Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home व्हा अभिव्यक्त!

बंडाळी अमेरिकन स्टाइल…जे घडलं ते का, कसं ?

January 8, 2021
in व्हा अभिव्यक्त!
0
donald trump

ट्रम्पी उपद्रवामुळे अमेरिकेत बंडाळीसारखी स्थिती निर्माण झाली होती. संसदेतील हिंसाचारानं अमेरिकाच नाही तर जग हादरलं. नेमकं काय, कसं आणि का घडलं ते मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुण आंतरराष्ट्रीय अभ्यासकाचा लेख

प्रथमेश पुरूड

 

परंपरेनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होते व १४ डिसेंबरला इलेक्टोरल कॉलेज द्वारे राष्ट्रपतींची निवड करतात. निवडणूकीनंतर पराभूत उमेदवार आपला पराभव स्वीकारतो व पुढील राष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या जातात. डोनाल्ड ट्रम्पनी आपला पराभव स्वीकारलेला नाही त्यामुळे आज ही विलक्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक न्यायालयांनी रिपब्लिकन पक्षाचे लॉ-सूट रद्द केले आहेत. रिपब्लिकन पक्षाने नेमणूका केलेल्या कोर्टातही एकही दावा सिध्द करण्यात यश न आल्याने कोणतेही सकारात्मक निकाल डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने आले नाही. रिपब्लिकन लीडरशिप डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली आहे मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ६ जानेवारी ह्या ठरलेल्या तारखेला कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात नवीन राष्ट्रपतींची घोषणा केली जाते. संयुक्त अधिवेशनात १४ डिसेंबर रोजी इलेक्टोरल कॉलेजने केलेल्या मतदानाची मोजणी होते. संयुक्त अधिवेशनात प्रत्येक राज्यांनी पाठवलेली निवडणूक प्रमाणपत्रे स्विकारली जातात. अति विशिष्ट परिस्थितीत कॉग्रेस सदस्य या निकालांवर आक्षेप घेऊ शकतात. अमेरिकन इतिहासात हे अत्यंत तुरळक वेळा घडलेय. २००० सालच्या निवडणूकीत तत्कालीन उपराष्ट्रपती अल गोर विरूद्ध जॉर्ज बुश यांच्यातील अतिशय तगड्या निवडणूकीनंतर निवडणूक निकालांवर संशयाचे ढग निर्माण झाले होते. जवळपास एका महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाने जॉर्ज बुश यांच्या बाजूने निकाल दिला व अल गोर यांनी नम्रपणे त्या निकालाला मान्यता दिली व आपला पराभव स्वीकारला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडून अशी अपेक्षा नव्हतीच.

 

राज्यांच्या निवडणूकांवर आक्षेप घेणे हे एका प्रकारचे विद्रोह मानले जाते मात्र दोन्ही पैकी किमान एका उमेदवाराने पराभव स्वीकारल्यानंतर असे आक्षेप फक्त चर्चपुरते उरतात. आजची विलक्षणीय परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे निर्माण झाली आहे. रिपब्लिकन पक्षावर त्यांची भक्कम पकड आहे. रिपब्लिकन लीडरशिप जवळपास त्यांना आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक उलटवण्याचे प्रयत्न होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

 

सिनेट व हाऊस मधील रिपब्लिकन सदस्यांनी खुलेआम डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन केले. टेक्सास सिनेटर टेड क्रूझ, सिनेटर जोश हौली व इतर सदस्यांना सोबत घेऊन स्विंग राज्यातील निवडणूकांना आव्हान देण्याचे काम सुरू करण्यात आले. रविवारी जवळपास डझन सिनेटर व १५० हून अधिक हाऊस रिपब्लिकन सदस्यांकडून आक्षेपांचे समर्थन करण्याचे जाहीर करण्यात आले. पराभूत उमेदवार आणि त्यांच्या पक्षाकडून हे एका प्रकारचे विद्रोह मानण्यात आले. आक्षेपा पर्यंत विद्रोह हा शब्द वापरणे योग्य ठरणार नाही मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया सिनेट रनऑफ निवडणूकांसाठी प्रचार मोहिमेवर असताना आश्चर्यकारकरीत्या जी विधाने केलीत ती खऱ्या अर्थाने विद्रोह दर्शवतात.

 

कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात उपराष्ट्रपती नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा करतात व निवडणूकीचा शेवटचा टप्पा संपतो. डोनाल्ड ट्रम्पनी आपल्या उपराष्ट्रपती माईक पेन्स यांना वादातीत स्विंग राज्यातील निवडणूकांना उलथवून लावण्याचे अधिकार आहेत व डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपती म्हणून घोषित करण्याचेही अधिकार असल्याचे अविश्वसनीय विधान केले. मूळात उपराष्ट्रपतींकडे असे कोणताही अधिकार नसतात. उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्या वर प्रचंड दबाव टाकण्यात आला मात्र त्यांनी संयुक्त अधिवेशनापूर्वी तीन पानांच्या भल्या मोठ्या विधानात आपण असंवैधानिक मार्गाच्या सक्त विरोधात असल्याचे जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांची शेवटची आशा संपुष्टात आली. त्यानंतर ट्विटरवरून आपल्याच उपराष्ट्रपतीं विरूध्द आक्रमक भूमिका घेतली.

