मुक्तपीठ टीम
देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात जवळजवळ ३ लाख १६ हजार नवे प्रकरणे समोर आली आहेत. या दरम्यान, देशात रुग्ण संख्या वाढीचे प्रमुख करण मानले जाणाऱ्या बी.१.६१७ या कोरोना प्रकराबद्दल आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो सर्वप्रथम महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आढळल्याचं सांगितलं जातं.
भारतातच उदयास आल्याची भीती
• बी.१.६१७ हा प्रकार सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यात आढळला होता असे सांगितले जात आहे.
• त्यामुळे फेब्रुवारी महिन्यानंतर अमरावती आणि आसपासच्या जिल्ह्यात कोरोनाचे संर्सग वाढल्याचे पाहायला मिळाले.
• अद्याप ही गोष्टी ठोसपणे सांगितली जात नसून अधिक संशोधन केले जात आहे.
• आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, हा प्रकार भारतातच उदयास आला आहे.
• यामुळे वैज्ञानिकांनी त्यांचे लक्ष विदर्भाकडे वळवले आहे.
इतर प्रकारांपेक्षा वेगळा विषाणू?
• ब्रिटन, आफ्रिका किंवा ब्राझील मध्ये आढळलेल्या विषाणूंच्या तुलनेत हा प्रकार वेगळा असल्याचे म्हटले जात आहे.
• सर्वप्रथम बी.१.६१७ हा विषाणू २०२० च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या चाचणी नमुन्यांमध्ये आढळला होता.
• तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या कोरोना कंट्रोल अॅडव्हायझरी टीमचे सदस्य असणारे यवतमाळ जिल्ह्याचे डॉ. अतुल गवांडे यांनी ही या नव्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली होती.
आरोग्य मंत्रालयाकडून इंकार
• आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणजे आहे की, देशात वेगाने वाढत असलेली रुग्ण संख्या ही बी.१.६१७ या नव्या प्रकरामुळे नाही आहे.
• दुसरीकडे तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या संदर्भात जास्त सांख्यिकी गोळा झालेला नाही आणि बरेच तज्ज्ञ अधिक शोध घेण्याच्या दृष्टीने व्हायरस सीक्वेंसिंगसाठी आग्रह करीत आहेत.