराक्रम गाजवल्याबद्दल ८ अशोक चक्र, १४ महावीर चक्र, २२ कीर्ती चक्र, ६३ वीरचक्र, ११६ शौर्यचक्र आणि ६०१ सेना पदके अशी अनेक पदके देऊन गौरवण्यात आले आहे.
यावेळी संचलनाचे निरीक्षण केल्यानंतर, लष्करप्रमुख नरवणे यांनी पॅरॅशूट रेजिमेंटचा अतुलनीय शौर्याचा समृद्ध वारसा आणि बलिदानाच्या परंपरांचा गौरव केला. यावेळी लष्करप्रमुखांनी नव्याने स्थापन झालेल्या तुकड्यांनी अल्पावधीत केलेल्या कामांचीही प्रशंसा केली. देशाची अभिमानाने सेवा करण्यासाठी, सर्व तुकड्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
General M M Naravane #COAS presented the “President’s Colours” #Nishan to 11 PARA (SF), 21 PARA (SF), 23 PARA and 29 PARA, during an impeccable Colour Presentation Parade held at the Parachute Regiment Training Centre, Bangalore.#IndianArmy#InStrideWithTheFuture#AmritMahotsav pic.twitter.com/wjj2TxjTiV
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) February 23, 2022
पॅराशूट रेजिमेंट नेमकी असते तरी कशी?
- भारतीय सेनादलातील ५० व्या पॅराशूट ब्रिगेडची स्थापना २९ ऑक्टोबर १९४१ रोजी झाली. पहिल्या ब्रिगेडमध्ये १५१ ब्रिटिश, १५२ भारतीय आणि १५३ गुरखा पॅराशूट बटालियन आणि इतर सहाय्यक तुकड्या होत्या.
- या रेजिमेंटने दुसऱ्या महायुद्धात पहिली हवाई कारवाई केली.
- या कारवाईदरम्यान गुरखा बटालियनने ऑपरेशन ड्रॅक्युला राबवले.
- या ऑपरेशनमध्ये १ मे १९४५ रोजी तत्कालीन ब्रह्मदेशातील हाथी पॉइंटवर पॅराशूटने सैनिक उतरले होते.
- या कारवाईत बटालियनला यश मिळाले.
- या यशानंतर, १ मार्च १९४५ रोजी भारतीय पॅराशूट रेजिमेंटची स्थापना करण्यात आली.
- या रेजिमेंटमध्ये चार बटालियन आणि स्वतंत्र कंपन्या एकत्र आणल्या गेल्या.
स्वातंत्र्यानंतर पॅराशूट रेजिमेंटची शक्ती विभागूनही वाढली…
- स्वातंत्र्यानंतर एअरबोर्न डिव्हिजनची विभागणी भारतीय सैन्याने आणि त्याच वेळी तयार झालेल्या पाकिस्तानी लष्करामध्ये झाली.
- भारताने ५०वी आणि ७७वी ब्रिगेड कायम ठेवली तर पाकिस्तानने १४वी पॅराशूट ब्रिगेड घेतली.
- कोटा येथे पॅराशूट रेजिमेंटच्या प्रशिक्षण शाखेची १ मे १९६२ रोजी ‘ब्रिगेड ऑफ गार्ड’ तयार करण्यात आली.
- रेजिमेंटने १९६१ पासूनच आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर रेजिमेंटमध्ये भरतीची भरती वाढवण्यासाठी 13 मार्च १९६३ रोजी प्रशिक्षण केंद्र जोडण्यात आले.
पॅराशूट रेजिमेंटचे पराक्रम
- पाकिस्तानविरोधातील १९९९ मधील कारगिलमधील ऑपरेशन विजयमध्ये दहापैकी नऊ पॅराशूट बटालियन तैनात करण्यात आल्या होत्या.
- पॅराशूट ब्रिगेडने मुश्कोह व्हॅलीतील घुसखोरांना संपवले.
- ५ पारस बटालिक भागात सक्रियपणे उपस्थित होते, जिथे त्यांनी शौर्य आणि चिकाटी दाखवली.
- या युद्धातील शौर्याबद्दल त्यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ युनिट प्रशस्तीपत्र देण्यात आले.