अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कोवळ्या पिढीचं शारीरिक आणि बौद्धिक सुपोषण घडवणारा अंगणवाड्यांचा उपक्रम कौतुक करावा असाच आहे. मनांची मशागत करतानाच अंगणवाडी सेविका परसबागांमधून हिरव्या पालेभाज्या पिकवतात. त्याचवेळी पालकांमध्ये जनजागृती घडवण्यासाठीही त्यांची धडपड चालू असते. अंगणवाडी सेविकांच्या अशा अनेक उपक्रमांची दखल घेण्यचा हा एक प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातील अंगणावाड्यांमधून सध्या एक वेगळी चळवळ आकारात आहे. ही चळवळ आहे सकारात्मक अशी. कोणत्याही गोंगाटाशिवाय सुरु असलेली ही परसबाग चळवळ आहे समाजातील प्रत्येक घटकातील महाराष्ट्राच्या भविष्याचं म्हणजे कोवळ्या पिढीचं सुपोषण घडवणारी. कुपोषण हा शब्दच या चळवळीमुळे महाराष्ट्रातून कालबाह्य होईल. अंगणवाडी सेविका खूप अवास्तव दावे करत नसतात. पण त्यांच्या कृतीतून त्यांचं ध्येय स्पष्ट दिसत आहे. सुपोषित महाराष्ट्राचं!
अंगणवाडीतील मुलांना आहारातून सकस व पोषक घटक मिळावे यासाठी अगंणवाडी सेविका परसबागांमधून हिरव्या पालेभाज्या पिकवत आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात अंगणवाड्यांच्या माध्यमातून परसबाग ही संकल्पना राबवण्यात येत आहे. या परसबागेचा प्रमुख उद्देश हा ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी, स्तनदा माता, गरोदर माता त्यांच्या आहारात पालेभाज्यांचा वापर वाढवण्याचा आहे. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचं त्यांचं ध्येय आहे.
या परसबागांमध्ये प्रामुख्याने चवळी, पालक,कोथिंबीर, मेथी, टोमॅटो,वांगी, मिरची इत्यादी अनेक पालेभाज्या व फळभाज्या घेतल्या जात आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून परसबाग उप्रकम सुरू आहे. गडचिरोलीच्या अंगणवाडी सेविका शोभा ठाकरे यांनी सांडपाण्याचा वापर करून अतिशय कमी जागेत परसबाग फुलवली आहे. या परसबागा पोषण चळवळीचं महत्वाचं साधन बनल्या आहेत. तर अंगणवाडी सेविकांनी कष्टाने फूलविलेल्या परसबागातून रोज ताजी हिरवी भाजी घरोघरी उपलब्ध होत आहे. त्यातून जीवनसत्व देखील मिळत आहेत.
बालकांना कुपोषणमुक्त, निरोगी, सुदृढ ठेवण्याकरिता अंगणवाडी सेविका, मदतनीस व पालकांसह प्रतिज्ञा करण्याचे उपक्रमही राबवतात. या उपक्रमांचं चौफेर कौतुक होतं. अग बाई अरेच्या फेम अभिनेते संजय नार्वेकर म्हणतात की, “कुपोषणमुक्तीचा ध्यास घेऊन सुमारे १ लाख अंगणवाडी सेविका राज्यभरात रात्रंदिन काम करीत आहेत. आपणही त्यांच्या मनातील ओळखा, त्यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. महिला व बालविकास विभागानं महाराष्ट्राला कुपोषणमुक्त करण्याचा ध्यास घेतलेला आहे. पोषण अभियानाच्या निमित्तानं. या अभियानात सहभागी व्हा, सुपोषित महाराष्ट्रासाठी आपला सहभागही महत्वाचा आहे, असे ते म्हणाले.
परसबागांशिवाय अंगणवाडी सेविका लहान मुलांच्या शारिरीक आणि बौद्धीक वाढीसाठी अनेक नवनवीन उपक्रम सुद्धा राबवतात. अंगणवाड्यांमध्ये इतर अनेक उपक्रमांचा समावेश आहे. उपक्रम अंगणवाडीचा ; खेळ गमतीचा…अशा नावांनी ओळखले जाणारे हे उपक्रम मुलांना अंगणवाड्यांशी आवडीनं जोडतात.
अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या सुचनेच्या अगदी उलट कृती खेळ अकोल्यातील चिंचोली अंगणवाडीत खेळला गेला. खेळाचे नियम अगदी सोपे होते. Stand up म्हटलं की बसायचे आणि Sit down म्हटलं की उभे रहायचे, अशी गंमत असणारा खेळ बालकांनी आनंदात खेळत उत्साहानं सहभाग नोंदवला. धडे शिक्षणाचे; निमित्त ‘ई आकार’ भेटीचे…हा एक उपक्रम वेगळा आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद, करमाड येथे ‘ई आकार’ टीमने भेट देऊन मुलांना आणि अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध उपक्रमांतून मुलं आणि अंगणवाडी सेविकांना ‘ई आकार’च्या सदस्यांनी शिक्षणाचे धडे दिले. अंगणवाडी सेविका आणि मुलांनी यावेळी गाणी बोलत मनोरंजन केले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे विविध उपक्रम राबविताना या उप्रकमात पालकांचा सहभाग महत्वाचा असतो. याचदृष्टीने वाटेगांव येथे अंगणवाडी क्रमांक ३३०मध्ये पालक संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी विविध पालकांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यात आली.