 

संयुक्त अधिवेशनाच्या सुरूवातीलाच माईक पेन्सनी आपल्या सिमित अधिकारांची मर्यादा स्पष्ट केली. प्रत्येक राज्यांच्या प्रमाणपत्रांना स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. वर्णमालेनुसार अलबामा, अलास्का या दोन राज्यातील निवडणूकांचे सर्टीफिकेट स्वीकारण्यात आले. त्यानंतर एरिझोना राज्यातील निवडणूकीवर टेक्सास सिनेटर टेड क्रूझ सहित अनेक सिनेटरनी आक्षेप घेतला. एरिझोना हा परंपरागत रिपब्लिकन राज्य जोसेफ बायडननी जिंकला होता.  आक्षेपानंतर संयुक्त अधिवेशनाला स्थगिती दिली जाते व सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव स्वतंत्र रित्या त्या आक्षेपावर जवळपास दोन तासांपर्यंत चर्चा करतात शेवटी मतदाना नंतर पुन्हा एकदा संयुक्त अधिवेशनात प्रस्तावित राज्याच्या प्रमाणपत्रांना स्वीकृती दिली जाते.

 

सिनेट मधील विवादावेळी सिनेट मेजॉरिटी लीडर मिच मॅकोनेल ( रिपब्लिकन लीडरशिप ) यांनी स्वतःच्या पक्षातील सदस्यांवर प्रचंड टिका केली. बायडन या निवडणुकीचे विजेते आहेत यावर शिक्कामोर्तब केले. पहिल्यांदाच रिपब्लिकन लीडरशिपने ट्रम्प यांच्या विरुद्ध कठोर भूमिका घेतली.

 

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा मोर्चा सुरू होता. डोनाल्ड ट्रम्पनी संबोधना पेक्षा जमावाला भडकविण्याचे जोरदार प्रयत्न केले. हल्ली प्रचंड सुरक्षेच्या गर्तेत असलेला कॅपिटल हिलची सुरक्षा व्यवस्था ब्रेक करण्यात जमावाला यश आले. कॅपिटल हिलमधील दोन्ही चेंबरमध्ये चर्चा सुरू होती तर बाहेर जमावाचा उद्रेक झाला होता. जमाव अतिशय सहजरीत्या कॉनफेडरेट झेंडे घेऊन हिलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहचला. सिनेट व हाऊस बंद करण्यात आले. उपराष्ट्रपती माईक पेन्स यांची सिक्रेट सर्विसने बिल्डींग मधील गुप्त ठिकाणी रवानगी केली.

 

वॉशिंग्टन डिसी पूर्ण राज्य नसल्याने मेयर हतबल होते. नॅशनल गार्डच्या त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली गेली मात्र सुरूवातीला नकार देण्यात आला. फायरिंगच्या घटनेनंतर व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयातील एक्सप्लोजिव डिव्हाईस जप्त करण्यात आल्यानंतर प्रेस सेक्रेटरी काईली मॅकेनी यांनी नॅशनल गार्ड परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रवाना झाल्याचे जाहीर केले. तोपर्यंत जमावाने काचा फोडल्या होत्या. हाऊ स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या ऑफीसमध्ये तोडफोड करण्यात आली. सॅट्यूटरी हॉलमध्ये जमावाने प्रचंड नासधूस केली. नॅशनल गार्डच्या अपेक्षित कारवाई आधी व्हर्जिनियाने २०० सैनिकांचा ताफा पाठवला.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन मूल्यांची बदनामी झाली. तुर्की, नाटो, ब्रिटन सहित अनेक राष्ट्रांनी शांततेचे आवाहन केले. अंतर्गत राजकारण ढवळून निघाले. बिल क्लिंटन, ओबामा व मिट रोम्नी यांनी आपापली विधाने प्रेसला रिलीज केली. बायडननी आपल्या स्टेटमेंट मध्ये हा राष्ट्रद्रोह असल्याचे सांगितले.

 

अतिशय थरारक चित्रपटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध स्वपक्षीयांचा राग अनावर होतोय. १५० हून अधिक हाऊस रिपब्लिकन सदस्यांचा पाठिंबा आता १२० वर येऊन पोहचला व डझनभर सिनेटरांची संख्या ६ वर येऊन पोहचली. २५ व्या अमेंडमेटची चर्चाही सुरू झाली आहे. २५ व्या अमेंडमेट द्वारे उपराष्ट्रपतीं द्वारे अर्ध्याहून अधिक कॅबिनेट सदस्याच्या सहमती नंतर राष्ट्रपतींना पदावरून दूर करणे शक्य आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी हा एकमेव पर्याय रिपब्लिकन पक्षाकडे खासकरून प्रस्थापित रिपब्लिकन लीडरशिपकडे उपलब्ध असले तरी ते या मार्गाने जाण्याची शक्यता नाहीच.