प्रधान सचिव इझेस कुंदन आणि आयसीडीएस आयुक्त
प्रधान सचिव @IdzesKundan आणि आयसीडीएस आयुक्त @IAS_Rubal यांनी दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यातील आमराई, कळंबासह विविध अंगणवाडी केंद्रांची भेट घेतली. तसेच लाभार्थ्यांची चर्चा करत परसबाग पोषण चळवळ, क्रॉस क्रेडल पद्धती, उत्कृष्ट स्तनपान पद्धती आदिविषयी मार्गदर्शन केले. pic.twitter.com/EAgjmMEGJR
— Maha_DWCD (@MDwcd) February 10, 2022
रुबल अग्रवाल यांनी दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यातील आमराई, कळंबासह विविध अंगणवाडी केंद्रांची भेट घेतली. तसेच लाभार्थ्यांची चर्चा करत परसबाग पोषण चळवळ, क्रॉस क्रेडल पद्धती, उत्कृष्ट स्तनपान पद्धती आधींविषयी मार्गदर्शन केले.
अंगणवाडी करमाड क्र ४, बीट- करमाड, औरंगाबाद- १, अंगणवाडी सेविका श्रीमती तारा कोरडे यांनी पालकांना प्रतिसादात्मक आहार पद्धती बाबत वेळो वेळी मार्गदर्शन करून पालकांमध्ये बदल घडवून आणले आहे.
निमित्त पोषण पंधरवड्याचे; महत्त्व पोषण आहार जनजागृतीचे
अंगणवाडी करमाड क्र 4, बीट- करमाड, औरंगाबाद- 1, अंगणवाडी सेविका श्रीमती तारा कोरडे यांनी पालकांना प्रतिसादात्मक आहार पद्धती बाबत वेळो वेळी मार्गदर्शन करून पालकांमध्ये बदल घडवून आणले आहे. आई वैशाली त्यांची मुलगी वेदिकाला आहार भरवतानाचा एक छोटासा व्हिडिओ#suposhitmaharashtra pic.twitter.com/y0N1KBFian
— Maha_DWCD (@MDwcd) February 4, 2022
घाटकोपर येथे पोषण मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोषणाच्या टोपल्यांसह अंगणवाडी सेविका, मदतनीस उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
महत्त्व समुदाय विशेष कार्यक्रमाचे; हसत खेळत गिरवा धडे शिक्षणाचे
उपक्रम अंगणवाडीचा ; खेळ गमतीचा..
अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या सुचनेच्या अगदी उलट कृती खेळ अकोल्यातील चिंचोली अंगणवाडी रंगला. खेळाचे नियम असे होते की stand up म्हटल कि बसायचे आणि sit down म्हटल कि उभे रहायचे अशी गंमत असणारा खेळ बालकांनी आनंदात खेळत उत्साह व्यक्त केला. pic.twitter.com/xuXyyDqG8c
— Maha_DWCD (@MDwcd) June 9, 2022
बालकांना आकारांच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी अंगणवाडीमध्ये आकार ओळख उपक्रम राबवित अंगणवाडी सेविका हसत खेळत शिक्षणाचे धडे देतात.
“जागतिक जल दिन” निमित्त- पाण्याचे महत्व!
“जागतिक जल दिन” निमित्त- पाण्याचे महत्व.
शिळ पाणी, ताज पाणी सारखच असत. अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पाण्याच महत्व सांगितले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना नाशिक येथे #पोषण_पंधरवडा अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोषण आणि पाण्याविषयी जागृकता निर्माण केली. pic.twitter.com/4Vbi9EFiMS— Maha_DWCD (@MDwcd) March 23, 2022
शिळ पाणी, ताज पाणी सारखच असत. अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पाण्याच महत्व सांगितले.एकात्मिक बाल विकास सेवा योजना नाशिक येथे #पोषण_पंधरवडा अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आलाहोता. यावेळी पोषण आणि पाण्याविषयी जागृकता निर्माण केली.
सेल्फी विथ बालक-पालक!
सेल्फी विथ बालक-पालक!
सेल्फीचे आकर्षण लक्षात घेऊन बालक-पालक जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांनी राबविलेला सेल्फी पॉईंट हा स्तुत्य उपक्रम.#स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव #CBE #wcdmaharashtra #SuposhitMaharashtra@CMOMaharashtra @AdvYashomatiINC @RealBacchuKadu @IdzesKundan @IAS_Rubal pic.twitter.com/Ht5df7pMdA
— Maha_DWCD (@MDwcd) May 12, 2022
सेल्फीचे आकर्षण लक्षात घेऊन बालक-पालक जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांनी सेल्फी पॉईंट हा स्तुत्य उपक्रम राबविला.
महत्त्व सहभोजनाचे; निमित्त समुदाय विशेष कार्यक्रमाचे…
समुदाय आधारित विशेष कार्यक्रमांतर्गत #CBE करमाड येथील अंगणवाडीत सर्व मुलांनी सहभोजनाचा आनंद घेतला. प्रत्येकाच्या डब्यात वेगवेगळे पदार्थ असल्याने बच्चे कंपनी खुश होती. अंगणवाडी क्रं २मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता.
अंगणावाडी सेविकांच्या अशा उपक्रमांविषयी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ काय बोलतात ते ऐकलं की महत्व कळतं…