 

कॉग्रेसचे संयुक्त अधिवेशन पुन्हा एकदा सुरू झाले आहे. कॉग्रेसवुमन इलिहान ओमार यांनी महाभियोगाचा परिच्छेद वाचणार असल्याचे जाहीर केले तर कॉग्रेसवुमन कोरी बुश यांनी हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या कॉग्रेस सदस्यांची हकालपट्टी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. वॉशिंग्टन डिसी मध्ये कर्फ्यू असले तरी आंदोलक अजूनही तसेच आहेत. मॉडर्न तख्तापलट करण्याचा अयशस्वी प्रयत्न संपूर्ण देशभर सुरू आहे. अनेक राज्यांच्या कॅपिटल बिल्डींग बाहेर ट्रम्प समर्थकांचा जमावडा सुरू होता. या सर्व थरारक घटना जॉर्जिया सिनेट रनऑफ निवडणूकांतील निकाल जाहीर होत असताना घडवण्यात आले. पराभूत उमेदवार केली लॉफ्लर यांनी आपली प्रस्तावित आक्षेप घेण्याची भूमिका पलटली.

 

अतिशय उथळ राजकीय वातावरणात संयुक्त अधिवेशनाला सुरूवात झाली. सिनेटने एरिझोना राज्यातील निवडणूकीवर घेण्यात आलेला आक्षेप ९३ विरूद्ध ६ मतांनी फेटाळून लावला. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीवने ३०३ विरूद्ध १२१ मतांनी आक्षेप फेटाळून लावला. जवळपास ८३ रिपब्लिकन सदस्यांनी हाऊस डेमोक्रॅट्ससोबत मतदान केले. त्यानंतर संयुक्त अधिवेशनात एरिझोनाचे सर्टीफिकेट स्वीकारण्यात आले. त्यानंतर क्रमवारी प्रमाणे राज्यांच्या प्रमाणपत्रांना स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. रिपब्लिकन पक्षाकडून जॉर्जिया व पेनसिल्वेनिया मधील निवडणूकीवर पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला. यावेळी कोणत्याही प्रकारच्या चर्चेशिवाय थेट मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. हाऊस मध्ये २८२ विरूद्ध १३८ व सिनेट मध्ये ९२ विरूद्ध ७ अशा बहुमताने सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले. कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाने जोसेफ बायडन यांच्या राष्ट्रपती नियुक्त व कमला हॅरिस यांच्या उपराष्ट्रपती नियुक्त पदावर शिक्कामोर्तब केले. जोसेफ बायडन यांची राष्ट्रपती पदासाठी ३०६ विरूद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या २३२ इलेक्टोरल मतांनी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी केली.

 

कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात नवीन राष्ट्रपतींची घोषणा करण्यात आल्यानंतर काही क्षणातच डोनाल्ड ट्रम्पनी आपण पीसफूल ट्रान्स्फर ऑफ पॉवर करणार असल्याचे जाहीर केले. जाणकारांच्या मते ट्रम्प यांचा हा अचानक यू टर्न २५ व्या अमेंडमेटची चर्चा सुरू झाल्याने आलेय. शेवटी डोनाल्ड ट्रम्पनी तांत्रिक रित्या आपला पराभव स्वीकारला.

 

मावळत्या प्रशासनातील शेवटच्या काही लाजिरवाण्या घडामोडीं पासून स्वतःला वेगळे करण्याचे अनेक ट्रम्प सहकाऱ्यांचे पुरेपूर प्रयत्न सुरू झालेत. अनेक व्हाईट हाऊस सदस्यांच्या राजीनामा सत्रास सुरुवात झाली आहे. फर्स्ट लेडी मेलिनिया ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ स्टिफनी ग्रिसम यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्यातील दरी वाढत चालली आहे. व्हाईस प्रेसिंडेट पेन्सचे चीफ ऑफ स्टाफ मार्क शॉर्ट यांना व्हाईट हाऊस प्रवेशाची परवानगी नाकारण्यात आली आहे. डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी सल्लागार मॅट पॅटिंजर यांनीही राजीनामा दिला. नॅशनल सिक्युरिटी सल्लागार रॉबर्ट ओब्रायन लवकरच राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकंदरीत २० जानेवारीपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. आधुनिक लोकशाहीच्या निर्मात्यांची ही अवस्था जगभरातील लोकशाहीसाठी चिंताजनक ठरतेय.

 

pratmesh purud
प्रथमेश पुरूड

 


Tags: AmericaAmerica electionDonald trumpgeorge bushwhite houseजॉर्ज बुशडोनाल्ड ट्रम्प
Previous Post

‘ही’अभिनेत्री ठरली लस घेणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी

Next Post

नाशिकमध्ये भाजपला धक्का, दोन मोठे नेते शिवसेनेत

Next Post
shivsena

नाशिकमध्ये भाजपला धक्का, दोन मोठे नेते शिवसेनेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!